| युद्धपातळीवर मदतकार्य २५ मृतदेह बाहेर काढले लष्कराची मदत | ||
|
पुणे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील माळीण गावासाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली. रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळीण गावावर डोंगराचा कडा कोसळला. त्यामध्ये सुमारे ४00 गावकरी गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुधवारी २५ जणांचे मृतदेह हाती लागल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेत गावातील ६७ घरांपैकी ४४ घरे गाडली गेली आहेत. गावची सुमारे ८00 लोकसंख्या लक्षात घेता गाडले गेलेल्यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे एकच शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, अदिवासी विकास मंत्री आणि सबंधित खात्याचे मंत्री, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. माळीण गाव डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात आहे. बुधवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास डोंगराचा कडा अचानक कोसळला अन् ४४ घरे या कोसळलेल्या कड्याखाली दबली गेली आणि संपूर्ण माळीण गावच उद्ध्वस्त झाले. घटनास्थळी जिल्हाधिकारी सौरभ राव, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, शिवसेनेचे नेते अरुण गिरे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक जणांनी घटनास्थळी धाव घेतली. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी जुन्नर, आळंदी नगरपालिकेच्या यंत्रणेसह विविध ठिकाणांहून सामाजिक कार्यकर्ते मदतकार्यात गुंतले आहेत. माळीण हे गाव डोंगरदर्यांमध्ये वसलेले असून गावाची लोकसंख्या ७00 ते ८00 आहे. मंगळवारी रात्री गावातील सर्वजण झोपले असतानाच बुधवारी पहाटेच्या सुमारास डोंगराचा कडा अचानक तुटला अन् मोठा अनर्थ घडला. पहाटेच घटना घडल्याने घरातील कोणत्याच माणसाला बाहेर पडणे अशक्य झाल्यानेच सर्वजण कड्याखाली दबले गेले. दरम्यान, जोरदार पावसामुळे दुर्घटनाग्रस्त माळीण गावात मदतकार्यात अडथळे येत आहेत. गेल्या पंधरा वर्षांतील आदिवासी भागात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची आंबेगाव तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. जेसीबी मशीनच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) दोन पथके रुग्णवाहिकेसह माळीण गावी पोहोचली असून मदत व बचावकार्य सुरू आहे. |
Archive for July, 2014
0
४00 जण गाडले गेले!
0
गुरगावात घरात घुसून हत्या

गुरगाव – गुरगाव येथे सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीची तीन अज्ञात इसमांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. सावित्रीदेवी असे मृत महिलेचे नाव आहे.
गुरगाव पोलिसांनी ही माहिती दिली आहे. गुरगावमधील सेक्टर ३१ मध्ये ही घटना घडली. सोमवारी दुपारी तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन इसमांनी सावित्री देवींच्या घरात प्रवेश केला आणि काही कळण्याच्या आत गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या सावित्री देवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
बस दरीत कोसळून २० ठार

शिमला – हिमाचल रोड ट्रान्स्पोर्टची बस दरीत कोसळून मंगळवारी २० जण ठार, तर सात जण जखमी झाले. येथून ६५ किलोमीटरवर असलेल्या कतारघाटात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिमल्याहून निघालेली बस सवेराखूदला निघाली होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. बसंतपूर किंजल महामार्गावरील घाटात बस दरीत कोसळली. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसच्या चक्काचूर झालेल्या सांगाड्यात आणखी काही मृतदेह अडकले असल्याचे शिमल्याचे पोलिस अधीक्षक डी. डब्ल्यू. नेगी यांनी सांगितले. अपघात होताच ड्रायव्हरने उडी मारून स्वतःचे प्राण वाचविले. जखमींना येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
0
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर वाढलेला असताना येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुर्या आणि वैतरणा नद्यांना पूर आला असून पूरात दोघे जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या विभागीय केंद्राने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करताना मुंबईला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल झाले असून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबईत येत्या २४ तासांत ७ ते १४ सेंटीमीटर पाऊस कोसळेल तर हेच प्रमाण ठाणे जिल्ह्यासह कोकणात २४ सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतो, असे आयएमडीचे मुंबईतील संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ४८.३ मिलीमीटर तर कुलाब्यात २६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
0
पुसदमध्ये २० वाहनांची तोडफोड ;शहरात तणावपूर्ण शांतता

पुसद – एका सामाजिक कार्यक्रमानंतर पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यात झालेल्या किळकोळ वादामुळे आक्रमक झालेल्या जमावाने दगडफेक करीत अनेक वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे.
आज सकाळी शिवाजीनगरात एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम व साहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. यामुळे ४०० ते ५०० जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर गेला. पोलीस अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी सदर साहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली तत्काळ कंट्रोल रुमला केल्याचे सांगितले. यावर मोर्चेकºयांचे समाधान झाल्याने ते माघारी फिरले. काही दूर येत नाही तोच अचानक दुचाकी,चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिस्थितीतीवर नियंत्रण मिळविले. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच व्यापाºयांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केली. या दगडफेकीत अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, वाहनधारकांनी पुसद पोलिसात तक्रार दिली आहे. तोडफोड करणाºयांना अटक करण्याची मागणी शिवसेना व भाजपाच्या वतीने करण्यात आल्यानंतर व्यापाºयांनी पुन्हा आपली दुकाने बंद केली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांनी पुसद गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
0
सोनाक्षी खेळणार कबड्डी!

सामान्य लोक कांदे-बटाटे, सेल फोन किंवा कार खरेदी करतात, परंतु ‘दबंग’गर्ल सोनाक्षी सामान्य नाही. तिचं कोणतंही काम असामान्य असतं. अभिनयापासून राजकारणाचं ‘बाळकडू’ प्यायलेल्या सोनाक्षीने कबड्डीचा संघ खरेदी केला आहे.
यावर सोनाक्षीचं म्हणणं असं आहे की, एखादा सेलिब्रेटी खेळाशी जोडला जातो, तेव्हा त्या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होते. म्हणूनच ९ ऑगस्टला सुरू होणा-या ‘वर्ल्ड कबड्डी लीग’मध्ये ब्रिटनच्या ‘द हायर ग्रुप’ यांच्यासोबत मिळून ‘युनायटेड सिंग्ज’ नावाचा संघच तिने खरेदी केला आहे. ही लीग लंडनमध्ये खेळवली जाणार आहे.आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जात असल्याने इतर खेळ दुर्लक्षित राहतात. म्हणूनच क्रिकेटसारखं इतर खेळांना प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे.कबड्डी हा असा खेळ आहे, जो आपण लहानपणी खेळायचो. हा एक भारतीय खेळ आहे. याची पाळंमुळं येथे रुजलेली आहेत. त्यामुळे मी या खेळाला मोठय़ा स्तरावर घेऊन जाणार आहे. यासाठी वल्र्ड कबड्डी लीगसारखा चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही, असंही सोनाक्षी सांगते. ‘मी वल्र्ड कबड्डी लीगचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे. अशा प्रकारचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लीगमध्ये सहभागी होण्यासाठी शूटिंगचं वेळापत्रकही बनवलं आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि हनी सिंगनेही वर्ल्ड कबड्डी लीग संघ खरेदी केले आहेत. आता बघू या.. सोनाक्षीची एंट्री कशी होते ते!
गोळीबार करून दरोडा
नाशिकरोड -नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर आज भरदुपारी पडलेल्या दरोड्यात रोकड आणि सोन्याची लुट करण्यात आली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानमालक व त्याचा मावस भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने चित्तथरारक पाठलाग करुन तीन सशंयितांना शहापूरजवळ अटक केली. त्यांच्याकडून मोटारीसह, शस्त्रे, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
नाशिक-पुणे महामार्गावर दत्तमंदिरजवळील ड्रिम प्लाझामध्ये अभय अरुण शहाणे यांचे शहाणे ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मावस भाऊ सागर सोमनाथ शहाणे (वय२६) दुकानात एकटेच होते. त्यावेळी हिंदी बोलणारा एकजण लाल व्हर्ना कार (एमएच १२ जे.सी. ६५२४) घेऊन दुकानाजवळ आला. अभय शहाणे कोठे आहेत, अशी चौकशी केली. ते थोड्यावेळाने भेटतील असे सागरने त्याला सांगितले. त्यामुळे तो निघून गेला. अभय शहाणे तीनच्या सुमारास दुकानात आले. त्याचवेळी चौकशी करणाऱ्या तरुणासह चौघे दुकानात आले. पिस्तुलचा धाक दाखवून सोनं व रोकडची मागणी करू लागले. कारचालक वरच्या रुममध्ये बसलेल्या सागरजवळ आला. त्याला पिस्तुल दाखवून रोख पन्नास हजार आणि दहा तोळ्याची लगड बॅगमध्ये टाकली. सागरला घेऊन तो खाली आला. तेव्हा अभय शहाणे यांनी त्या सर्वांना प्रतिकार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे लुटारुंनी त्यांच्या पोटात गोळी मारली. पिस्तुल आपटून काऊंटर फोडले. तेथील सोने बॅगमध्ये भरले. एका लुटारूने सागरला खाली पाडून त्याच्यावर पिस्तुल रोखले. तो त्याच्यावर गोळी करणार इतक्यात त्याने धाडसाने पिस्तुल खाली पाडले. दुसऱ्या झपटीमध्ये त्याचा मोबाईल खाली पडला. जखमी अवस्थेतही अभय शहाणे यांनी टेबलवरील काचा लुटारुंच्या दिशेने फेकल्या. त्यात धारधार काच एका लुटारूच्या पोटात लागली. दोघांचा प्रतिकार पाहून लुटारू कारकडे पळाले. सागरही मागे धावला. त्याने चालकाच्या काचेवर बुक्की मारली. परंतु, दरोडेखोर पळून गेले. हा प्रकार पाहून परिसरातील अजिंक्य वालकर व त्यांच्या मित्राने मोटारसायकलवरून मोटारीचा पाठलाग केला. परंतु, ते मुंबईच्या दिशेने पसार झाले.
१५६ वार करून युवकाचा खून
नागपूर – जुन्या वैमनस्यातून तिघांनी चाकूचे १५६ घाव घालून युवकाचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना सोमवारी सकाळी उमरेडमार्गावरील विहिरगाव भागात उघडकीस आली. रोशन सुरेश भुरे (वय १९, रा. माकडे ले-आउट, भांडे प्लॉट चौक), असे मृताचे नाव आहे. खूनाच्या या घटनेमुळे विहिरगावमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
रोशन हा खासगी काम करीत होता. त्याचे वडील वाडीकाम करतात. रविवारी त्याची आई नागद्वारला गेली. अन्य नातेवाइकांसह वडीलही गुरुवारी नागद्वारला जाणार होते. काही दिवसांपूर्वी गाडीचा कट लागल्याने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत रोशनचा वाद झाला होता. रविवारी सायंकाळी तीन विद्यार्थी त्याला घेऊन विहिरगाव येथे गेले. तेथे सर्वांनी मिळून दारू पिल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांनी त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. रोशन जिवाच्या आकांताने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान रोशन हा पानठेल्यामागे लपला असल्याचे मारेकऱ्यांना दिसताच पुन्हा चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. मारेकऱ्यांनी त्याच्यावर तब्बल १५६ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात रोशन खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोशन ठार झाल्याचे लक्षात येताच मारेकरी पसार झाले. सोमवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह विहिरगाव भागात असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर पोलिसांना कळविताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करुन मृतदेह मेडिकलकडे रवाना केला. घटनास्थळी आढळलेल्या मोबाइलवरून मृतकाची ओळख पटली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.
मनसेकडून कर्नाटक सरकारच्या पुतळ््याचे दहन

यवतमाळ- कर्नाटकातील सीमाभागात येळ्ळूर येथे मराठी भाषीकांना मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेचे पडसाद आज यवतमाळातही उमटले. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी नेताजी चौकात कर्नाटक सरकारच्या पुतळ््याचे दहन करून या घटनेचा निषेध नोंदविला.
कर्नाटकात सीमाभागात राहणाºया मराठी माणसांवर अन्याय सुरू आहे. यात कर्नाटक सरकारकडून मिळणारी वागणूक निषेधार्ह आहे. या घटनेचा निषेध नोंदवित महाराष्टÑातही कानडी भाषिक आहे, हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी देण्यात आला. सोमवारी ५ वाजता नेताजी चौकात असलेल्या मनसे कार्यालयाजवळ पुतळा दहन करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी, अनिल हमदापूरे, संजय देठे, देवा शिवरामवार, नीरज वाघमारे, विकास पवार, अभिजित नानवटकर, अमित बदनोरे, अंजू चिलोरकर, रेश्मा आठवले आदी उपस्थित होते.
0
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनांसह १२ वाहनांची तोडफोड

शहरात माथेफिरूंचा धुमाकूळ , दोन युवक ‘सीसीटीव्ही’त कैद
यवतमाळ – शहरात रविवारच्या मध्यरात्री अज्ञात दोन दुचाकीस्वार युवकांनी धुमाकूळ घालित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनांसह तब्बल बारा वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दोन्ही माथेफिरू युवक ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाले असून पोलिसांपुढे दोन्ही आरोपी शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
दुचाकीवर स्वार असलेल्या अज्ञात दोन युवकांनी काल मध्यरात्री दर्डानगरसह वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया नगरात चांगलाच धुमाकूळ घातला. सर्वप्रथम दर्डा नगरात वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितल्या जाते. विशेष म्हणजे तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये राष्टÑवादीच्या नेत्यांसह मनसे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी यांच्या वाहनाचा समावेश आहे. त्यानंतर दुचाकीस्वारांनी आपला मोर्चा श्रीकृष्णनगर, महादेवनगर, शिवाजीनगर, ओमसोसायटी, दाते कॉलेज चौकात वळविला. घरासमारे उभ्या असल्याल्या वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. ही बाब सकाळी उघडकीस येताच खळबळ उडाली. ही तोडफोड नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दर्डानगर, श्रीकृष्णनगरात वाहन फोडल्यानंतर दुचाकीस्वार महादेवनगरकडे येत असताना विधाता कोचिंग क्लासेससमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. मात्र रात्री अंधार असल्याने चित्र स्पष्ट दिसत नाही. याच परिसरातील संजय ढोक यांचे एम.एच.२९/आर ४७०७ या वाहनाच्या काचा फोडल्या. सीसीटीव्हीत दाखविल्याप्रमाणे तेव्हा रात्रीचे १ वाजून १३ मिनिट झाले होते. कृषीनगरातील राहुल दौलतकर यांचे एम.एच. ३२/ एम १ या क्रमांकाचे वाहन फोडले. ओम सोसायटीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचे निवास्थान आहे. रात्री बाहेरून आल्यानंतर त्यांचे वाहन घरासमोर उभे होते. तर देशमुख आतमध्ये कामात व्यस्त असताना बाहेर वाहनांवर दगडफेक केल्याचा आवाज आला. लगेच त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांनी स्कोडा क्रमांक एम.एच. ४३/ एजे ५६९७, एम.एच.२६/एल १४४४ या वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर दाते कॉलेज चौकातही असाच धुमाकूळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी वाहनधारकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. वाहनांचे नुकसान झालेल्यांमध्ये जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, शशिकांत भूते (दाते कॉलेज चौक), राहुल दौलतकार (कृषीनगर), संजय ढोक(महादेवनगर),डॉ. निशांत चव्हाण (शिवाजीनगर), डॉ. राजेश खडसे (श्रीकृष्णनगर) आदींचा समावेश आहे. काही वाहनधारकांनी पोलिसात तक्रार केली नसल्याने बारा वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. अज्ञात दुचाकीस्वारांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाहन ‘टार्गेट’ केल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही – सुनील तटकरे
लढविलेल्या एकूण जागा राष्ट्रवादी काँग्रेस 69 लढविलेल्या एकूण जागा २00४ची निवडणूक २00४ साली काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादीने ७१ जागा जिंकल्या. मात्र, निकालानंतरच्या वाटाघाटीत काँग्रेस कोट्यातील २ कॅबिनेट व १ राज्यमंत्री पदाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. आधी सोडला होता दावा राष्ट्रवादी काँग्रेस 124 157 वर्धा : मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी वध्र्यात मांडली.
राष्ट्रवादी १४४ जागांच्या भूमिकेवर ठाम आहे. तशी अटीतटीची वेळ आल्यास पक्षाचे नेते शरद पवार आणि
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पातळीवर हा मुद्दा निकालात काढला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर लाठीमार
बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी ६ च्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून मदरुमकी गाजविली. पाठोपाठ येळ्ळूर गावात पोलिसांनी प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब केंद्राकडे दाद मागणार कर्हाड : कर्नाटकात मराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत. कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही., असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणार्या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो. आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.
मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची इंडियन मुजाहिदीनची धमकी
मुंबई- इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे दिली आहे. यामुळे, मुंबईसह राज्यात हायअर्लट जारी केले आहे. या धमकीपत्राची पोलिस कसून चौकशी करत असून सर्वत्र पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
या निनावी पत्रातून १९९३ च्या मुंबई स्फोटांची किंवा तत्सम घटनेची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा इशारा स्पष्ट होत आहे. या पत्रात गाझामध्ये मुस्लिमधर्मीयावर होत असलेले हल्ले आणि त्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी सुद्ध देण्यात आली आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा द्विभाषीक पत्रातून पाठवलेल्या मजकूरातून ही बाब उघड झाली आहे. यात ‘१९९३ मध्ये तुम्ही नशीबवान ठरला होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा’ अशी धमकी दिली आहे.
पत्राखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव आहे. हे पत्र कोणी आणि कोठून पाठवले, तसेच हे पत्र दहशतवादी संघटनेने पाठवले की कोणीतरी जाणुनबूजून मस्ती करत आहे, याचा पोलिस तपास करत आहे.
धारदार शस्त्राने युवकाचा खून
यवतमाळ – धारदार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता दरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या आर्णी-घाटंजीबायपासवर घडली. विजय अमरनाथ उपाध्ये (३०)रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे मृताचे नाव आहे.
विजय हा फायनांन्स एजन्सी चालवित असून या व्यवसायीक वादातून चार जणांनी हा खून केल्याची चर्चा आहे. एक युवक रक्ताच्या थारोळ््यात बायपासवर पडून असल्याची माहिती चार्ली कमांडोला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता विजय अखेरच्या घटका मोजत होता. चार्ली कमांडोंनी त्याना उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडगावरोड पोलिसांनी देखील शासकीय रुग्णालय गाठून संशयीत आरोपींचा शोध घेणे सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.
गुराख्यास मारहाण करणाºया आरोपीस कारावास
यवतमाळ – क्षुल्लक कारणावरून गुराख्याला मारहाण करणाºया आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आज गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एम.पळसापूरे यांनी हा निकाल दिला.
शंकर विश्वनाथ कांबळे (४५) रा. बेलोरा असे आरोपीचे नाव आहे. दिलीप तुकाराम हस्ते (३५) हे गुराखी असून गावातील नागरिकांच्या बकर्या चारत होते. त्याच्याकडे आरोपीच्या बकर्या चारण्यासाठी होत्या.३ मे २०१३ रोजी रात्री ८ वाजता हस्ते हे १०० रुपये मागण्यासाठी आरोपी शंकरकडे गेला होता. यावेळी आरोपीने वाद करून त्याच्यासोबत भांडण सुुरु केले. ही बाब निदर्शनास येताच फिर्यादीचा मुलगा अमित हस्ते (२०) हा भांडण सोंडविण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपीने काठीने डोक्यावर मारहाण करून अमितला गंभीर जखमी केले. याप्रकरणी हस्ते यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूध्द भांदवि कलम ३२४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जमादार प्रभाकर चोटे यांनी आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एम. पळसापूरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये दोष सिध्द झाल्याने आरोपी शंकर कांबळे यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. बचावपक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.
अल्जेरियाचे विमान कोसळले
अल्जियर्स – बुर्किना फासोहून अल्जेरियाकडे येत असलेले एअर अल्जेरिया कंपनीने प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या विमानात एकूण ११६ जण होते. अल्जेरियाच्या हवाई वाहतूक खात्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात एकूण ११० प्रवासी आणि ६ क्रू मेंबर होते, अशी माहिती आहे. या विमानात अर्ध्याहून अधिक फ्रान्सचे नागरिक प्रवास करत होते.
बुर्किना फासोची राजधानी औगादुगोच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ५० मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानातील प्रवासी युरोप, मध्यपूर्व आणि कॅनडा येथे जाणारे होते, अशी माहिती आहे. विमानाच्या शोधा घेण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. हे विमान एका आठवड्यात चार वेळा उड्डाण करत होते, अशी माहिती आहे.
कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार
मुंबई – मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. ओळखीच्या असलेल्या दोन जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शॉपिंग करण्यासाठी ही माहिला मंगळवारी वांद्र्याला आली होती. त्यानंतर तिने वांद्रे रेल्वे स्थानका बाहेरून रिक्षा केली. पण रिक्षावाल्याने तिला तिने सांगितलेल्या ठिकाणी न सोडता धारावीला सोडलं. तिथे ही पीडित महिला टॅक्सीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिच्या ओळखीचे असलेले दोघे आरोपी गाडीने आले आणि घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसवलं. यानंतर दोघांनी तिच्यावर धावत्या कारमध्येच बलात्कार केला आणि २५ मिनिटांनी पुन्हा धारावीजवळ सोडलं, अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर धारावी पोलिसांनी तिची तक्रार दाखल केलीय.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, पण त्यांना अटक केलेली नाही. आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचं सांगत आरोपींनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
0
मोदींच्या शपथविधीचा खर्च १७.६० लाख रुपये
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक शपथविधीसाठी एकूण १७.६० लाख रुपये खर्च करण्यात आले.
राष्ट्रपती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. माहितीच्या अधिकारात रमेश वर्मा यांनी या माहितीबाबत विचारणा केली होती. यावर कार्यालयाने शपथविधी सोहळ्याच्या खर्चाची ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर २६ मे रोजी मोदींचा शपथविधी पार पडला. यावेळी या सोहळ्यास विविध देशांच्या प्रमुखांसह तीन हजाराहून अधिक पाहुणे उपस्थित होते. मोठ्या दिमाखदार पद्धतीने हा सोहळ पार पडला होता.
यवतमाळच्या सुपुत्राची अवकाश भरारी! लघूग्रहाला डॉ. आशिष महाबळ यांचे नाव
यवतमाळ – अवकाशातील ग्रह ताºयांचे अनेकांना आकर्षण राहिले आहे. ग्रहांना अभ्यासकांचे नाव देण्याचा सन्मान काही ठराविक संशोधकांच्याच वाट्याला आला आहे. १५ फेब्रुवारी २००४ रोजी शोधलेल्या एका लघुग्रहाला यवतमाळ येथील डॉ. आशीष महाबळ या संशोधकाचे नाव देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. आशीष महाबळ हे १९९९ पासून अमेरीकेतील पॅसॅडेना येथील कॅलिफोर्नीया इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नालॉजी (कॅलटेक) मध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. आशीष अरविंद महाबळ हे मूळचे यवतमाळचे. आजही त्यांचे आई बाबा येथेच राहतात. बाबा एल.आय.सी. मधे नोकरीत होते. त्यामुळे बाबा जेथे जेथे बदलून जायचे त्या त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण परभणी, यवतमाळ, चंद्रपूर येथे, तर त्यापूढील शिक्षण शिवाजी कॉलेज नागपूर येथे झाले. १९७९ साली अमेरीकेची स्काय लॅब पृथ्वीवर कोसळली. त्यावेळी या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाला. व येथूनच डॉ. आशिषच्या मेंदूत अवकाशा विषयी प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. अवकाशा विषयीचे मुलाचे आकर्षण व जिद्द पाहून त्याच साली बाबांनी त्याला एक टेलीस्कोप घेउन दिला. तेव्हापासून टेलिस्कोपशी आशिषच नात जूळलं ते कायमचच. शिक्षण सुरू असतांनाच पूणे येथिल आयुका मधे वेळोवेळी होणाºया उन्हाळी शिबीरात त्याची नेहमीच हजेरी असायची. त्यामुळे डॉ. जयंतजी नारळीकर यांच्याशी जवळचे संबंध आले. परिणामत: तेथूनच अॅस्टंोफिजीक्स मधे पी.एच.डी. केली. याही पूढे जाउन २ वर्षे अहमदाबादमधे राहून पोष्ट डॉक्टरेट केले. नंतर १९९९ ला सरळ अमेरिका गाठली. साडे चार अब्ज वषार्पूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला घडत होती, तेव्हा मंगळ आणि गुरू या ग्रहाच्या दरम्यान एक ‘फेथन’ नांवाचा ग्रह उदयास येत होता. मात्र गुरू आणि सूर्याच्या ओढा ताणीत त्याचे असंख्य तुकडे झाले व त्याच अवस्थेत ते आजतागायत सुयार्भोवती फिरत आहेत. याला ‘लघुग्रह’ असे म्हणतात. या ठिकाणी किमान १५ ते २० लाख लघुग्रह असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
अॅरिझोना मधील ‘कॅटलिना स्काय सर्व्हे’ नावाची संस्था, लघुग्रह शोधून त्याच्या कक्षा निश्चित करण्याचे काम करते. अमेरीकेतील पॅसॅडेना येथिल कॅलिफोनीर्या इन्स्टीटयूट आॅफ टेक्नालॉजी (कॅलटेक) च्या कॅटलिना रिअल टाईम टांन्झीयंट सर्व्हे (सी.आर.टी.एस.) या प्रकल्पा अंतर्गत कॅटलिना स्काय सर्व्हेचाच डाटा वापरला जातो. डॉ. आशिष महाबळ हे सी.आर.टी.एस. या संस्थेचे सदस्य आहेत. या सदस्यांनी १५ फेब्रुवारी २००४ रोजी, रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमांतून हा लघुग्रह शोधला. पुढे त्याचा आकार व कक्षा ठरविण्याच्या, डॉ. महाबळांच्या योगदानाबददल या लघुग्रहाला ‘महाबळ’ हे नाव देण्यात आले. लघुग्रहाचे नामकरण मायनर प्लॅनेट सेंटर ही संस्था करते. या लघुग्रहाची पर्यायी नांवे ९०४७२ आणि २००४ सी.टी. ९९ अशी आहेत. हा लघुग्रह अत्यंत लहान असून सध्या तो सूर्याच्या बाजूला – ३० अंशावर आहे. मात्र हा अत्यंत लहान असल्यामुळे हौशी दूबीर्णीतून दिसणे अवघड आहे. बालपणापासून आई वडील व वेळोवेळी लाभलेल्या गुरूजनांच्या मार्गदर्शनामूळे हे यश गाठता आले असे डॉ. आशिष महाबळांचे मत आहे. या निमित्ताने यवतमाळकरांचेच नव्हे तर भारत देशाचे नांव निदान या लघुग्रहाच्या उंची पर्यंत पोहोचले, यात शंका नाही.













