
औरंगाबाद – चलनातून गायब झालेल्या एक रुपयांच्या नोटा अवघ्या दोन महिन्यांत शहरातील बाजारपेठेत दिसतील. १ जानेवारीपासून या नोटांची छपाई केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली.
१, २ आणि ५ रुपयांची नाणी चलनात आल्यानंतर सुमारे २० वर्षांपूर्वी या रुपयांच्या नोटांवर बंदी आणली. एक रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९४ मध्ये, दोन रुपयांच्या नोटा फेब्रुवारी १९९५ मध्ये, तर पाच रुपयांच्या नोटांची छपाई नोव्हेंबर १९९५ मध्ये बंद करण्यात आली. दरम्यान, ५ रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने पुन्हा सुरू ठेवली होती. आता केंद्र सरकारने पुन्हा एक रुपयांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय घेतला असून, अर्थ मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.औरंगाबादमध्ये एक रुपयांची नोट यायला निदान २ महिने तरी लागतील. औरंगाबादमध्ये या नोटा आरबीआयकडून एसबीआय, महाराष्ट्र बँक आणि एसबीएचच्या मुख्य कार्यालयाच्या मागणीनुसार याच बँकांना दिल्या जातील. छपाईनंतर आधी मुंबई-पुण्यात आल्यानंतर त्या व्यवहारात येण्यास सुरुवात होईल.









