साई अॅग्रो इंडस्ट्रीजला आग; लाखोंचे नुकसान
उमरखेड- शहरपासून जवळच असणाºया महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये असणाºया प्रशांत मुक्कावार यांच्या मालकीचे साई अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये चने कुटार रिकामे करण्यासाठी आलेल्या वाहनामुळे कुटार गंजीला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
आज ३ मे रोजी एमआयडीसी मध्ये व क्र. एम.एच. २६-७८१५ टाटा छोटा ट्रक कुटार खाली करण्यासाठी आला होता. आधीच कुटार असल्यामुळे गाडी पुढे न जाता जागीच फिरत होती. त्यामुळे घर्षण होऊन आग लागली त्यामुळे वाहन जागीच जळून खाक झाले तर कुटार गंजीला आग लागली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे व उन्हाच्या तिव्रतेमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी उमरखेड, पुसद, हदगाव व महागाव येथून अग्नीशामक दल बोलावण्यात आले होते. माहिती मिळताच पो. स्टे. चे पी.एस.आय. मनोज मानकर, एपीआय सुरज बोंडे, सचिन ढोके आपल्या ताफ्यासह पोहचून परिस्थिती हाताळत होते. या आधीही दोनदा आग लागली होती. आग विझविण्यासाठी १० ते १५ गाड्या अग्नीशामक दलाची आवश्यकता भासेल, असे असताना वाहन आटोकाट प्रयत्न करत होत्या. परिसरात व कारखान्यात अग्नीशमन व्यवस्था पाहिजे असते ती नव्हती. दोन जेसीबीच्या सहाय्याने भुसा हटवत शर्थीचे उशिरा पर्यंत सुरू होते. एकूण लाखोचे नुकसानाला व्यावसायीकाला समोर लागले.









