पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for June 16th, 2014

यवतमाळात अडीच लाखाचा गुटखा जप्त 0

यवतमाळात अडीच लाखाचा गुटखा जप्त

09/03/2013 3:13 PM
यवतमाळ –  मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने यवतमाळात येत असलेला गुटखा सापळा रचून जप्त करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे विठ्ठलवाडी परिसरात करण्यात आली. शिवराज मधुकर मोहिते (२८)रा. बांगरनगर, यवतमाळ, प्रवीण गणेश वडतकर (३५)रा. वैद्यनगर यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. चार्ली कमांडो पथक पहाटे ३ वाजता दरम्यान कॉटनमार्केट परिसरात गस्तीवर असताना धामणगावमार्गे यवतमाळात येत असलेल्या (एमएच३१ एडी ९९९) अ‍ॅम्बेसॅडर वाहनावर संशय आला. पथकातील कर्मचाºयांनी वाहनाला  थांबविण्याचा प्रयत्न केला असता पळ काढला. यामुळे काहीतरी काळेबेरं असल्याचा संशय पक्का झाला. लगेच चार्ली कमांडोने त्या वाहनाचा वंजारी फैलातून पाठलाग केला. सिनेस्टाईल गुंगारा देण्याचा प्रयत्न गुटखा तस्करांकडून होत असताना विठ्ठलवाडी परिसरात त्यांना अडवून वाहनाची तपासणी केली असता गुटखा आढळून आला. पानमसाला, गुटखा, सुगंधित तंबाखू  असा १ लाख ६० हजाराचा गुटखा व वाहन असा एकून २ लाख ४० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ही कारवाई चार्ली पथकाचे प्रमुख सुनील डोंगरे, अमित पोयाम, महेंद्र भोवते यांनी केली.

June 16, 2014 in मुख्य पान
धावत्या ट्रकला आग 0

धावत्या ट्रकला आग

index.jpeg 2
बोरगाव मंजू : अकोल्याहून अमरावतीकडे जात असलेल्या एका ट्रकला आग लागून तो जळून खाक झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील शालीमार ढाब्याजवळ सोमवारी दुपारी घडली. यात ट्रकमधील साहित्य जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा सी.जी. ०४ – ६६७८ क्रमांकाचा ट्रक औषधे व सौंदर्य प्रसाधने आदी साहित्य घेऊन अकोल्याहून अमरावतीकडे जात होता. दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान दाळंबी-कोळंबी ते अंभोरादरम्यान कॅबिनमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ट्रकला अचानक आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक कविता पेट्रोल पंपाजवळच्या शालीमार ढाब्याच्या प्रांगणात नेला. महामार्गावरून जात असलेले मूर्तिजापूरचे परीविक्षाधीन ठाणेदार आयपीएस अधिकारी डॉ. प्रवीण मुंढे यांना ट्रकला आग लागल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तातडीने मूर्तिजापूर व अकोला येथील अग्निशमन दलांना पाचारण केले. दोन बंबांनी ट्रकची आग आटोक्यात आणली. तोपर्यंत ट्रकचा बराच भाग जळून खाक झाला होता. बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक देशमुख व हेकॉ अरुण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

June 16, 2014 in मुख्य पान
हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, पोलीस भरती मृत्यूप्रकरण 0

हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस, पोलीस भरती मृत्यूप्रकरण

2014-06-12~bhartipolice_ns
मुंबई – पोलीस भरतीदरम्यान चार तरूणांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत  उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. येत्या सात दिवसांत या नोटीसीचे उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे.
मुंबईत सुरू असलेल्या पोलीस भरतीसाठी आलेल्या शारिरीक चाचणीपरीक्षेदरम्यान आत्तापर्यंत चार तरूणांचा मृत्यू झाला आहे. राहुल सपकाळ,  अंबादास सोनावणे, साईप्रसाद माळी आणि विशाल केदारे या चौघांना धावण्याच्या चाचणी दरम्यान चक्कर आली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध नोंडवण्यात आला होता, तसेच  मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी या चारही तरूणांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली होती. तसेच यापुढे पोलिस भरतीदरम्यान पाच किलोमीटरचे अंतर तीन किमी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.
दरम्यान उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणाची दखल  घेत उच्च ‘स्यू मोटो’ याचिका दाखल करुन घेतली. त्यावरील पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार असून पोलीस दलासह राज्य सरकारलाही याप्रकरणी उत्तर द्यावे लागणार आहे.

June 16, 2014 in मुख्य पान
खैरलांजी-मुंबई अँटिकास्ट बाइक मार्च 0

खैरलांजी-मुंबई अँटिकास्ट बाइक मार्च

index.jpeg11
नागपूर – राज्यात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी सत्यशोधक जनआंदोलनाच्यावतीने ५०० बाइकस्वारांचा खैरलांजी ते मुंबई असा ‘अँटिकास्ट बाइकर्स मार्च’ १८ ते २६ जूनदरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
दलितांवरील अत्याचार थांबिवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. ग्रामीण भागात दलितांमध्ये कमालीची असुरक्षिततेची भावना आहे. दलितांनी आत्मसुरक्षेसाठी सज्ज व्हावे व हे अत्याचार थांबावे, जेथे अत्याचार होत असतील तेथे धावून जावे यासाठी हे बाइकर्स सज्ज होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सत्यशोधक बाइकर्स नावाने टीम गठीत करण्यात येणार आहे. खैरलांजीतून बुधवारी (ता. १८) सकाळी ८ वाजता बाइकर्स पुढील प्रवासासाठी निघणार आहेत. हा मार्च भंडारा -नागपूर-कारंजा-तिवसा-अमरावती-अकोला-मूर्तिजार-वाशीम-देऊळगावराजा-अंबड-गेवराई-औरंगाबाद-अहमदनगर-खरडा-शिरुर-पुणे-खोपोली-पनवेल मार्गे २६ जून रोजी मुंबईत पोहोचणार आहे. १३०० कि.मी.चा हा प्रवास आहे. २४ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील खरडा येथे ‘खरडा पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दलितविरोधी अत्याचारांवर प्रकाशझोत टाकणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मुंबईत २६ रोजी मार्चच्या समारोपप्रसंगी ‘चैत्यभूमी डिक्लेरेशन’ प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परिवर्तन कार्यकर्त्यांनी या बाइकर्स मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन किशोर जाधव, शैलेद्र सोनवणे, देवेंद्र इंगळे यांनी केले आहे.

June 16, 2014 in मुख्य पान
मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा सीबीआय तपास सुरु 0

मुंडेंच्या अपघाती मृत्यूचा सीबीआय तपास सुरु

images
नवी दिल्ली – भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरु केला आहे. दिल्ली पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने गुन्हा दाखल केला.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार सीबीआयने तपास सुरु केला आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसह विविध पक्षीय नेत्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूबद्दल अनेकांना संशय असल्याने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तीन जून रोजी गोपीनाथ मुंडे दिल्ली विमानतळाकडे जात असताना त्यांच्या गा़डीला समोरुन आलेल्या इंडिका गाडीने धडक दिली होती. या अपघातात मुंडे यांचे निधन झाले होते. मुंडे यांच्या मानेला आणि यकृताला गंभीर मार लागला होता. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी मुंडेंच्या गाडीला धडक देणा-या इंडिका कारचा चालक गुरविंदर सिंहच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू असला तरी, हा अपघात नसून, घातपात असल्याची अनेकांना शंका आहे. त्यामुळे बीडमधील जनता आणि गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक सीबीआय चौकशीची मागणी करत होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही संतप्त झालेल्या बी़डच्या जनतेने सर्वपक्षीय नेत्यांच्या गाडयांना घेराव घालत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

केनियामध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, ४८ ठार 0

केनियामध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार, ४८ ठार

index
नैरोबी- सोमाली दहशतवाद्यांनी केनियातील म्पेकेटोनी शहरात केलेल्या हल्ल्यात तब्बल ४८ जण ठार झाले आहेत. शसस्त्र दहशतवाद्यांनी समुद्र किना-यावर असलेल्या एका शहरात जोरदार गोळीबार केला.
शहरातील अनेक भागात नागरीक फिफा विश्वचषकाचा सामान पाहताना दहशतवाद्यांनी रात्री आठच्या सुमारास शहरात गोळीबार केला. दहशवाद्यांनी दोन हॉटेलसह एका पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याचे अधिका-यांनी सांगितले. या दहशतवादी हल्ल्यामागे सोमालीयातील ‘अल-कायदा’ संघटनेशी संबंधीत ‘अल-शबाब’ ही दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचे पोलिस अधिकारी डेव्हीड किमाइयो यांनी सांगितले.शहरातील ब्रीज व्यू हॉटलमध्ये दहशवाद्यांनी प्रवेश करून गोळाबार सुरु केला. हॉटेलमध्ये फिफा विश्वचषक सामना पाहण्यासाठी आले होते. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे.गेल्या काही महिन्यांपासून केनियामध्ये दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आदी देशांनी केनीयामध्ये आणखी दहशतवादी हल्ले होऊ शकतात असा इशारा दिला होता.

शेजारधर्मासाठी आम्ही कटिबध्द – नरेंद्र मोदी 0

शेजारधर्मासाठी आम्ही कटिबध्द – नरेंद्र मोदी

PM Modi in Bhutan
थिम्पू – भारत शेजारधर्म पाळण्यासाठी कटिबध्द असून, सत्तांतर झाले तरी, त्याचा भारत-भूतान संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. शेजारी देशांबरोबर उत्तम संबंध ठेवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूतानच्या संसदेला दिला. दोन दिवसाच्या भूतान दौ-यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी सोमवारी भूतानच्या संसदेच्या संयुक्त सभागृहाला संबोधित करताना हे विचार व्यक्त केले.
भारताने प्रगती केली तर, शेजारी देशांच्या विकासालाही चालना मिळेल. भारतात स्थिरता आणि विकास झाला तर, भूतानलाही त्याचा फायदा होईल असे मोदींनी सांगितले. मोदींनी हिंदीमधुन भूतानच्या संसदेला संबोधित केले. भूतानच्या राजेशाहीकडून लोकशाहीकडे झालेल्या प्रवासाबद्दल मोदींनी भूतानचे कौतुक केले. गेल्या सातवर्षात भूतानचा राजेशाहीकडून लोकशाहीकडे ज्या सहजतेने प्रवास झाला आहे. त्यातून राज्यकारभारातील परिपक्वता दिसून येते असे मोदी म्हणाले. भारताच्या भूतान बरोबरच्या ऐतिहासिक संबंधांचा दाखला देताना, मोदींनी आपले सरकार भूतानबरोबरचे संबंध अधिक सृदृढ करण्यासाठी काम करेल अशी ग्वाही यावेळी दिली. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या परदेश दौ-यासाठी भूतानची निवड करण्यामागेही अनेक कारणे आहेत. सामरिक दृष्टया भूतान भारतासाठी अत्यंत महत्वाचा देश आहे. गेल्या काही काळापासून चीनची भूतानबरोबर जवळीक वाढली आहे तसेच भारत विरोधात दहशतवादी कारवायांसाठीही भूतानच्या भूमीचा उपयोग होत आहे. त्यामुळे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नरेंद्र मोदी यांचा भूतान दौरा महत्वाचा होता.