स्विटमार्ट गोडाऊनला आग, पाच लाखाचे नुकसान

यवतमाळ – शहरातील चापमनवाडी येथील सत्कार स्विटमार्टच्या गोडाऊनला आग लागल्याने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून पाच लाखाचे नुकसान झाले.
सत्कार स्विटमार्टचे संचालक भगवानदास लोहाणा याचे चापमनवाडीत श्रीनाथ फु्रट प्रॉडक्टे गोडाऊन आहे. दरम्यान काल मध्यरात्री १२.४५ वाजता या गोडाऊनला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करून आतमधील सर्व साहित्य कवेत घेतले. यामध्ये पॉलीथीन, पॅकींग रोल, कार्टुन बॉक्स, पॉकीट, मटेरीयल,  नमकीन पॉकीट, दरवाजे, खिडक्या, टेबल आदी पाच लाख रुपयाचे साहित्य जळुन खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशन दलाचे दिलावर खॉ, यशवंत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून  ही आग आटोक्यात आणली. काही वेळातच ही आटोक्यात आल्याने शेजारी असलेल्या घराचे कुठलीही हानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 + six =