१५ ला शेतकºयांचा रास्तारोको

raj0411
यवतमाळ ,दि. १२ (प्रतिनिधी)- कृषी मुल्य आयोग रद्द करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी १५ डिसेंबरला रास्तारोको करण्यात येणार असल्याची माहिती आज शुक्रवारी नगरवाचनालय भवनात आयोजित पत्रकार परीषदेत अशोक भुतडा यांनी दिली. सत्तेत कोणीही असो, शेतकºयाला केवळ नागविण्याचे काम सुरू आहे. खताचे वारेमाप भाव असून, शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव दिल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून मुक्त होण्याऐवजी त्याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. परीणामी शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबित असून, शेतकºयांच्या हिताचे धोरण राबविण्यात येत नसल्याचा आरोप यावेळी भुतडा यांनी केला. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी मुल्य आयोगच रद्द करण्याची गरज असून, कृषी मालाचे दर स्वामीनाथन समिती नुसार मिळावे यासाठी १५ तारखेला तळेगाव भारी येथे सकाळी शेतकरी रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे यावेळी अशोक भुतडा यांनी सांगितले. पत्र परिषदेला चंपालालजी लोणावत, ब्रिजेश शुक्ला महिपाल प्रधान, निरंजन देशपांडे, नितीन मोरघडे आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 1 = eight