होळीच्या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा, राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विरोध

नागपूर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १६ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. परंतु याच दिवशी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणाऱ्या होळीचा सण असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे ‌ही परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्ष‌क समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
‌‌होळीच्या दिवशी परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांना या सणाच्या उत्साहाला मुकावे लागेल. शिवाय, काही अनुचित प्रकारही होऊ शकतील. या सणाची धामधूम ही ग्रामीण भागात जास्त असते. एरवीसुद्धा या दिवशी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर परिणाम होतो. अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बाहेरगावी असल्यामुळे होळीचा सण लक्षात घेता बहुसंख्य विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहण्याची ‌शक्यता आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलून दुसऱ्या तारखेला घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाबळे यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील परीक्षा परिषदेला देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


9 + two =