
यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागनेगेल्या तीन दिवसापासून ठिकठिकाणी अवैद्य दारुठिकाणेव हातभट्टींवर धाडी टाकण्याची मोहीम राबविली असून दोन गावात ऐकूण 9 ठिकाणी टाकलेल्या धाडी 76 हजाराचा मोहा सडवा आढळून आला. दारुभट्टीचेसाहित्य जप्त करण्यात आले असून सडवा नष्ट करण्यात आला आहे.
जिल्हधिकारी अश्विन मुद्गल यांच्या निर्देशानुसार येथेनव्यानेच रुजूझालेलेउत्पादन शुल्क विभागाचेअधीक्षक पराग नवलकर यांच्या आदेशावरुन भरारी पथकानेया धाडी केल्या. या पथकात शहर व ग्रामीण पथक व निरिक्षकांचा समावेश होता. यवतमाळ तालुक्यातील खरुला शिवारात नाल्याच्या काठी वेगवेगळ्या सहा ठिकाणी पथकानेधाडी केल्या. या धाडीत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून हातभट्टीसाठी वापरण्यात येणारेरसायन व 23970 रुपयाचा मोहा सडवा जागीच नष्ट करण्यात आला. बोरगाव शिवारात नदीच्या काठी तीन ठिकाणांवर धाड टाकूण 100 लिटर क्षमतेचेप्लॅस्टीक ट्रम जप्त करुन हातभट्टी रसायण, मोहा सडवा नष्ट करण्यात आला. त्यात 20 लिटरचेट्यूब मोहा सडवा 2320 लिटर जागीच नष्ट करण्यात आली. त्याची किंमत 52 हजार 160 रुपयेइतकी आहे. या धाड मोहीमेच्या सत्रात उत्पादन शुल्क विभागचेप्रभारी निरिक्षक जुमडे, दुय्यम निरिक्षक सुर्वे, सहाय्यक दुय्यक निरिक्षक कुटेमोटे, जवान पठान, रामटेके, .कुळसंगे, वर्षा पवार यांनी ही कार्यवाही केली. यापुढेही धाडसत्र कायम सुरुराहणार असल्याचेअधीक्षक पराग नवलकर यांनी कळविले आहे.
Archive for June 12th, 2014
0
उत्पादन शुल्क विभागाच्या नऊ हातभट्टीवर धाडी
0
तवेराची ट्रकला धडक, आठ ठार

बीड – औरंगाबादकडे निघालेल्या तवेरा गाडीला गुरुवारी सकाळी नामलगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील सर्व मृत अंबाजोगाईचे रहिवासी आहेत. तवेरागाडीने हे सर्व जण बीडमार्गे औरंगाबादला जात होते.
नामलगावजवळ भरधाव वेगात असलेल्या तवेराचा टायर पंक्चर झाला आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, तवेरातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, दोघांनी उपचार सुरु असताना प्राण सोडला. पहाटे अंबेजोगाईवरुन हे सर्व जण औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. सय्यद सय्यल सलीम सय्यद अब्बास, सय्यद सुलताना सय्यद करीम, सनाज सय्यद सलीम, सय्यद मजहर सय्यद जानउल्लाह, सय्यद करीम सय्यद अली , सय्यद अलीशा सय्यद कलीम , शेख जेबीया शेख अजहरूद्दीन, सय्यद जुबीया सय्यद मुजीब यांचा या अपघातात मृत्यू झाला तर, सय्यद सादेक सय्यद सलीम आणि शेख अजहरूद्दीन शेख सत्तार हे दोघे जखमी झाले आहेत.
0
3500 रुग्णांनी घेतला जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ

नवीन शिधापत्रिकाधारकांनाही मिळणार योजनेचा लाभ
यवतमाळ: जिल्ह्यात 2 डिसेंबर 2013 पासून कार्यान्वीत झालेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत जिल्ह्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयात 757 तसेच राज्यातील इतर नामांकीत रुग्णालयात 2808 अशा एकूण 3565 रुग्णांनी उपचार घेतलेआहेत. आता नव्यानेशिधपत्रिका कार्ड मिळवलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभार्थी रुग्णांसाठी श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथे 500 खाटांची व्यवस्था आहे. जिल्ह्यात मान्यताप्राप्त असलेल्या साईश्रध्दा मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, यवतमाळ 30, तावडेरुग्णालय, यवतमाळ 50, राठोड हास्पीटल शिशूरुग्णालय,यवतमाळ 31, शांती ऑर्थेपेडीक रुग्णालय, यवतमाळ 25, क्रिष्णा बाल रुग्णालय, पुसद 30, लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, पुसद 100, सुगम रुग्णालय वणी 100 खाटांची व्यवस्था उपचारासह उपलब्ध आहे. 31 ऑक्टोंबर 2013 पूर्वीचेराशनकार्ड ज्यांच्याकडेहोतेत्यांना तेया योजनेचेलाभार्थी होते. यानंतरही पिवळे, केशरी अथवा अन्नपूर्णा, अत्योदय योजनेची शिधापत्रिका असलेल्या कुटुंबाला राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ दिला जात आहे. आता शिधापत्रिका मिळाल्याच्या दिनांकाची अट शिथील करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 68 हजार 175 आरोग्य पत्रिकांचेपोष्ट ऑफीस, सेतू, संग्राम केंद्र आदी माध्यमाव्दारेवितरण लाभार्थींना करण्यात आले. तसेच जिल्ह्यात दिग्रस येथेभव्य आरोग्य शिबीरासह मुकुटबन, नेर, यवतमाळ, दारव्हा कवडीपूर, पुसद, मारेगाव, कळंब, वणी, बाभुळगाव, पांढरकवडा, महागाव यैथेशिबीरेघेण्यात आली. योजनेच्या अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 38 क्रमांकाच्या कक्षात संपर्क साधावा, असेया योजनेच्या समन्वयकांनी कळविलेआहे. या योजनेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचेआवाहन योजनेचेनोडल ऑफीसर तथा अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारेयांनी केले आहे.
0
यूपीएससीचा निकाल जाहीर, गौरव अग्रवाल देशात पहिला

मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. गौरव अग्रवाल याने संपूर्ण देशातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर मनिष शर्मा आणि रचित राज यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावण्यात यश मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विपिन इटणकरने देशातून १४ वा क्रमांक पटकावला आहे. यादीत पहिल्या २५ जणांमध्ये १५ मुलांचा आणि १० मुलींचा समावेेश आहे.
देशातील एकूण ११२२ उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यंदाच्या निकालात महाराष्ट्रालाही मोठे यश मिळाले आहे. राज्यातून एकूण ८० विद्यार्थींना यश मिळाले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून विविध पदासांठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ११२२ उमेदवारांना यश मिळाले आहे. यामध्ये आयएएसच्या १८० जागा, आयपीएसच्या १५०, आयएफएसच्या ३२, सेंट्रल सर्व्हिस(ए)च्या७१० आणि सेंट्रल सर्व्हिस(बी)च्या १५६ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेत यशस्वी झालेल्या एकूण ११२२ उमेदवारांपैकी सर्वसाधारण गटातील ५१७, मागासवर्गीय जातीतील ३२६, अनुसूचित जाती१८७ आणि अनुसूचित जमातीतील ९२ उमेदवारांना यश मिळाले आहे. डिसेंबर २०१३ मध्ये ही यूपीएससीची लिखित परीक्षा घेण्यात आली होती. तर एप्रिल -जून दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
यूपीएससीत यश मिळवलेले महाराष्ट्रातील उमेदवार
विद्यार्थ्यांचे नाव रँक
बिपीन विठोबा इटणकर १४
शीतल पटले २२
प्रभव जोशी २३
शशांक शुभनकर ६०
गोयल मनोज ७१
धीरजकुमार कांबळे ८२
राठोड विजय चंद्रकांत ८४
ठाकूर प्राजक्ता प्रभाकर १३२
थॉमस प्रियंका १५८
नरवने अबोली सुनिल १६३
जैन अर्पित १९४
ओंम्बासे सचिन छगनलाल २१५
अमोल येडगे २५४
थारवल अभिषेक सदानंद २५६
निखील सारस्वत २८१
प्रियांका माशेलकर ३००
निखिल फुंडे ३०२
पडिया अक्षय जुगलकिशोर ३०३
डोईफोडे सागर दत्तात्रय ३१०
वरवंटकर प्रसाद हनमंतराव ३१६
देवांगी स्वर्णकर ३२२
गोवेकर मयूर रातीलाल ३४७
निखिल पिंगळे ३५३
शेवाळे अभिजित तुकाराम ३५४
भांगेपाटील पुष्कराज रमेश ३५७
अभिषेक महाजन ३६६
सात्विक देव ३७३
धनाजी कदम ३८१
हर्षल मेटे ३८६
माधव सुळफुले ३८७
अकोलकर समीर दिलीप ४०३
विपुल देव ४११
मोहाडिकर किरण मोहन ४८२
पाटील मयूर गुलाबराव ५१४
खरात संजय ज्ञानदेव ५३५
कुंभार अजित बालासो ५८८
माने अमितकुमार बाबूराव ६१६
भूषण पाटील ६१७
गुरव अभिजित दिलीप ६७२
महेश चव्हाण ६७९
साठे संदिप प्रदिपराव ७०६
स्नेहल कारले ७१७
सुंभे प्रशांत अप्पासाहेब ७१८
देवकाते हिमालय काशिनाथ७२७
तांबे अनंत सुभाष ७२८
चेतन कळमकर ७३१
उंडे योगेश पांडुरंग ७३७
स्वच्छंद चव्हाण ७५०
सोनवने ऋषीकेश भगवान ७६०
अमित खटावकर ७६५
सोनकवडे सोनल लक्ष्मीदास ७७४
जाधवर विवेकानंद राजेंद्र ७९९
अंकिता ढाकरे ८००
रामटेके मृणमय प्रकाश ८११
भस्मे विवेक दत्तात्रय ८१२
चव्हाण प्रविण मोहनदास ८१५
निगवेकर रोहित रत्नकांत ८२६
सुशील शेंडगे ८२७
घोलप प्रज्ञा राजेंद्र ८३०
तुरेराव प्रीतमकुमार ८४९
कानडे सुजित चंद्रकांत ८८१
भोकरे सुनिल शिवराम ८८४
कविता पाटील ८९०
गुल्हाने वसुंधरा अजय ८९२
शिंदे अक्षय अशोक ९०५
हाके अक्षय मच्छिंद्र ९१५
दाभोळे दिलीराज चंद्रकांत ९२०
शेटे मोतिलाल शहादेव ९५५
पोटे गणेश संपतराव ९७५
मोनिका पंगते ९७९
कांबळे धिरजकुमार दिगंबरराव ९८२
भरसठ योगेश तुकाराम ९८९
दगडे अदिनाथ लहानू १०००
कपिल जोशी १००६
पोळ हेमंत बळवंत १०३९
विजया जाधव १०७६
रोहणकर पियूष अरुण १०८८
चौगुले बजरंग बंडू १०९५
गवळी राजेश पुंजाजी १११८









