स्वाभिमानी जिनं

unnamed

घरा घरामध्ये नेलं स्वाभिमानी जिनं
हेच काम केलं इथं भीमजयंतीनं !!

कामगिरी केली अशी कामगिरी केली
लाचारी बिचारी सारी दूर दूर गेली
गेलं जुनं काम गेलं पाटलाला भिनं !!

आला नावे जाग आला आली नावे जागं
ठाई – ठाई फुलारली भिमाईची बाग
डोलतात फुलं इथं नव्या टवटवीनं !!

भाकरीची आस होती भाकरीची आस
भाकरीचा घास दिला त्याच घरी खास
जीवनाचं सोनं केलं ह्याच भाकरीनं !!

समाजाचं देणं त्याला समाजात येणं
विचाराचं देणं घेणं करी नम्रतेनं
वामनाचं गीत आलं ह्याच तयारीनं !!

वामनदादा कर्डक
[ मोहोळ ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × = twenty seven