
नागपूर : न्यू दिल्ली -पाँडीचेरी एस्क्प्रेसमधून नागपूर मार्गे कासवांची तस्करी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याविषयी गुप्त माहिती रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्यांनी ही गाडी स्टेशनवर येताच पोलिसांनी तपासणी सुरु केली. त्यांना एस ९ क्रमांकाच्या डब्यातील बर्थ क्रमांक १५ खाली ठेवलेली बॅग संशयास्पद वाटली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यात शंभर कासव आढळले. काही कासव मृतावस्थेत होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. शिवकुमार सिद्दरांगु (२१) आणि ब्रभातबिहारी चंद्राबाबू (२७) अशी आरोपींची नावे आहेत. कासव वनविभागाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.
Archive for June 2nd, 2015
0
कासवांची तस्करी करणा-यांना अटक
0
इंडिया टीमचे हंगामी प्रशिक्षक रवी शास्त्री

नवी दिल्ली, दि. २ – आगामी बांग्लादेश दौ-यासाठी माजी खेळाडू रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी हा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षी झालेला ऑस्ट्रेलिया दौरा व त्यानंतर पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान शास्त्री यांनी भारतीय संघासाठी ‘टीम डायरेक्टर’ म्हणून काम पाहिले होते. दरम्यान संजय बांगर यांची बॅटिंग कोच म्हणून, बी अरूण यांची बॉलिंग कोच म्हणून आणि आर. श्रीधर यांची फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. येत्या १० जूनपासून भारतीय संघ बांग्लादेशच्या दौ-यावर जाणार असून तेथे एक कसोटी व तीन एकदिवसीय सामने खेळण्यात येणार आहेत.
0
चीनमध्ये जहाज बुडाले, ४०० जण बेपत्ता

बीजिंग- दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगजी नदीत सोमवारी रात्री पर्यटकांना घेऊन जाणारे ‘इस्टर्न स्टार’ जहाज वादळामुळे बुडाले. जहाजावर ४५८ प्रवासी असून आत्तापर्यंत १० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यात येत आहे.
चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील नानजिंग शहरापासून चाँगकिंग शहराकडे हे जहाज जात होते. या जहाजातून ४५८ प्रवासी प्रवास करत होते.
वादळामुळे जहाज बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य तत्काळ राबविण्यात आले. मात्र सोसाट्याचे वारे आणि पाऊस अशा खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
यातील काही पर्यटक पोहत किना-यावर आले, तर काही जणांना मच्छिमारांनी वाचविले आहे. मात्र अद्यापही ४०० जण बेपत्ता असल्याचे समजते.









