२६/११चा सूत्रधार लख्वीला जामीन

lakhvi
इस्लामाबाद, दि. १८  – दोनच दिवसांपूर्वी पेशावरमधील तालिबानी हल्ल्यानं हादरलेल्या आणि दहशतवाद संपवायची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं आपले खरे रंग लगेचच दाखवले आहेत. २६/११च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकीउर रेहमान लख्वीला रावळपिंडीच्या कोर्टानं आज जामीन मंजूर केला आहे. त्यातून त्यांचा खोटेपणा आणि भारताबद्दलचा द्वेषच स्पष्ट होतो.
२६/११च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचा, माहिती पुरवल्याचा आरोप झकीउर रेहमान लख्वीवर आहे. मोहम्मद अजमल कसाबच्या कुटुंबाला त्यानं आर्थिक मदतही केली आहे. त्याच्याविरोधातील पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्याची रवानगी झाली. त्याचा ताबा देण्याची मागणी भारत सरकारनं अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. परंतु, एरवी मैत्रीची भाषा करणारं पाक सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यांच्या या कावेबाजपणा आज पुन्हा उघड झाला. रावळपिंडी कोर्टानं लख्वीला जामीन मंजूर केल्यानं त्याचा जेलमधील मुक्काम संपणार आहे. दहशतवाद संपवण्याच्या गर्जना करणारं पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचंच या जामिनातून पुन्हा समोर आलंय. पेशावरमधील अमानुष हल्ल्यातूनही त्यांनी काहीच बोध घेतलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 × nine =