२६/११चा हल्ला विसरु शकत नाही – पंतप्रधान

images.jpeg 1
काठमांडू – २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला भारत कधीच विसरु शकत नाही. या दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सार्क परिषदेतील भाषणादरम्यान सांगितले. नेपाळमधील काठमांडू येथे १८ वी सार्क परिषद सुरु आहे. यावेळी सार्क नेत्यांना उद्देशून त्यांनी भाषण केले.
सार्कमधील देशांना एकमेकांशी जोडणे गरजेचे आहे. यासाठी सार्क देशांना तीन ते पाच वर्षांसाठी बिझनेस व्हिसा देण्यास भारत तयार असल्याचे ते म्हणाले. २००८ मध्ये आजच्याच दिवशी मुंबईवर तो भयानक दहशतवादी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात निरपराध लोकांना जीव गमवावा लागला होता. त्याचे दु:ख आम्ही कधीच विसरु शकत नाही. या दहशतवादाविरोधात सार्क देशांनी सयुंक्त लढा देण्याची गरज आहे असे मोदी म्हणाले.
चांगला शेजारी असणे हे प्रगतीसाठी नेहमीच प्रोत्साहनकारक असते. जर आपण एकमेकांबाबत संवेदनशील असू तर आपल्यामधील मैत्रीचे बंध अधिक दृढ होतील. याचा फायदा नक्कीच प्रगतीला प्रोत्साहन देणारा ठरेल. सार्क देशांतील परस्पर मतभेदांमुळे विकासात अडथळे निर्माण झाले आहेत,’असे मोदींनी सांगितले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणादरम्यान विकासाच्या अनेक मुद्दयावरही भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five + 3 =