पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 31st, 2015

  आंबेडकरी कवी केतन पिंपळापुरे यांचे निधन 0

आंबेडकरी कवी केतन पिंपळापुरे यांचे निधन

ketan p

यवतमाळ –  प्रसिद्ध आंबेडकरी कवी, विचारवंत, लेखक, पत्रकार, चित्रकार केतन पिंपळापुरे यांचे आज शुक्रवारी ३१ जुलै रोजी ४.३० वाजता हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ५० वर्षाचे होते.

राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर हे त्यांचे मूळगाव. गत काही दिवसापासून कावीळने आजारी असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज केतन पिंपळापुरे यांची प्राणज्योत मालवली. संवेदनशील कवी म्हणून उभ्या महाराष्टÑाला परिचित असलेल्या पिंपळापुरेंनी आपल्यातील कार्यकर्त्याच्या मूळ पिंडाला तडा जाऊ दिला नाही. आतापर्यंत त्यांचे सूर्यकंकण, मार्शलरेस, डेमोफून, मकाबी, हेमलॉक असे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. मकाबी या काव्यसंग्रहाला राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्धी मिळाली. मकाबीच्या निर्मितीबद्दल त्यांना महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार, बाबा आमटे पुरस्कार, वादळवारायासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नोबल ट्रूथ (महाकाव्य), वेटींग फॉर व्हीसा ही साहित्यकृती प्रकाशनाच्या वाटेवर होती. ‘आत्यंतिक भौतिकतेच्या आहारी जाऊन मूल्यांची कत्तल करीत निघालेल्या या जगाला करीत निघालेल्या या जगाला कुठंतरी थांबवच लागणार आहे. ते जिथे थांबेल त्या शतकाच्या वेशीवर माझाी कविता ओंजळीत करुणेची फुल घेऊन उभी असेल, इतका उदंड विश्वास माझ्या प्राणात भरलेला आहे’. एवढा आशावादी कवी होता. नामांतर आंदोलन, रिडल्स, घाटकोपर, खैरलांजी आदी आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचे केंद्रीय मार्गदर्शक म्हणून काम बघत होते. नागपूर येथून प्रकाशित होणाºया दैनिकात पुरवणी संपादक म्हणून कार्यरत होते. साहित्यक्षेत्रातील अनेक नवोदीत कविंना प्रोत्साहीत करण्याचे काम केतन पिंपळापुरे यांनी केले. त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता धडकताच मित्रपरिवार शोकसागरात बुडाला. आंबेडकरी चळवळीला उर्जा देणार लेखन करणारा उमदा लेखक, मित्र गमविल्याबद्दल सर्वच स्तरातूळ हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर उद्या १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा कॅसाब्लांका, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.

July 31, 2015 in मुख्य पान