स्फोट, पाच कामगारांचा मृत्यू

ship-break

भावनगर – गुजरातमधील भावनगर जिल्हयातील अलंग येथील जहाज तोडणी केंद्रामध्ये शनिवारी सकाळी मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना भावनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. जहाज तोडणी केंद्राच्या १३८ नंबरच्या युनिटमध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास जहाज तोडणीचे काम सुरु असताना हा स्फोट झाला.स्फोट नेमका कशामुळे झाला ते अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे. अलंग हे आशिया खंडातील सर्वात मोठे जहाज तोडणी केंद्र आहे. वर्षाला येथे २५० जहाजे तोडली जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven − 6 =