3500 रुग्णांनी घेतला जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ

images.jpeg  1
नवीन शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार योजनेचा लाभ
यवतमाळ: जिल्ह्यात 2 डिसेंबर 2013 पासून कार्यान्‍वीत झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयात 757 तसेच राज्यातील इतर नामांकीत रुग्णालयात 2808 अशा एकूण 3565 रुग्णांनी उपचार घेतलेआहेत. आता नव्यानेशिधपत्रिका कार्ड मिळवलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांसाठी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे 500 खाटांची व्यवस्था आहे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त असलेल्या साईश्रध्दा मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, यवतमाळ 30, तावडेरुग्णालय, यवतमाळ 50, राठोड हास्पीटल शिशूरुग्णालय,यवतमाळ 31, शांती ऑर्थेपेडीक रुग्णालय, यवतमाळ 25, क्रिष्णा बाल रुग्णालय, पुसद 30, लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, पुसद 100, सुगम रुग्णालय वणी 100 खाटांची व्यवस्था उपचारासह उपलब्ध आहे.  31 ऑक्टोंबर 2013 पूर्वीचेराशनकार्ड ज्यांच्याकडेहोतेत्यांना तेया योजनेचेलाभार्थी होते. यानंतरही पिवळे, केशरी अथवा अन्नपूर्णा, अत्योदय योजनेची शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दिला जात आहे. आता शिधापत्रिका मिळाल्याच्या दिनांकाची अट शिथील करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 68 हजार 175 आरोग्य पत्रिकांचेपोष्ट ऑफीस, सेतू, संग्राम केंद्र आदी माध्यमाव्दारेवितरण लाभार्थींना करण्यात आले. तसेच जिल्ह्यात दिग्रस येथेभव्य आरोग्य शिबीरासह मुकुटबन, नेर, यवतमाळ, दारव्हा कवडीपूर, पुसद, मारेगाव, कळंब, वणी, बाभुळगाव, पांढरकवडा, महागाव यैथेशिबीरेघेण्यात आली. योजनेच्या अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 38 क्रमांकाच्या कक्षात संपर्क साधावा, असेया योजनेच्या समन्वयकांनी कळविलेआहे. या योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचेआवाहन योजनेचेनोडल ऑफीसर तथा अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारेयांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine + 7 =