जन्म तुझा केवळ
जन्म नव्हता
या जगासाठी
या युगासाठी
तो तर महोत्सव होता
युगजन्माचा
म्हणूनच तर
पृथ्वी स्वत: भोवती फिरतांना
तुझ्याच जन्माच्या
मंगलकामना
देत धुंद होत असते
सृष्टीतील प्रत्येकाला
आणि
सूर्याला सुद्धा
प्रशांत वंजारे ,,आर्णी
( आगामी काव्यसंग्रहातून )










