पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for October, 2014

दलित अत्याचार विरोधात मुंबईत आंदोलने 0

दलित अत्याचार विरोधात मुंबईत आंदोलने

ap11

मुंबई- अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार पातळीवर याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने शुक्रवारी वानखेडे स्टेडियम येथे नवे मुख्यमंत्री शपथ घेत असताना सरकारचे लक्ष या गंभीर घटनांकड़े वेधण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांनी आक्रमक होत तीव्र आंदोलने केली. यात फेसबुक आंबेडकर राईट मुव्हमेंट (फेम), संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच, रिपब्लिकन सेना, कायद्याने वागा, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकर सेन्टर फॉर जस्टिस एंड पीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएशन ऑफ़ इंजीनियर, नॅशनल फेडरेशन ऑफ़ पेट्रोलियम, एस. सी. एस. टी. एम्पोलीय असोशिएशन आदी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम येथे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होत असताना, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मरीन ड्राइव्ह चौपाटी परिसर, चर्चगेट पूर्व पश्चिम, तसेच वानखेडे स्टेडियमच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात आली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त असताना सुरक्षाला छेद देऊन संघटना कार्यकर्ते सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या साहित्यिक उर्मिला पवार, उषा अम्बोरे, आनंदराज आंबेडकर, राज असरोंडकर, कुंदा प्रमिला निळकंठ, सिद्दार्थ मोकले, रेवत कनिंदे, वैभव छाया, सुमेध जाधव, सुधीर ढवले, सुबोध मोरे, संजय रणदिवे, फिरोज मीठीबोरवाला, अॅड़. संघराज रुपवते, किशोर कांबळे, रेखा कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांची रवानगी येलो गेट पोलिस ठाण्यात आणि मरिन लाइन्य पोलिस ठाण्यात करण्यात आली.

October 31, 2014 in मुख्य पान
गतिमान कारभारासाठी सेवा हमी विधेयक आणणार - मुख्यमंत्री फडणवीस 0

गतिमान कारभारासाठी सेवा हमी विधेयक आणणार – मुख्यमंत्री फडणवीस

1414595499devendra-fadnavis
मुंबई – जनतेची कामं वेळेत व्हावी यासाठी राज्यात सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याची गेल्या १५ वर्षात विस्कटलेली घडी नीट बसवून महाराष्ट्राला नंबर वन बनवू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यापूर्वीही अनेकदा पत्रकार परिषद घेतल्या पण आज थोडे दडपण जाणवतंय असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेला पारदर्शी, गतिमान सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.  जनतेला कामांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या माराव्या लागू नये यासाठी सेवा हमी विधेयक राबवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या विधेयकामुळे जनतेला ठराविक वेळेत त्यांची कामं पूर्ण करुन घेण्याचा अधिकार मिळेल असेही त्यांनी सांगितले.

October 31, 2014 in मुख्य पान
राष्ट्रीय एकात्मता दौड बंधुभाव वाढीसाठी मोलाची ठरेल - राहुल रंजन महिवाल 0

राष्ट्रीय एकात्मता दौड बंधुभाव वाढीसाठी मोलाची ठरेल – राहुल रंजन महिवाल

DSC_3630
दौडमध्ये हजारो यवतमाळकरांचा सहभाग
यवतमाळ : देशाची एकात्मता आणि राष्ट्रीय एकसंघता टिकवून ठेवने आवश्यक आहे. त्यादृष्टीने एकात्मता दौड महत्वाची ठरणार असून यातून एकमेकांप्रती बंधुभावणाही वाढीस लागण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौड विसर्जीत झाल्यानंतर स्थानिक पोस्टल मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुळकर्णी,
अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नरेंद्र टापरे, श्री.सिरोडकर, डॉ.राजेश अडपावार, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोस्टल मैदान येथून सकाळी 8 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. त्यानंतर पोस्ट ऑफीस चौक, एलआयसी चौक, बसस्थानक, नेताजी चौक, पाचकंदील चौक, येरावार चौक अशी फिरत दौड पुन्हा पोस्टल मैदानात विसर्जीत झाली. या दौडमध्ये हजारो यवतमाळकर नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. तसेच विविध सामाजिक संघटना, शाळा, विद्यार्थी, एनसीसी व स्काऊट गाईडचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. संपुर्ण मार्गात दौडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेसोबतच स्वच्छतेचा संदेश दिला. हातात घेतलेले फ्लेक्स, जनजागृतीपर संदेश व वाहनावर लावण्यात आलेल्या बॅनरद्वारे हा संदेश देण्यात आला. सहभागींनी मोठ्याप्रमाणावर एकात्मतेचे नारे देऊन हा संदेश संपुर्ण यवतमाळकरांना दिला. विविध सामाजिक संघटनांनी वाजत गाजत तसेच संगीताच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविला. दौडमध्ये संघटनांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

October 31, 2014 in मुख्य पान
टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित 0

टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित

25-2g-sacm-302
नवी दिल्ली – टू-जी घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री ए.राजा, कणिमोळी यांच्यासह १९ जणांविरोधात आरोप निश्चित केले. पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने ए.राजा, कणिमोळी तसेच स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा, करीम मोरानी, करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मा, विनोद गोएंका यांच्यासह एकूण १९ जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
याप्रकरणी दिल्लीतील पटियाळा हाऊसमधील विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आपण निर्दोष असल्याचे सांगत याप्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या सर्वांनी न्यायालयाकडे केली आहे.

October 31, 2014 in मुख्य पान
फडणवीसांनी घेतले गडकरीचे आशीर्वाद 0

फडणवीसांनी घेतले गडकरीचे आशीर्वाद

1
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरविली. त्यावर मिठाईचा गोडवा जिभेवर  ठेवत ‘नितीनजी, डोक्यावर हात असू द्या, मी महाराष्ट्र घडवतो की नाही बघा.!’ असा आशीर्वाद फडणवीसांनी मागताच गडकरी सद्गदित झाले.

October 31, 2014 in मुख्य पान
६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार 0

६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार

rape-victim
बंगळुरू- बंगळुरूत शालेय विद्यार्थीवरील अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पूर्व बंगळुरूमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने शाळेतच सहा वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय शिक्षकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

October 31, 2014 in मुख्य पान
राज्यात 'देवेंद्रपर्व' सुरू 0

राज्यात ‘देवेंद्रपर्व’ सुरू

devendra-fadanvis
मुंबई – वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक अशा सोहळ्यात, खच्चून भरलेल्या गर्दीच्या साक्षीने विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या निमित्ताने भाजपचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीस यांचा शपथविधी झाला. या सोहळ्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती खास अशी ठरली. शिवसेनेने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, आज दुपारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव यांनी बहिष्काराची तलवार म्यान केली. गर्दीमुळे उद्धव यांना काहीसा उशीर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव तेथे पोहोचले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक धार्मिक गुरू, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
यांनी घेतली शपथ
कॅबिनेट मंत्री
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णु सावरा
राज्यमंत्री
दिलीप कांबळे, विद्या ठाकूर

October 31, 2014 in मुख्य पान
परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे सादर करा - सुप्रीम कोर्ट 0

परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे सादर करा – सुप्रीम कोर्ट

4704912094925880088_Org01_10_2012-scindia
नवी दिल्ली – परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवणा-या सर्व खातेधारकांची नावे उद्यापर्यंत बंद लिफाफ्यात कोर्टासमोर सादर करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. काळा पैशाप्रकरणी केंद्र सरकारने फक्त तीन खातेधारकांची नावे जाहीर केल्यावरुनही सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला काळा पैशावरुन धारेवर धरले. युपीए सरकारने काळा पैशाप्रकरणातील सर्व खातेधारकांची नावं जाहीर करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. आता एनडीए सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला विरोध दर्शवू शकत नाही असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. काळा पैसा दडवणा-या खातेधारकांची चौकशी झाल्यावरच नावे जाहीर करु अशी भूमिका अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तसेच केंद्र सरकारकडे या प्रकरणात तब्बल ५०० हून अधिक खातेधारकांची नावे मिळाल्याचे रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल यांनी केलेला युक्तीवादही सुप्रीम कोर्टाने अमान्य केला. तुम्ही आम्हाला सर्व खातेधारकांची यादी द्या, आम्ही त्यासंदर्भात पुढील चौकशीचे आदेश देऊ असे कोर्टाने सांगितले.
खातेधारकांची नावे जाहीर केल्यास गोपनीयतेचा भंग होईल असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले असता तुम्ही खातेधारकांचे हित बघू नका,हे सर्व विशेष तपास पथक बघेल असेही खंडपीठाने सुनावले.

October 28, 2014 in मुख्य पान
शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स 0

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

11_03_2014-11amit
मुंबई – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
१९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बच्चन यांनी ‘खून का बदला खून से लेंगे’ असे वक्तव्य केले होते.याप्रकरणी शिख फऑर जस्टिसचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने बच्चन यांना समन्स बजावले आहे.

October 28, 2014 in मुख्य पान
राज्याला विकासाकडे नेणार - फडणवीस 0

राज्याला विकासाकडे नेणार – फडणवीस

df-jpg

मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्याला पारदर्शी आणि विकासाकडे देणारे सरकार देऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर आज गोपीनाथ मुंडेंची आठवण येत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मंगळवारी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असून हे ‘जनतेचं सरकार’ असेल असे आश्वासन मी जनतेला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाला अनुसरुन राज्याचा कारभार चालेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणा-या सर्व आमदार आणि पक्ष नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.

October 28, 2014 in मुख्य पान
परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या 0

परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

images.jpeg00
अंबरनाथ : परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठीतसेच मौजमजेसाठी पैशांचीगरज भासल्याने तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईचीहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केलीअसून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
आरोपी वीरेंद्र नायडू (२२), अश्‍विनी सिंग (२२) आणि विशाल भोसले (१७) हे एकत्र शिकत होते. आदित्य उमरोटकर याच्यासोबत त्यांचीमैत्रीहोती. आदित्यची आई स्नेहल उमरोटकर (५२) या १८ ऑक्टोबरला घरात एकट्याच असताना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी चॅट करताना आदित्यची आई घरात एकटीअसल्याची माहिती काढली आणि त्याचे घर गाठले. क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्नेहल यांनी प्रतिकार केल्याने या तिघांनी कटरच्या साहाय्याने त्यांची हत्या केली. त्यांनी २0 हजार रुपये आणि मंगळसूत्र चोरले. मार्क वाढवून घेण्यासाठीआरोपींना पैशांची गरज असल्याने आणि मजा करण्यासाठी या पैशांचा वापर ते करणार होते.

October 28, 2014 in मुख्य पान
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 0

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

dev
मुंबई – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा परिचय
मुंबई –  फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुंबई – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा परिचय
मुंबई –  फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

राज्यातील १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे 0

राज्यातील १६५ आमदारांवर गंभीर गुन्हे

5740089282882737381_Mid
मुंबई – महाराष्ट्र विधानसभेतील २८८ नवनिर्वाचित आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ आमदारांवर चक्क हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, दरोडा व अपहणाचाही ठपका आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेच्या अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणविणारा भाजप गुन्हेगार आमदारांच्या यादीत आघाडीवर आहे. भाजपच्या १२२ आमदारांपैकी ४६जणांवर गुन्ह्यांची नोंद आहे. तर शिवसेनेच्या ६३ पैकी ३५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. संख्येच्या बाबतीत भाजप पुढे असला तरी गुन्हेगार आमदारांच्या टक्केवारीत शिवसेना पुढे आहे. शिवसेनेमध्ये सर्वाधिक ५६ टक्के आमदार गुन्हेगार आहेत. राष्ट्रवादीचे ४४ टक्के तर काँग्रेसच्या २४ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे. २००९च्या तुलनेत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आमदारांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.

October 24, 2014 in मुख्य पान
 गोळ्या झाडून एकाची हत्या 0

गोळ्या झाडून एकाची हत्या

02-murder-knife-600
मुंबई – मुंबईच्या डी. एन. नगर भागात गुरुवारी रात्री देवेन देसाई या व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावेळी झालेल्या हल्ल्यात अन्य एक जखमी झाला असून त्याच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या देवेन देसाई याने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मित्रांसाठी घरी पार्टी ठेवली होती. ही पार्टी सुरू असताना अचानक देवेनवर गोळीबार झाला. त्यानंतर त्यांच्यावर चाकूचे वार करण्यात आले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी पार्टीत असलेला देवेनचा मित्र संदीप कावा यालाही गोळी लागली. तो जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना देवेनच्या मित्रांवरच संशय असून या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

October 24, 2014 in मुख्य पान
 विदर्भात सहा शेतक-यांच्या आत्महत्या 0

विदर्भात सहा शेतक-यांच्या आत्महत्या

download-281
नागपूर- विदर्भातील सहा शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे विदर्भ जन आंदोलन समितीने गुरुवारी सांगितले. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात चार शेतक-यांनी तर अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एका शेतक-याने आत्महत्या केल्याचे समितीचे प्रमुख किशोर तिवारी यांनी सांगितले. या सर्व शेतक-यांनी बुधवारी आत्महत्या केल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत भाजपने शेतक-यांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन दिले होते. दुष्काळ, कापूस आणि सोयाबीनला योग्य बाजार भाव आदी प्रश्न भाजप सरकार सोडवणार असे वाटले होते. पण प्रत्यक्षात काहीच प्रयत्न होत नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला.  त्यामुळेच शेतक-यांच्या आत्महत्या सुरुच आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या नोंदीनुसार गेल्या वर्षभरात राज्यात तीन हजार १४६ शेतक-यांना आत्महत्या केल्या आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने म्हटले आहे.

October 24, 2014 in मुख्य पान
दहशतवादी प्रशिक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना अटक 0

दहशतवादी प्रशिक्षणासाठी निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना अटक

2014-10-24~inditer_ns
हैद्राबाद,- दहशतवादी प्रशिक्षणासाठी अफगाणिस्तानमधील अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जायला निघालेल्या महाराष्ट्रातील दोघा तरुणांना हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही तरुण उमरखेड आणि हिंगोलीतील रहिवासी असून सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे ते दोघे दहशतवादी संघटनेच्या हस्तकांच्या संपर्कात आले होते.
उमरखेडमधील व्यावसायिक शहा मुदासीर उर्फ तल्हा (वय २५) आणि हिंगोलीत राहणारा शोएब अहमद खान उर्फ तारिकभाई (वय २४) हे दोघे सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील तरुणांशी संपर्कात आले होते. मुदासीर हा सिमीशी संलग्न असलेल्या असोसिएशन ऑफ इंडियन मायनोरिटी स्टुडंट या संघटनेचा सदस्य होता. तर शोएब हा इंडियन मुजाहिदीनशी संबंधीत संघटनेचा सदस्य होता. इंटरनेटद्वारे ओळख झालेल्या अफगाणमधील तरुणाने या दोघांना अफगाणमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी यावे असे सांगितले होते. तर पाकिस्तानमधील तरुणाने या दोघांना स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या साधनांपासून बाँब कसा तयार करता येईल यासंदर्भातील माहिती पुरवली होती. अफगाण व पाकमधील तरुणाच्या माध्यमातून मुदासीर व शोएब हे दोघे हैद्राबादमधील मोथासिम बिल्लाहच्याही संपर्कात आले होते. विशेष म्हणजे ही ओळखही फेसबुकच्याच माध्यमातून झाली होती. मोथासिमने या दोघांना अफगाणला अल कायदाच्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन इस्लामी देश बनवण्याचे प्रशिक्षण घ्या असे सांगत त्यासाठी आर्थिक मदत करायची तयारीही दर्शवली होती. हैद्राबादमध्ये मोथासिमला भेटण्यासाठी येताच पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलिस चौकशीत या नेटवर्कविषयीची नेमकी माहिती उघड होईल असे हैद्राबाद पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून जिहादविषयीचे लेख, पासपोर्ट, दहशतवादी प्रशिक्षणाची सीडी व रोख रक्कम जप्त केली आहे.

October 24, 2014 in मुख्य पान
ऑस्कर पिस्टोरियसला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा 0

ऑस्कर पिस्टोरियसला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Oscar Pistorius
डरबन – प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडणारा दक्षिण अफ्रिकेचा प्रसिध्द अपंग धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयाने पिस्टोरियसला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. गेल्यावर्षी व्हॅलटाईन डे च्या दिवशी घरात असताना ऑस्करने प्रेयसी रीवा स्टीनकॅंम्पवर चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या होत्या. यात रीवाचा मृत्यू झाला होता.
न्यायालयाने ऑस्करची पूर्वनियोजित हत्येच्या आरोपातून सुटका केली होती मात्र सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. फिर्यादी पक्षाने ऑस्कला दहावर्षांसाठी तुरुंगवासात पाठवण्याची मागणी केली होती तर, बचावपक्षाने कमीत कमी शिक्षा म्हणून नजर कैदेची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ऑस्करला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
दोन्ही पाय नसतानाही यशस्वी धावपटू बनणारा ऑस्कर क्रीडा जगतात ब्लेड रनर म्हणून ओळखला जातो. अपंगांसाठी असणा-या पॅराऑलिंपिकमध्ये चमक दाखवल्यानंतर २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत पिस्टोरियसला प्रवेश मिळाला. तेथे त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.लंडन ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्याने उपांत्यफेरीही गाठली होती. मागच्यावर्षी घरात असताना त्याने प्रेयसीला चोर समजून तिच्यावर गोळया झाडल्या यात तिचा मृत्यू झाला. कायद्याची पदवीधर असणारी २९ वर्षीय रीवा पेशाने मॉडेल होती.

October 21, 2014 in मुख्य पान
शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपच्या हिताशी तडजोड नाही 0

शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी भाजपच्या हिताशी तडजोड नाही

sena-bjp-flag
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तुलनेत निम्म्या जागा मिळवूनही शिवसेनेला १९९५ च्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार सत्तेत अर्धा वाटा हवा आहे. सन्मानजक प्रस्ताव मिळाला तर, पाठिंब्याचा विचार करु असे सांगून शिवसेनेने तसे संकेतही दिले आहेत.
मात्र शिवसेनेसमोर कुठेही न झुकता आपल्या अटी-शर्तीनुसार सरकार स्थापन करण्याची भाजपची रणनिती आहे. दिल्लीतील भाजप नेत्यांनी शिवसेनेसमोर गुडघे न टेकण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही. महाराष्ट्रात आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला तरी, आम्ही दिल्लीत अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितला नाही. मुंबई महापालिकेत आमच्या पाठिंब्याने शिवसेनेचा महापौर आहे. यावेळी महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना आम्ही आमच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे.
यामुळे शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर, राष्ट्रवादीचा बाहेरुन पाठिंबा घेण्याचा पर्याय भाजपने खुला ठेवला असून, अपक्षांना साथीला घेऊन, भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करु शकते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्याच्या प्रक्रियेसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून मुंबईत येणार होते. मात्र अचानक त्यांचा हा मुंबई दौरा रद्द करण्यात आला. ते आता दिवाळीनंतर मुंबईत येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक १२२ जागा मिळाल्या आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने ६२ जागा जिंकल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला आणखी २३ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

October 21, 2014 in मुख्य पान
दलित हत्याकांड; एकाच कुटुंबातील तिघांची हत्या 0

दलित हत्याकांड; एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

02-murder-knife-600
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील दलित हत्याकांडांच्या घटना सुरूच असून ऐन दिवाळीत पाथर्डी तालुक्यात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आई, वडील आणि तरुण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले आहेत. खुनाचे कारण तसेच आरोपींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काही महिन्यांपूर्वीच अशी घटना घडली होती. या दोन्हींमध्ये काहीअंशी साम्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाथर्डी तालुक्यातील जवखडे खालसा या गावातील जाधव वस्तीत ही घटना घडली. तेथे संजय जगन्नाथ जाधव (वय ४२), जयश्री संजय जाधव (वय ३८) व सुनील संजय जाधव (वय १९) हे तिघे राहतात. त्यांचे तिघांचेच कुटूंब आहे. जाधव यांच्या मालकीची एक एकर शेती आहे. त्यांचा मुलगा सुनील हा मुंबईत एका दूध डेअरित नोकरी करतो. आठ दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यांचे घर गावापासून पाच किलोमीटरवर शेतात आहे. आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर शेतात काम करणाऱ्यांनी जाधव यांच्या नातेवाईकांना कळविले. त्यांनी येऊन पाहिले असता घरात कोणीही नव्हते. घराच्या ओट्यावर थोडेसे रक्त सांडलेले होते. त्यामुळे नातवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव कुटुंबियांचा शोध सुरू केला. पाथर्डी आणि नगरच्या रुग्णालयांत चौकशी करण्यात आली. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही. सायंकाळी जाधव यांच्या वस्तीपासून पाचशे फुटावर असलेल्या एका जुनाट, पडीक विहिरीत मृतदेहांचे तुकडे आढळून आले. गोणापटावर टाकून मृतदेह विहिरीजवळ फरपटत आणल्याचे आढळून आले. याची माहिती मिळाल्यावर पाथर्डीचे पोलिस तेथे गेले. तोपर्यंत ग्रामस्थ संतप्त झाले होते. वरिष्ठ पोलिस अधिकारी आल्याशिवाय मृतदेहांचा पंचनामा करून दिला जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे नगरहून सायंकाळी पोलिस अधिकारी रवाना झाले. खुनाचे कारण, यातील आरोपी यांच्याबद्दल आद्याप माहिती मिळालेली नाही. रात्री या तिघांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा संशय आहे. दलितांवरील अत्याचारांच्या घटनांसंबंधी नगर जिल्हा सतत चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी सोनईत घडलेले दलित हत्यांकाड, काही महिन्यांपूर्वी खर्डा येथील दलित युवकाची हत्या यानंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण दलित कुटुंबच संपविण्य़ाची घटना घडल्याने पुन्हा एकदा नगर जिल्हा चर्चेत आला आहे. निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आणि ऐन दिवाळीतच ही घटना घडली आहे. याचे पडसाद पुन्हा एकदा राज्यभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

October 21, 2014 in मुख्य पान
२१ वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह 0

२१ वर्षानंतर सापडला जवानाचा मृतदेह

tukaram-patil
नवी दिल्ली – तब्बल २१ वर्षानंतर सियाचीन ग्लेशिअरमध्ये मरण पावलेल्या भारतीय जवानाचा मृतदेह सापडला आहे. तुकाराम पाटील असे या मृत जवानाचे नाव असून, ते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सियाचीन ही जगातील सर्वात उंच युध्दभूमी आहे.
फेब्रुवारी १९९३ मध्ये तुकाराम पाटील सियाचीनमधील एका हिमदरीत पडले होते. हवाईमार्गे मिळणारी मदत स्वीकारत असताना, ते मार्ग भरकटून एका हिमदरीत पडले. यावेळी त्यांच्यासोबत असणा-या जवानांनी त्यांना हाताला धरुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र हातातील बर्फाचे ग्लोव्हज निसटले आणि पाटील कित्येक फूट खोल दरीत पडले. यानंतर त्यांचा शोध घेण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
मागच्या रविवारी लष्कराचे जवान गस्त घालत असताना, त्यांना तुकाराम पाटील यांचा गोठलेला मृतदेह सापडला. महत्वाचे म्हणजे अत्यंत थंड वातावरणामुळे तुकाराम पाटील यांचा मृतदेह खराब झालेला नाही. त्यांच्या खिशातील पत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन त्यांची ओळख पटली. त्यांच्या भावाचाही १९८७ मध्ये सियाचीनमध्ये तैनात असताना मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही.

October 18, 2014 in मुख्य पान