
मुंबई- कॉम्प्यूटर आणि स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या १५ वर्षाच्या मुलाने आईने कॉम्प्यूटर बंद केल्याने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून या मुलावर सध्या मनोविकातज्ज्ञ उपचार करत आहेत.
पुण्यात राहणा-या १५ वर्षीय मुलाला त्याच्या आईवडिलांनी तीन वर्षांपूर्वी मोबाईल घेऊन दिला होता. सुरुवातीला फक्त अर्धा तास सर्फिंग आणि गेम खेळणारा हा मुलगा काही महिन्यांनी दिवसातील निम्मावेळ मोबाईल व कॉम्प्यूटरवरच खर्ची करु लागला. या नादात त्याने शाळेलाही दांडी मारली. मुलाच्या आईवडिलांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिसाद दिला नाही. याऊलट मला एकटे सोडून द्या, मला डिस्टर्ब करु नका असे तो सांगायचा. अखेरीस त्याच्या आईवडिलांनी मुलगा ऐवढा वेळ खोलीत बसून काय करतो हे बघण्यासाठी त्यावर पाळत ठेवली. यात तो कॉम्प्यूटर व मोबाईलद्वारे दिवसभर इंटरनेटवर चॅटिंग आणि सर्फिंग करत असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे मोबाईलमध्ये इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी त्याने आईवडिलांच्या बॅगेतून पैसे चोरल्याचे आढळले.
काही दिवसांपूर्वी मुलाची आई ज्या स्वतः पुण्यातील शाळेत शिक्षिका आहेत त्यांनी मुलाकडून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व त्याचा कॉम्प्यूटरही बंद केला. यामुळे संतापलेल्या मुलाने घरातील चाकूने आईवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडाओरड सुरु केल्याने मुलाच्या वडिलांनी खोलीत धाव घेत त्याच्याकडून चाकू खेचून घेतला व पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर आईवडिलांनी त्यांच्या मुलाला मुंबईतील भायखळा येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर मनोविकारतज्ज्ञांनी उपचार केले असून यात त्याला एकदा शॉक ट्रीटमेंटही द्यावी लागली आहे. कॉम्प्यूटर व मोबाईल फोनच्या आहारी गेलेल्या या मुलाचे मानसिक संतूलन ढासळल्याने ही घटना घडली अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली.
Archive for September 10th, 2014
0
कॉम्प्यूटर बंद केल्याने मुलाने आईवर केला चाकूहल्ला
0
‘निर्भया’वर उपचार करणा-या नर्सवर बलात्कार

नवी दिल्ली – संपूर्ण देशाला हादरवणा-या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरूणी ‘निर्भया’वर उपचार करणा-या नर्सवरही सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पंजाबमधील बुढलाडा येथे सोमवारी ही घटना घडली.
पीडितेने नोंदवलेल्या जबाबानुसार, आरोपी पीडित नर्सच्या ओळखीतीलच आहे. तिला काही पैशांची गरज होती, याबद्दल तिने आरोपीला माहिती दिली असता, त्याने तिला पैसे घेण्यासाठी बुढलाडा येथे बोलावले. आरोपी तिला एका खोलीत घेऊन गेला व तिला पैसे दिले, त्यानंतर पीडित महिला परत जाण्यास निघाली असता आरोपी व त्या खोलीत उपस्थित असलेल्या आरोपीच्या दोन मित्रांनी तिला पकडले व तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.
याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे, मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
२०१०२ साली दिल्लीत वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेणा-या तरूणीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता व तिला अमानुष मारहाणही करण्यात आली होती. या घटनेते गंभीर जखमी झालेली तरूणी ‘निर्भया’वर दिल्लीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र अखेर तिचा मृत्यू झआला. या तरूणीवर ज्या नर्सने उपचार केले, तिच्यावरच बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे.
0
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, २० हजार दंड?

नवी दिल्ली- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना सापडल्यास आता २०० ऐवजी २० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणा-यांच्या विरोधात २० हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच किरकोळ सिगारेटच्या विक्रीवरही बंधने घालण्याचा विचार सरकार करत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. आरोग्य खात्याने सिगारेटबाबत तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढल्यास २०० वरून २० हजार रुपये दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे सिगारेट ओढण्याची सवय तत्काळ कमी होऊ शकेल, असे त्यांचे मत आहे. त्यानुसार सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३ मध्ये प्रस्तावित सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे विधेयक सरकारने तयार केले असून ते हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सिगारेट कंपन्यांनी सिगारेट ओढण्याचे धोके दाखवणारे चित्र न प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ५० हजार रुपये दंड आकारावा. तसेच सिगारेट ओढण्याचे वय किमान १८ वरून २५ करावे, दुकानांवर सिगारेटच्या जाहिराती करू नयेत, आदी शिफारसी तज्ज्ञ समितीने केल्या आहेत.
0
श्रीनगरचे दृश्य महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या जम्मू-काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर शहराचे दृश्य
0
दुहेरी आकड्यात जागा द्या – खा. रामदास आठवले

मुंबई – भाजप शिवसेना महायुती आणखी मजबूत होऊन ती कायमस्वरूपी टिकली पाहिजे. महायुती टिकविण्याची जबाबदारी केवळ आमचीच नसून, ती सर्वांची आहे. दोन मोठ्या पक्षांनी सन्मानाने महायुतीच्या लहान घटकांना विधानसभेचे जादा मतदारसंघ सोडले पाहिजेत. आम्हांला दुहेरी आकड्यात जागा मिळायला हव्यात. पाच सहा जागांवर चालणार नाही अन्यथा पक्ष वेगळा विचार करील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा बुधवारी मुंबईत दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय व राज्य कार्यकारिणीची बैठक चेंबूरमध्ये झाली. या बैठकीत काही राजकीय ठराव संमत करण्यात आले. त्यात पक्षाने हमखास निवडून येतील अशा १५ मतदारसंघाची मागणी महायुतीकडे केली आहे. किमान १० मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत मिळायला हवेत. रिपब्लिकन पक्षाचेच उमेदवार पराभूत होत नाहीत तर शिवसेना भाजपचेही निम्मे उमेदवार पराभूत झाल्याचे याआधीच्या निकालांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे चांगले मतदारसंघ द्या. एकदिलाने काम केल्यास काँग्रेस आघाडीचा पराभव अटळ असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
0
अमित शहांविरुद्ध चार्जशीट

मुजफ्फरनगर – लोकसभा निवडणुकीदरम्यान मुजफ्फरनगर येथे प्रचार करत असताना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये ४ एप्रिल रोजी शहा यांनी धार्मिक भावना भडकावणारे एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जाट समाजाच्या लोकांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्याचं आव्हानं शहा यांनी एका प्रचारसभेत केलं होतं. तत्पूर्वी मुजफ्फरनगर येथे जातीय दंगल होऊन गेली होती. त्यामुळे परिसरात तणाव कायम होता.
मुजफ्फरनगर येथील कोर्टात अमित शहा यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. शहा यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखविण्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते मतांचं ध्रुविकरण करण्यासाठी अशाप्रकारचे प्रक्षोभक भाषण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपपत्रात अमित शहा यांच्या विरोधात अनेक गंभीर कलमं लावण्यात आली असल्याचं सूत्रांचे म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान द्वारिका पुरी येथील एका घरात आयोजित सभेत शहा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नई मंडी येथे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शहा यांच्याकडे भाजपने उत्तर प्रदेशचे प्रभारीपद सोपविलं होतं.प्रक्षोभक भाषण करण्याबाबत सध्या चर्चेत असलेले अमित शहा हे भाजपचे दुसरे नेते आहेत. यापूर्वी भाजपचे खासदार आदित्यनाथ यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाने कारवाई केली असून भाषणांमध्ये प्रक्षोभक भाषा वापरत असल्याचं सांगत यूपीत त्यांच्यावर भाषणबंदी लावण्यात आली आहे.












