७० भारतीय पासपोर्टची चोरी

Passports-232x300
वॉशिंग्टन – सॅन फ्रान्सिस्कोमधील बीएलएस इंटरनॅशनल या खासगी कंपनीतून ७० भारतीय पासपोर्टची चोरी झाली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास या कंपनीकडून व्हीसा, पासपोर्टची कामे करुन घेते. अशाच कामांसाठी हे पासपोर्ट कंपनीच्या ताब्यात असताना, चोरी झाली.
पासपोर्टची चोरी होणे गंभीर प्रकरण असून, सॅन फ्रान्सिस्को पोलिस आणि भारतीय दूतावास दोघेही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चोरी झालेल्या पासपोर्टचा गैरवापर होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयासह, सर्व संबंधित यंत्रणांचा या घटनेची माहिती दिली आहे.सॅन फ्रान्सिस्कोच्या बीएलएस इंटरनॅशनलच्या कार्यालयातून २९ नोव्हेंबरच्या आसपास या पासपोर्टची चोरी झाल्याची शक्यता आहे. कंपनीची तिजोरी उघडून पासपोर्टसह, रोख रक्कम आणि चेकची चोरी झाल्याची माहिती कंपनीच्या कर्मचा-यांनी पोलिसांना दिली. सॅन फ्रान्सिस्कोच्या भारतीय दूतावासाने हे सर्व पासपोर्ट रद्द केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight + = 10