पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 10th, 2015

ट्रक अपघातात दोन ठार

यवतमाळ, दि. १०  – भरधाव ट्रक नाल्यात पलटी झाल्याने दोन जण ठार झाल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे आज सकाळी ६ वाजता घडली. चालक संदिप महेश यादव (२१) रा. घुगरी कसाई शिवणी, सुनील दिम्मु यादव (२६) रा. ठामरी मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहे. जबलपूर येथून एम.पी. २० / एच.बी. ४९१५ क्रमांकाचा ट्रक हैद्राबाद येथे सिमेंट विट घेऊन जात होता. अशातच पांढरकवडा येथून चार किमी अंतरावर असलेल्या कोंघारा या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला. यामध्ये चालक संदिप यादव, सुनील यादव हे दोघेंही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, खंडागळे, राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतकांना बाहेर काढून शवविच्छदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

July 10, 2015 in विदर्भ

बाभूळगावच्या सराफा व्यावसायीकाला लुटले

यवतमाळ , दि. १० – दुचाकीने जाणाºया सराफा व्यावसायीकावर प्राणघातक हल्ला करून सोन्या चांदीचे दागिन्यासह मुद्देमाल लुटल्याची घटना आज १० जलुै रोजी रात्री ८ वाजताच्या बाभूळगाव पंचायत समिती जवळ घडली.
सराफा व्यावसायीक सुधीर देविदास रोकडे (४०) यांचे मेनलाईनमध्ये दुकान आहे. त्याच्याकडे उमेश रोकडे (२७) हा कामगार म्हणून कार्यरत आहे. १० जुलै रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते दुचाकीने घरी जात होते. अशातच पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ पाच ते सहा लुटारुंनी दुचाकी अडवून रोकडे यांच्यावर फायटर हल्ला वढविला. ते खाली पडताच त्यांच्या जवळील पिशवीतील १० ते १५ किलो चांदी व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींची शोधमोहीम सुरू केली.

 

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरेंची निवड 0

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरेंची निवड

2015-07-10-marathi_ns

पुणे, दि. १० – स्वांत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे होणा-या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ५ व ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे साहित्य संमेलन पार पडेल असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक असणा-या मोरे यांनी सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरग, काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद अशी अनेक पुस्तके लिहीली आहेत.
या संमेलनाला निधी देण्यास शासनाने दिलेला नकार, कॅनडाचे संमेलन रद्द करण्याची ओढावलेली नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून आलेला प्रस्ताव, आर्थिक सहकार्याशिवाय आयोजकांची संमेलन घेण्याची असमर्थता असा इतिहास असताना हे संमेलन होणार, की नाही? याबाबत साहित्य वर्तुळात उत्सुकता होती. मात्र हे संमेलन घेण्यावर महामंडळाने शिक्कामोर्तब करत ते अंदमान घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

 

July 10, 2015 in मुख्य पान
भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी विजय 0

भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी विजय

AP7_10_2015_000199A

हरारे – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत शुक्रवारी झिम्बाब्वेवर ४ धावांनी मात करताना भारताने तीन लढतींच्या मालिकेत विजयी सलामी दिली. मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पाहुण्यांचा हा पहिलाच विजय आहे. अंबाती रायुडूने दमदार शतकासह स्टुअर्ट बिन्नीसोबत केलेली १६० धावांची भागीदारी भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ७ बाद २५१ धावा करता आल्या. कर्णधार इल्टन चिगुंबुराच्या (१०४) नाबाद शतकामुळे यजमानांनी चुरस दिली. त्याला सिकंदर रझा (३७) आणि हॅमिल्टन मॅसॅकद्झाची (३४) चांगली साथ लाभली. या त्रिकुटाच्या चांगल्या फलंदाजीनंतरही भारताने पारडे जड वाटत होते.
मात्र कर्णधार चिगुंबुराने विकेट कायम ठेवल्याने यजमानांची धुगधुगी कायम होती. १८ चेंडूंत जिंकण्यासाठी ३२ धावा हव्या असताना चिगुंबुरा-क्रीमरने भुवनेश्वर कुमारच्या आठव्या आणि डावातील ४४व्या षटकात १४ धावा वसूल केल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. धवल कुलकर्णीने त्याच्या षटकात ८ धावा दिल्याने शेवटच्या षटकात सामना गेला. ६ चेंडूंत १० धावांची असताना भुवनेश्वरने मागील चुका टाळताना फक्त ५ धावा देत भारताला ४ धावांनी जिंकून दिले.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५५ धावांची मजल मारली. त्याचे श्रेय अंबाती रायुडूसह अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला जाते. रायुडूने ४६.४ षटके मैदानावर टिकून राहताना नाबाद १२४ धावांची जबाबदार खेळी केली.
१३३ चेंडूंमधील त्याच्या दुस-या शतकात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रायुडूला बिन्नीची सुरेख साथ लाभली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना भारताला अडीचशेपार पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. बिन्नीने ७६ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ७७ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याची कारकीर्दीतील ही सर्वाधिक खेळी आहे.
२५ षटकांत निम्मा संघ ८९ धावांत परतल्यानंतर भारत प्रतिस्पर्ध्यासमोर अडीचशेहून अधिक धावा करेल, असे वाटले नव्हते. मात्र रायुडू आणि बिन्नीमुळे पुढील २५ षटकांत १६६ धावा निघाल्या. या जोडीने २४.३ षटके खेळून काढताना विक्रमी १६० धावा जोडल्या.
भारतातर्फे झिम्बाब्वेत झालेली सहाव्या विकेटसाठीची ही सर्वाधिक भागीदारी आहे. पाहुण्या फलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत ९० धावा झोडपून काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा झिम्बाब्वेचा कर्णधार इल्टन चिगुंबुराचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. तिस-याच षटकात मध्यमगती ब्रायन व्हिटोरीने सलामीवीर मुरली विजयला (१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्णधार अजिंक्य रहाणेने (३४) ‘वनडाऊन’ रायुडूसह दुस-या विकेटसाठी ५१ धावा जोडताना भारताला सावरले तरी अजिंक्यनंतर मनोज तिवारी (२), रॉबिन उथप्पा (०) आणि केदार जाधवमध्ये (५) बाद होण्याची स्पर्धा लागल्याने ५ बाद ८७ धावा अशी भारताची दयनीय अवस्था झाली.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवरील दवाचा फायदा यजमानांच्या गोलंदाजांनी उठवला. त्यात आघाडीच्या फलंदाजांच्या चुकांची भर पडली. मात्र झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना दुस-या टप्प्यात दिशा आणि टप्पा राखता आला नाही. यजमानांतर्फे चामू चिभाभा आणि डोनाल्ड टिरिपॅनो (प्रत्येकी २ विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
संक्षिप्त धावफलक : भारत – ६ बाद २५५(रायूडू नाबाद १२४, बिन्नी ७७, चिभाभा २५-२) वि. झिम्बाब्वे – ७ बाद २५१(चिगुंबुरा नाबाद १०४, पटेल ४१-२, बिन्नी ५४-२). निकाल : भारत ४ धावांनी विजयी. तीन लढतींच्या मालिकेत १-० आघाडी. सामनावीर : अंबाती रायुडू.

 

July 10, 2015 in क्रीडा