१५ लाखाचा साखर घोटाळा, तत्कालीन तहसिलदारांवर गुन्हा

2014-11-06~fraud_ns images
उमरखेड ,दि. २४ – १५ लाख रुपयाच्या साखर घोटाळ््याप्रकरणी अखेर तत्कालीन तहसीलदार सुरेश थोरात व शैलेश सुरोशे (कोपरकर) यांच्याविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सन २०१२ मध्ये ३२० क्विंटल साखर माहे जून, जूलै व आॅगस्ट २०१२ या कालावधीतील ४४५ क्विंटल साखर अशी एकूण ७६५ क्विंटल साखरेची किंमत १४ लाख १५ हजार रुपये किंमतीची साखर रास्त भाव दुकानदार यांना वितरीत न करता अपहार करून व शासनाची फसवणूक केली होती. त्यानुसार विभागीय अमरावती विभगा अमरावती यांनी तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या पत्रानुसार सदर अफरातफर झालेला साखरच्या गैरव्यवहार करिता जवाबदार असलेले शैलेश सुरोशे साखर नॉमिनी उमरखेड व तत्काली तहसिलदार सुरेश थोरात यांचे विरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी निर्देश दिले होते. त्यावरून तहसिलदार उमरखेड यांचे पुरवठा निरीक्षक रविंद्र चंद्रकांत चन्नावार यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला या तक्रार दाखल केली. त्यावरून तहसीलदार व सुगर नामिनीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. साखर घोटाळा झाला त्याच वर्षी तहसीलदार थोरात हे अन्य एका विषयामुळे वादग्रस्त ठरले होते. आचारसंहिता काळात काँग्रेस नेत्याच्या गळ््यात हार टाकल्याप्रकरणी गोत्यात आले होते. तसेच विटभट्टी चालकाच्या तक्रारीवरून एलसीबीच्या पथकाने धाड टाकून २० डिसेंबर २०१२ रोजी रंगेहाथ पकडल्याची घटना त्याच काळात घडली होती. साखर घोटाळा प्रकरण तहसीलदार व सुगर नॉमिनी दोघांनाही चांगलेच भोवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = twelve