
यवतमाळ – राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुप्त माहितीवरून सावरगाव-चिंचोली रोडवर सापळा रचून टाकलेल्या धाडीत गोवा संत्रा ब्रॅंडच्या देशी दारूच्या 480 बॅाटल्स जप्त केल्या. जप्त मद्देमालाची एकून किंमत 3 लाख 15 हजार इतकी आहे. या कार्यवाहीत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीवरून यवतमाळच्या भरारी पथकाने ही कार्यवाही केली. MH-32/C-342 या क्रमांकाच्या टाटा सुमोमध्ये सदर देशी दारू असल्याचे कळल्यानंतर सापळा रचून या वाहनासह 480 बॅाटल्स जप्त करण्यात आल्या. तसेच तीन आरोपी निलेश बाबाराव रूपवणे, अंबादास सुकानंद कांबळे, दिनेश भाऊराव शिवरकर यांना अटक करण्यात आली. ही कार्यवाही अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ भरारी पथकाचे दुय्यम निरिक्षक उमेश शिरभाते, एम.पी.चिटमटवार, एन.के.सुर्वे तसेच जवान शंकर घाटे, महेंद्र रामटेके, ए.ए.पठाण, एम.पी.शेंडे, एन.डी.दहेलकर, एस.एस.दुधे, निलेश मानकर, नितीन कुळसंगे, बी.सी.मेश्राम, सी.डी.चिद्दरवार, यांनी केली. नवीन वर्ष साजरे करतांना कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून 31 डिसेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत
असून त्याअंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. पुढेही ही कार्यवाही सुरू राहणार आहे. अवैध मद्यविक्रीसह गैरकायदेशिर मार्गाने होणारी मद्यविक्रीवर विशेष भरारी पथकाचे लक्ष राहणार आहे. त्यासाठी विशेष पथखे नववर्षाचे स्वागत करतांना मोठ्या प्रमाणावर मद्यसेवेन केले जाते. त्याअनुषंगाने एकदिवशीय मद्यपरवाने
मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 60 हजार एकदिवशीय मद्य परवाने देण्यात आले आहे.









