
पिंपरी – दवाखान्यातून घरी परतणाऱ्या तीन सुरक्षारक्षक महिला शुक्रवारपासून बेपत्ता झाल्याचा प्रकार हिंजवडी भागात उघडकीस आला आहे. या तिघींचे अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करत तंत्रज्ञांच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
प्रतिभा प्रकाश हजारे (वय २५, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. नवलिहाळ, जि. बेळगाव), मंगला सिद्धार्थ इंगळे (वय २६, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. वाशीम) या विवाहितांसह विद्या दशरथ खाडे (वय २४, रा. ओझरकरवाडी, मूळ रा. सातारा) अशी बेपत्ता झालेल्या तिघींची नावे आहेत. या प्रकरणी प्रतिभा हजारे यांचे पती प्रकाश बाबू हजारे (वय ३०, रा. ओझरकरवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.









