
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या प्रेमात पडली आहे. स्वत: कंगनाने एका मुलाखतीमध्ये आपण प्रेमात असल्याची कबुली दिली आहे.
प्रेमाचे नाते फार नाटयमय असते. तुम्ही त्यात हसता-रडता. पण चांगले नाते तुम्हाला अधिक सशक्त बनवते असे कंगना म्हणाली. प्रेमात पडल्यावर सर्वसामान्य प्रियकर-प्रेयसीची जी अवस्था होते तशीच अवस्था सध्या कंगनाची झाली आहे.
कंगनाला प्रियकराचे नाव विचारले असता ती म्हणाली की, सध्या मी प्रेमात आहे. जोडीदार मिळाल्याचा मला आनंद आहे. या नात्यातील भावनात्मकतेचा मी आनंद घेत आहे. माझ्यासाठी हे नाते खास आहे. या क्षणाला सर्व उघड करणे योग्य ठरणार नाही. तो समोरच्यावर अन्याय ठरेल. नातेसंबंध निभवणे असेही कठीण असते नाही का? असे उत्तर कंगनाने दिले.









