
कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
यवतमाळ – खरीप हंगामात कोट्यवधींचे बियाणे विकले जाणार आहे. याच संधीचा फायदा लाटण्यासाठी काही बोगस कंपन्यांनी नवीन वाण बाजारात आणले असून शेतकºयांच्या माथी मारल्या जात आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने शहरातील एका घराची झाडाझडती घेतली असता तब्बल चार लाख रुपये किंमतीचे बोगस बीटी कपाशी बियाणे जप्त केले. ही कारवाई धामणगाव रोडवरील चांदोरेनगरातील संजय पंढरीनाथ परडखे यांच्या घरी करण्यात आली. या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे बाजारात दाखल झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. काही बोगस बीटी वाणाला कृषी आयुक्तालयाने विक्रीची परवानगी दिली नाही. तरी देखिल हे बियाणे कृषी केंद्रातून विकल्या जात आहे.
शेतकºयांची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. कृषीचा सर्वात मोठा हंगाम म्हणून खरीपाकडे बघितल्या जाते. याच हंगामात बियाण्यांची सर्वात जास्त उलाढाल होते. याचा फायदा लाटण्यासाठी बिटीच्या नावाखाली बियाणे बाजारात दाखल झाले आहे. त्यामध्ये ७५ टक्क्याच्यावर वाण हे कपाशीचे आहे. बाजारात विक्रीस आलेले सर्वच वाण प्रमाणित नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषी आयुक्तालयाने कृषी विभागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. बीटीला आयुक्तालयाच्या प्रमाणपत्रानंतर विक्रीची परवानगी देण्याच्या सूचना आहेत असे असतानाही काही कंपन्यांनी नवे वाण परवानगीशिवाय बाजारात आणले आहे अथवा आणल्या जात आहे.
चांदोरेनगरातील संजय परडखे याच्या घरी बोगस बिटी बियाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची ‘टिप’ कृषी विभगाच्या भरारी पथकाला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठून घराची झाडाझडती घेतली असता बादशहा बिटी कपाशीचा साठा आढळून आला. दोन रुममध्ये हा साठा लपवून ठेवला होता. कुणाच्याही नजरेस साठा पडणार नाही,याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती. मात्र भरीरी पथकाने टाकलेल्या धाडीत बोगस बिटीच्या १४ बॅग जप्त करण्यात आल्या. या बियाण्यांची किंमत ३ लाख ४३ हजार १७० एवढी आहे. याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षण अधिकारी तथा कृषी अधीक्षक संजय दत्तात्रय देशमुख यांच्या तक्रारीवरून संजय परडखे याच्याविरुध्द अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची माहिती सुरू होती.
Archive for June 10th, 2014
0
लाखोंचा बोगस बीटी बियाणे साठा जप्त
0
मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशीचे आदेश

नवी दिल्ली- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची ‘सीबीआय’द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ‘सीबीआय’मधील सूत्रांनी सांगितले.
सध्या हे प्रकरण कार्मीक आणि प्रशिक्षण विभागाकडे पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विभाग असून यासंदर्भात अधिकृत आदेश दिल्यानंतर ‘सीबीआय’ या अपघाताचा तपास सुरु करेल असे सूत्रांनी सांगितले. मुंडेंच्या अपघाताप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ‘सीबीआय’ दिल्ली पोलिसांकडून हे प्रकरण आपल्या हाती घेईल. मागच्या आठवडयात तीन जून रोजी गोपीनाथ मुंडे दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गा़डीला समोरुन आलेल्या इंडिका गाडीने धडक दिली होती. या अपघातात मुंडे यांचे निधन झाले होते. मुंडे यांच्या मानेला आणि यकृताला गंभीर मार लागला होता. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. हा अपघाती मृत्यू असला तरी, हा अपघात नसून, घातपात असल्याची अनेकांना शंका अनेकांनी व्यक्त केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही संतप्त झालेल्या बीडच्या जनतेने सर्वपक्षीय नेत्यांच्या गाडयांना घेराव घालत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आणि केंद्री मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील अन्य भाजपच्या नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यासंदर्भात मंगळवारीच महाराष्ट्र भाजपचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.
0
कराची विमानतळावर पुन्हा दहशतवादी हल्ला

कराची – पाकिस्तानमध्ये कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन दिवसात दुस-यांदा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी विमानतळ सुरक्षा पथकाचा कॅम्प असलेल्या परिसरात एका चौकीवर तुफान गोळीबार करत सहा दहशतवाद्यांनी हल्ला सुरू केला. दहशतवादी हल्ल्यात पाचजण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
याआधी रविवारी रात्री उशिरा दहा दहशतवाद्यांनी विमानतळावर हल्ला केला होता. सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात तब्बल १३ तास चाललेल्या चकमकीअंती दहा दहशतवाद्यांसह ३७ जण ठार झाले, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेने दिली. या घटनेनंतर आज (मंगळवारी) पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. रविवारी हल्ला करणा-या दहशतवाद्यांचा उद्देश एखादे विमान ताब्यात घेऊन आपल्या मागण्या मान्य करुन घेण्याचा होता. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे आज दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या विमानतळ सुरक्षा पथक (एएसएफ) आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे.
0
मुजफ्फरनगरमध्ये भाजप नेत्याची हत्या

मुजफ्फरनगर – उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर शहरात भाजप नेते ओमवीर सिंह यांचा गोळ्या घालून खून करण्यात आल्याची घटना आज, मंगळवारी घडली आहे. हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत ओमवीर हे मुजफ्फरनगर येथील मीरपूरचे शहर भाजप अध्यक्ष होते. या घटनेनंतर यूपीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी ग्रेटर नोएडात भाजप नेते विजय पंडित यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. अखिलेश यादव यांनी बोलाविलेल्या बैठकीत राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आयजी, डीआयजी आणि डीएसपी यांना बोलाविण्यात आले आहे. उशिरा रात्रीपर्यंत ही बैठक चालणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दावर या बैठकीत सर्व बाजुने चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सचिव आलोक रंजन यांनी दिली.









