मुंबई- बजेट एअरलाइन्स असलेल्या स्पाइस जेटने हवाई क्षेत्रातील स्पर्धेला नवे वळण दिले आहे. कंपनीने मंगळवारी केवळ एक रुपयाच्या नाममात्र आधार भाडयावर (कर आणि इतर शुल्क वगळता) मर्यादित कालावधीसाठी तिकिटांची घोषणा केली. खास सुट्टीत चालवण्यात येणा-या नव्या मार्गावरील या तिकिटांवर एक जुलैपासून २८ मार्च या दरम्यान प्रवास करता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्पाइस जेटच्या या आक्रमक सवलतीने देशांतर्गत विमान कंपन्यांमधील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. ऐन सुट्टीच्या हंगामात स्पाइसकडून अशी आकर्षक सवलत जाहीर केल्याने इतर कंपन्या काय प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एक रुपयातील प्रवासाव्यतिरिक्त कंपनीने ७९९ रुपये आणि १४९९ रुपये भाडे असलेल्या दोन योजना आणल्या आहेत. या योजनेंतर्गत गुरुवापर्यंत प्रवाशांना तिकिटांचे बुकिंग करता येणार आहे. याआधीच्या दोन सवलत योजनांना प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या सवलतीतूनही नवीन प्रवाशांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास स्पाइस जेटचे मुख्य परिचालन अधिकारी संजीव कपूर यांनी व्यक्त केला
-
विमान दुर्घटनेतील प्रवाशांचे मृतदेह सापडले
Posted on: February 17, 2014 -
लासीना शिवारात बिबट्याचा मृतदेह
Posted on: February 19, 2014 -
राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयाची
Posted on: February 12, 2014 -
wanted
Posted on: February 01, 2014
Recent Posts
- पावणेदोन लाखांच्या बनावट नोटा हस्तगत April 14, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा February 26, 2016
- गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का February 26, 2016
- मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी February 26, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 8, 2016
- अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार February 8, 2016
- पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द.. February 8, 2016
- ..तरीही महिलांना प्रवेश मिळणार नाही February 3, 2016
- बंजारा साहित्य व संस्कृतीचे जतन व्हावे- February 2, 2016
- व्हील चेअर न देता एअर इंडियाने अपंग महिलेला विमानातून खेचून बाहेर काढले February 2, 2016
- स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले August 18, 2015
- सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी August 18, 2015
- पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे August 18, 2015
- केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ August 18, 2015
- अमिताभ महाराष्ट्राचे व्याघ्र संरक्षणाचे अँबॅसिडर August 10, 2015
Calendar
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | ||||
| 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10 |
| 11 | 12 | 13 | 14 | 15 | 16 | 17 |
| 18 | 19 | 20 | 21 | 22 | 23 | 24 |
| 25 | 26 | 27 | 28 | 29 | 30 | 31 |







