यवतमाळ, दि. २१ – जगाचा पोशिंदा सततच्या दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्या करीत आहे. १०९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुबांना ५ हजार रुपये व साडीचोळी असा आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सर्व महोत्सवी वर्षानिमित्त सहकार भवन येथे रविवारी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री ना. संजय राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. मदन येरावार, आ. ख्वॉजा बेग, आ. राजू तोडसाम, पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, पवन आत्राम, राजेंद्र राऊत यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी ओळखून पतसंस्थेच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते ५ हजार व साडीचोळी अशी मदत करण्यात आली. कुटुंबप्रमुखाने जीवन संपविल्यामुळे शेतकºयांचे कुटुंबच उघड्यावर पडले आहे. शेतकरी विधवा, त्यांची मुलं, मुली यांच्या चेहºयावरून उद्याची काळजी स्पष्टपणे दिसत होती. कपाशीला जन्म देणाºया जिल्ह्यातच आत्महत्येचे पीक आले, शेतकरी जगला तरच देश जगेल, राज्य सरकार शेतकºयांप्रती संवेदनशील असल्याचे प्रतिपादन आ. मदन येरावार यांनी केले. शेतकºयांवर आत्महत्येची पाळी येणार नाही. यासाठी राज्य सरकारकडून दिघकालीन उपाययोजना करण्यात येणार आहे. शेतकºयांनी हिंमत सोडू नये. राज्यात कष्टकºयांचे सरकार आले आहे. एक दिवस शेतकरी ‘फिनिक्स’पक्षाप्रमाणे भरारी घेतील, असा आशावाद ना. संजय राठोड यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला. यावेळी आ. ख्वॉजा बेग, आ.प्रा. राजू तोडसाम यांनी आम्ही शेतकºयांच्या पाठीशी आहो, जीवन संपवू नका, असे आवाहन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दादाराव पवार, गौतम वानखेडे, सरला दाडे, अर्चना बेले, प्रियंका चौधरी, मिना भगत, सुनिता चव्हाण, मंगला कुमरे यांच्यासह आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला. प्रास्ताविक राजूदास जाधव यांनी केले. यावेळी संजय गावंडे, सुमाला पुडके, शरद घाटोड, डॉ. दिलीप चौधरी, विजय डंभारे, संदीप श्रीरामे, शेख लुकमान, अनिल सरताबे, दीपक दोडके, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, सुरेश घावडे, साहेबराव राठोड यांच्यासह शेतकरी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










