
मुंबई- जवळच्या समुद्रात बुडणार्या एका जहाजावरच्या 20 कर्मचार्यांची भारतीय नौसेने थरारकपणे सुटका करण्यात आली आहे. जिंदल कामाक्षी या खाजगी जहाजातून 20 कर्मचार्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
वसईपासून 80 कीलोमीटर खोल आणि 40 नॉटीकल मैलावर समुद्रात जिंदाल कामाक्षी जहाजात काल रात्री काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे जहाज मध्येच बंद पडले. हे जहाज मुंबई बंदरात येत होते. पण उधाणलेल्या समुद्रात मध्येच बंद पडल्यामुळे आपत्कालीन परीस्थीती निर्माण झाली. त्यानंतर नौदलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. मात्र, रात्री पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत होते.
त्यानंतर लगेचच नौसेनेनं सीकिंग हेलिकॉप्टर आणि आयएनएस मुंबई या लढाऊ विमानाच्या मदतीने जहाजातील कॅप्टनसह 20 कर्मचार्यांना नौदलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. या सर्व कर्मचार्यांना कुलाबा इथल्या INS शिक्रा या नौदलाच्या तळावर आणण्यात आलं आहे. तसंच बंद पडलेलं जहाज भरकटू नये यासाठी नौदलाने एक बोट ही तैनात केली आहे.
Archive for June 22nd, 2015
0
बुडत्या जहाजातून 20 कर्मचार्यांना वाचवण्यात नौदलाला यश
0
नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
मुसळधार पावसाने आता बळी घ्यायला सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जतजवळील नेरळ येथील मोहाची वाडी इथे घराची भिंत कोसळून 5 जण ठार झाल्याची घटना घडली आहे.या घटनेत एकाच घरातील चारजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. पहाटे साडेपाच वाजेची ही घटना आहे. किसन दिघे, सुनंदा दिघे, जाईबाई कदम, अर्चना दिघे यांचा मृत्यू झाला आहे.
सलग सुरू असणार्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह रायगड परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड जिल्ह्यात 24 तासातसरासरी 137 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
0
दाभोळमध्ये दरड कोसळली, 7 जण गाडले गेल्याची भीती

रत्नागिरी – जिल्ह्यातल्या दाभोळमध्ये दरड कोसळली आहे. या दरडीखाली 7 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. टेमकरवाडी परिसरात ही दरड कोसळली असून दरडीखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रत्नागिरी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून सततच्या पावसामुळे काल मध्यरात्री 2:30 वाजता दाभोळ मळेवाडीत दरड कोसळली आहे. अजूनपर्यंत जीवितहानीचं कोणतंही वृत्त नाही. मात्र, दरडीखाली एका घरातले 5 जण तर दुसर्या घरातले 2 जण असे 7 जण अडकले असल्याचा संशय आहे.
सुभाष पुरकर यांच्या घराच्या बाजूला दरड कोसळली. त्याच्या शेजारच्याच राजेंद्र हारेकर यांच्या घरातील एका खोलीवर दरड पडली. खोलीत त्यांच्या दोन मुली आणि आई झोपल्या होत्या. दरड पडल्यावर त्यांनी ओढून बाहेर काढण्यात आलं आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. तर अडकल्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पण पाऊस असल्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.
0
मध्यप्रदेशातील पत्रकाराला वर्ध्यात जिवंत जाळलं

नागपुर – उत्तरप्रदेशमध्ये पत्रकाराला जिवंत जाळण्याची घटना ताजी असताना वर्ध्यात पुन्हा एका पत्रकाराला जिवंत जाळून ठार मारण्याची खळबळजनक घटना घडलीये. संदीप कोठारी असं या पत्रकाराचं नाव आहे. संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेशमधून अपहरण करून वर्ध्यात बुटीबोरी इथं जिवंत जाळून हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल या दोन आरोपींना अटक करण्यात आलीये. तिसरा आरोपी फरार आहे. चिटफंड कंपन्या, भू-माफिया आणि अवैध मायनिंग माफियांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.
19 जून रोजी संदीप कोठारी यांचं मध्यप्रदेश जिल्ह्यातील बालघाटमधून अपहरण करण्यात आलं होतं. संदीप कोठारी संध्याकाळी आपल्या घरी परतत असताना रात्री 9.30 च्या सुमारास आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांनी त्यांचं अपहरण केलं. संदीप यांना एका कारमध्ये बसवून बालघाटपासून दोन किलोमिटर अंतरावर वर्ध्या जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ आणून मारहाण केली आणि जिवंत पेटवून दिलं.
आरोपी एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मृत संदीप कोठारी यांना घटनास्थळीच जमिनीत पुरण्याचा प्रयत्न केला. दुसर्या दिवशी घटनास्थळापासून जवळच असलेल्या सिंधी स्टेशन पोलिसांना बेवारस मृतदेहाची माहिती मिळाली. पोलिसांनी संदीप कोठारी यांचा मृतदेह अज्ञात समजून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. पण, रात्री उशीर झाल्यामुळे शवविच्छेदन होऊ शकलं नाही. अखेर बालघाट पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी चिटफंड कंपनीशी संबंधीत असलेल्या विशाल तांडी आणि जमीन व्यवहाराशी संबंधी असलेल्या बुटीबोरी येथील रहिवाशी ब्रजेश डहरवाल या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं. अगोदर दोघांनी उडवा उडवीची उत्तर दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनी संदीप कोठारी यांचं अपहरण आणि हत्येची कबुली दिली.
संदीप कोठारी यांनी चिटफंड आणि अवैध जमीन व्यवहार प्रकरणी आरोपी विशाल तांडी आणि ब्रजेश डहरवाल यांच्याविरोधात तक्रार
केली होती. विशाल तांडीच्या विरोधात राजस्थान जिल्ह्यातील उदयपूर येथील हिरणमगरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर दुसरा आरोपी ब्रजेश डहरवालच्या विरोधात संदीप यांनी जमीन गैरव्यवहाराची तक्रार दिली होती. त्याचबरोबर मायनिंग माफियांच्याविरोधातही संदीप कोठारी यांनी आवाज उठवला होता. आपल्या विरोधात तक्रार दिला याचा राग धरून आरोपींनी हत्या केल्याचं कबूल केलंय. या प्रकरणी राकेश नर्सवाली हा तिसरा आरोप अजूनही फरार असून पोलीस अधिक तपास करत आहे.









