

अमरावती (विशेष प्रतिनिधी) – येथील एका महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान शाखेत शिकत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका १९ वर्षीय युवतीवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन नराधमांनी हायवेलगतच्या झुडपात सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली.
सतीश शिवनारायण जयस्वाल (३२), रूपेश हिम्मतराव वडतकर (३०), दोन्ही रा.रहाटगाव अशी आरोपींची नावे आहे. गुरुवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपींनी स्कुटीपेप दुचाकीवर जाणाºया युवकयुवतीला अडविले. दोघांना हायवेलगतच्या मोकळया परिसरात निर्वस्त्र करून तीन तास डांबून ठेवले. त्यानंतर नराधमांनी युवकाला बेदम मारहाण करून युवतीवर सामुहिक बलात्कार केला. हॉटेल गौरीइनलगतच्या हायवेवर अंगावर शहारे आणणारी ही घटना घडली. पीडित युवती मुळची यवतमाळ जिल्ह्यातील असून, तिचा मित्र रहाटगाव भागातील रहिवासी आहे. तो अभियांत्रिकीला शिकत आहे. रहाटगाव भागात राहणाºया वर्गातील मैत्रीणीच्या माध्यमातून पीडित युवतीची त्या युवकासोबत मैत्री झाली होती. परीक्षेचा निकाल लागल्याने पीडित युवती गुरुवारी सकाळी विद्यापीठातून गुणपत्रिका घेण्यासाठी अमरावती शहरात आली. सायंकाळच्या सुमारास ती प्रथम मैत्रीणीला भेटली आणि त्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास मित्रासोबत स्कुटीपेप दुचाकीने हायवेवर फिरायला गेली. दोघांनी गौरीइनच्या बाजूला असलेल्या हॉटेल आदित्य फॅमेली रेस्टॉरेंटमध्ये स्नॅक व कोल्ड्रींग घेतले. त्यानंतर ९ वाजेच्या सुमारास दोघेही स्कुटीने गौरीइन ते जुना टोलनाका असलेल्या महामार्गावर विद्यापीठाच्या दिशेने निघाले. जुन्या टोलनाक्याच्या ५० मीटर अलीकडे आरोपी सतीश व रूपेश हे रस्त्यालगत दबा धरून बसलेले होते. त्यांनी टोलनाक्याच्या दिशेने दूर अंतरावर दुचाकी उभी केली होती. आरोपींनी युवकयुवतीची दुचाकी अडविली आणि ते पळून जावू नये म्हणून त्यांनी दुचाकीची चाबी काढली. त्यानंतर आरोपींनी दोघांना फरकटत रस्त्यालगत असलेल्या मोकळया परिसरात ५० मीटर आत नेले. कुणाला शंका येवू नये म्हणून आरोपींनी स्कुटी अंधारात उभी करून ठेवली होती. अतिशय मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपींनी अगदी सिनेस्टाईल युवकयुवतीची रॅगींग घेतली. युवकाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. युवक पळून जावू नये म्हणून आरोपींनी त्याचे कपडे दूर अंधारात फेकून दिले. तसेच दोघांचे मोबाईल हिसकावून आपल्याजवळ ठेवले. त्यानंतर आरोपींनी आळीपाळीने युवतीवर सामुहिक बलात्कार केला. हायेवर तब्बल तीन तास आरोपींचा हा प्रकार सुरू होता. रात्री १२ वाजेच्या सुमारास आरोपी गेल्यानंतर युवकयुवती कसेबसे कपडे घालून हायवेवर आले आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच नांदगावपेठ व गाडगेनगर पोलिसांसह नाईटगस्तीवर असणारे सर्व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने दोघांना रूग्णालयात दाखल केले असून १२ तासाच्या आत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
Archive for June 21st, 2014
0









