यवतमाळ – यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज शुक्रवारी २१ मार्च रोजी ९ उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करणाºयांमध्ये सुरेश राजाराम मुखमाले (महाराष्टÑ विकास आघाडी १ अर्ज), बंडू गणपत मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्र्टी १ अर्ज), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष १अर्ज), इंदूवर काशीराम राठोड (बहुजन मुक्ती आघाडी २ अर्ज), प्रकाश रघुनाथ राऊत (अपक्ष २ अर्ज), महादेव हरीभाऊ ताटके (अपक्ष १ अर्ज), जांबुवंतराव बापुराव धोटे (अखील भारतीय फॉरवर्ड ब्लॉक २ अर्ज), उल्हास वसरामजी जाधव (अपक्ष २ अर्ज), प्रशांत पंढरीनाथ सुर्वे(अपक्ष ३ अर्ज) दाखल केले. आतापर्यंत १७ उमेदवारांनी २९ उमेदवारी अर्ज दाखल केले. आज २३ उमेदवारांनी ६३ अर्ज नेले आहे. आजपर्यंत एकूण ११७ उमेदवारांनी ३०३ अर्ज नेले आहे.









