
हैदराबाद- कुकटपल्ली येथील गल्फ ऑइल कॉर्पोरेशनच्या आवारात सोमवारी सायंकाळी झालेल्या एका स्फोटात दोन कामगार मृत्युमुखी पडले असून अन्य १३ जण भाजल्याने जखमी झाले.
जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. स्फोटानंतर भडकलेली आग आटोक्यात आल्याचे मधापूर क्षेत्राचे पोलीस उपायुक्त कार्तिकेय यांनी सांगितले.येथे डिटोनेटर्स निष्कासित करत असताना अचानक स्फोट झाल्याचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एम. श्रीनिवास राव यांनी सांगितले.









