स्वतंत्र विदर्भावर ठाम!: गडकरी

vidarbha_flagnitin-gadkari1
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वेगळ्या विदर्भाला कधीही विरोध केलेला नाही. विदर्भाविषयी भाजपची भूमिका ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीनं विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न करू,’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.
‘विकासाचं राजकारण’ या विषयावरील चर्चासत्रात गडकरी बोलत होते. ‘स्वतंत्र विदर्भाविषयी भाजपने आपली भूमिका कधीही बदललेली नाही. आमची भूमिका कालही तीच होती आणि आजही तीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही तीच भूमिका आहे. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी यांनी महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, हे विधान मुंबईच्या संदर्भात केलं होतं. विदर्भाशी त्या वक्तव्याचा काहीही संबंध नव्हतं. मोदींशी याबाबत माझं बोलणंही झालं आहे,’ असंही गडकरी यावेळी म्हणाले. स्वतंत्र विदर्भाप्रतीची बांधिलकी व्यक्त करतानाच महाराष्ट्रात शिवसेना व भाजपमधली मैत्री कायम राहावी अशी इच्छाही गडकरी यांनी बोलून दाखवली. तसंच एलबीटी महिन्याभरात बंद करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = twelve