
गडचिरोली, दि. २५ – गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Archive for May, 2014
0
गडचिरोतीत काँग्रेस नेत्याची हत्या
0
सहा पर्यटकांना जलसमाधी

रत्नागिरी, दि. २५ – रत्नागिरीतील दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. हे सर्व पर्यटक पुण्यातील असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
श्रृती डांगे (वय १३), संगीता ओझा (३४ वर्ष) आणि पवन (वय ६ वर्ष) अशी या तिघा मृतांची नावे आहेत. पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणारे चार कुटुंब उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी दापोलीत आले होते. आंजर्ले – हरणे समुद्रातील अडखळ खाडीत हे पर्यटक पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नऊ जण पाण्यात बुडू लागले. या घटनेनंतर स्थानिकांनी नऊपैकी तिघांना यशस्वीरित्या पाण्यातून बाहेर काढले. मात्र उर्वरित सहा जणांना जलसमाधी मिळाली. सहा पैकी तिघा जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित तिघा जणांचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर पुण्यातील दत्तवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
0
कुख्यात डोमाची दगडाने ठेचून हत्या

नागपूर : पाचपावली बारईपुरा येथील कुख्यात गुंड डोमा याची त्याच्याच जुन्या मित्राने मारहाणीपासून वाचण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी रोशन तोटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत उमेश ऊर्फ डोमा शामराव चामटकर आणि आरोपी रोशन तोटे हे बारईपुरा पाचपावली येथे एकाच वस्तीत जवळपासच राहतात. दोघे जुने मित्र आहेत. परंतु डोमा नेहमीच रोशनला मारहाण करीत असे. शुक्रवारी सकाळीसुद्धा डोमाने रोशनला मारहाण केल्याची चर्चा आहे. उमेश ऊर्फ डोमा काही वर्षांंंंपूर्वी अवैध दारू विक्रीशी जुळला होता. त्याच्याविरुद्ध खुनी हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु सध्या तो चकना चौक येथील एका गॅरेजमध्ये काम करीत होता. शनिवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास रोशन घरी परतत होता. त्यावेळी डोमा आपल्या घराजवळच डोक्याखाली दारूची रिकामी शिशी ठेवून झोपला होता. डोमाला पाहून रोशन दुसरीकडे जाऊ लागला. डोमाची त्याच्यावर नजर गेली. त्याने त्याला आवाज दिला परंतु रोशन पळू लागला. रोशनला पळताना पाहून डोमाने त्याला दारूची शिशी फेकून मारली. रोशन खाली पडला त्याला मार लागला. रोशन पडल्याचे पाहून डोमा त्याला पकडण्यासाठी पोहचला. परंतु रागाच्या भरात रोशनने दगड उचलून त्याच्या डोक्यावर वार केला. तसेच तुटलेली काचेची शिशी त्याच्या पोटात खुपसली. जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उमेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार होळीच्या दिवशी आणि शनिवारी सकाळी उमेशचे रोशनसोबत भांडण झाले. या कारणावरून आरोपी रोशनने उमेशचा पाठलाग करून त्याला दगडाने मारून खाली पाडले. त्यानंतर पुन्हा दगडाने ठेचले. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
0
१६ जून पासून मतदार नोंदणी अभियान

नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. यात दोष कुणाचा, यावरून प्रशासन आणि मतदारांमध्ये चांगलेच वाद झाले. या वादावर कुठलाच तोडगा न निघता प्रकरण शांतही झाले. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. याची तयारी म्हणून येत्या १६ जूनपासून मतदारनोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी नुकतीच नागपूरला येऊन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतदार नोंदणी अभियानाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणीची मोहीम राबविताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मतदारांनीही अधिक जागरूक राहून आपले नाव नोंदवावे आणि यादीत आहे की नाही हे तपासावे याबाबतच्या वारंवार सूचनाही देण्यात येणार आहेत. यापूर्वी राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानात नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील मतदार मोठ्या संख्येने कमी झाले. यात निधन झालेले, नावे पुन्हा पुन्हा असलेले, दुसऱ्या मतदारसंघात बदलून गेलेल्या मतदारांसह गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असलेले मतदारही कमी झाले. १ जानेवारी २०१२ मध्ये दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ११५ मतदार होते. त्यानंतर १ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत मतदार कमी होऊन ३ लाख १३ हजार ३५९ झाले. याचा अर्थ ४३ हजार ७५६ मतदार कमी झाले. हेच चित्र दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर या मतदारसंघांतही पाहायला मिळाले. सध्या नागपुरात सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १८ लाख ९९ हजार ४०० मतदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्यावेळी मतदारांनी आता अधिक जागरूक राहून आपले नाव नोंदवून घेण्याची गरज आहे. विधानसभा क्षेत्रातील कमी झालेल्या मतदारांचा फटका संबंधित उमेदवारालाही बसू शकतो. त्यामुळे उमेदवारांनीही अचूक मतदार याद्या तयार व्हाव्यात, यासाठी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
0
बनावट पासवर प्रवास करणारा युवक गजाआड

कळंब -अपंग, जेष्ठ नागरीक असल्याचे खोटे पुरावे सादर करुन बनावट पास काढणारी टोळी सक्रीय झाली आहे. अशाच प्रकारातून दुसºया व्यक्तीच्या नावावर बनावट पास तयार करुन एक युवक एसटी बसमध्ये प्रवास करत असल्याचे आज उघड झाले. चालक व वाहकाने बस पोलिस ठाण्यात लावुन या युवकाला पोलिसांच्या स्वाधिन केले.
मुन्ना उर्फ निलेश बन्सीलाल कोठारी (२९) रा. कात्री असे आरोपीचे नाव आहे. आशिष झलके रा. कात्री या युवकाच्या नावाने बनावट पास काढून त्यावर स्वत:चे छायाचित्र लावले. यवतमाळ येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असल्याचे पासवर नमुद केले. आज सकाळी उमरखेड -नागपूर या बसमध्ये तो यवतमाळ वरुन कात्री येथे जात होता. यावेळी वाहक गोविंद पिराजी चनेबोइनवाड (३८) रा. उमरखेड यांनी त्याला तीकीट काढण्याबाबत विचारणा केली. त्यावर मुन्नाने पास असल्याचे सांगितले. यावेळी वाहकाने पास चालत नसल्याचे सांगताच सदर युवकाने वाद करुन मारहाण केली. त्यामुळे वाहक व चालकाने बस पोलीस ठाण्यात नेऊन मुन्नाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी कसुन चौकशी केली असता, पास बनावट असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुन्ना कोठारी याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला. राज्य शासनाकडून एसटी प्रवासाबाबत विशेष सवलत देण्यात आली आहे. मात्र निव्वळ आपल्या फायद्यासाठी अनेक नागरिक खोटी कागदपत्रे तयार, पुरावे सादर करुन ही सवलत पास मिळवित आहे. त्यामुळे महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाला लाखोंचा चुना लावत आहे.
0
शिवेसना उपतालुका प्रमुखाच्या खूनातील तीन आरोपी गजाआड

यवतमाळ – येथील शिवसेना उपतालुका प्रमुख रामनारायण उर्फ दादू इंद्रजित मिश्रा (४०)रा. उमरसरा यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकाºयांच्या पथकाने अटक केली.
विठ्ठल मारोतराव ढोणे (३४), जगदिश पुरुषोत्तम दांडगे, मारोती आसेवार (३५) सर्व रा. संकटमोचन, उमरसरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विठ्ठल व मारोती हे दोघेही शासकीय कंत्राटदार असून मिश्रा यांनी वरिष्ठांकडे कामाच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे कामांचे बिल अडकलयाने वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याचा खून केल्याची पोलिसांनी सांगितले. काल मध्यरात्री विठ्ठल ढोणे व जगदिश दांडगे हे दोघे बसने यवतमाळात येत असल्याची ‘टिप’ उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. त्यावरून बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी लगेच जगदिशला अटक केली. मात्र विठ्ठल पोलिसांना चकमा देवून अॅटोने मुलकीकडे निघून गेल्याची माहिती जगदिशने पोलिसांना दिली. त्यावरून पथकाने लगेच अॅटोचा पाठलाग करून विठ्ठलला अटक केली. त्यापाठोपाठ मारोती आसेवार यालाही अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय ढोले, इक्बाल शेख, विजय जाधव, गजानन धात्रक यांनी केली.
0
भरधाव ऑटोची डिझायर कारला धडक
हिंगोली अकोला राज्य महामार्गावर हिंगोली नाका ते अकोला नाका दरम्यान जड वाहनंाची वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून ही वाहतुक बायपासमार्गे शहराच्या बाहेरुन वळविण्यसाठी बायपास सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. जेणेकरुन शहराच्या अंतर्गत भागातून होणार्या वाहतुकीचा ताण कमी होईल. या महामार्गावर सातत्याने होणार्या लहानमोठ्या अपघातामध्ये महामार्गावर दुतर्ङ्गा वाढलेले अतिक्रमणही कारणीभूत आहे. तसेच हिंगोली नाका चौक, पुसद नाका चौक, बस स्टॅन्ड चौक, अकोला नाका चौक आदी भागात वाहतुक पोलीसांची ड्युटी असली तरी पोलीस वाहतुकीकडे लक्ष न देता केवळ वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यातच जास्त लक्ष देतात. पुसद नाका चौक तसेच पोस्ट ऑङ्गीस चौकामध्ये पोलीसांच्या डोळ्यादेखत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुक धुमधडाक्यात सुरु आहे. या अवैध वाहनामध्ये नियमापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने प्रवासी भरुन भरधाव वेगाने वाहतुक केली जात असल्यामुळे हे ही अपघातांचे एक प्रमुख कारण आहे.
0
शपथविधीची जोरदार तयारी, सुरक्षेसाठी हवाई दल आणि एनएसजी तैनात
नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी जोरदार सुरु आहे. या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे मोदींसोबत मंत्रीपदाची शपथ कोण घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. २६ मे रोजी होणा-या या शपथविधी सोहळ्यातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपचे प्रमुख राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी आणि अरुण जेठली या नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीस मोदी देखील उपस्थीत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींसोबत काही जण मंत्रीपदाची शपथ घेतील. त्याआधी दिवसभर अकाली दलचे प्रमुख आणि पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी राजनाथ सिंग यांची भेट घेतील. केंद्रीय मंत्रिमंडळात अकाली दलाला एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोदींच्या शपथविधीसाठी राजधानीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनाला सुरक्षा व्यवस्था असते. तशीच सुरक्षा या समारंभासला देण्यात आली आहे. भारताच्या शेजारील देशाचे राष्ट्रप्रमुख आणि तीन हजारूहून अधिक पाहूणे या कार्यक्रमास येणार आहेत. त्यामुळे रायसीना हिल्स परिसरातील सर्व कार्यालये कार्यक्रमाच्या पाच तास आधी बंद करण्यात येणार असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.या परिसरातील हवाई सुरक्षेची जबाबदारी भारतीय हवाई दलाकडे सोपवण्यात आली आहे. परिसरातील सर्व उंच इमारतींवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.याशिवाय मोबाइल हिट पथक, अँटी-एअरक्राफ्ट, राष्ट्रीय सुरक्षा पथकाचे शार्पशूटर्स, दिल्ली पोलिसांचे विशेष अधिकारी या परिसरात असतील
0
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे निधन

पुणे- ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. गुरुवारी संध्याकाळी आनंद मोडक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी दुपारी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कोथरुड येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
घांशीराम कोतवाल या नाटकाच्या संगीताद्वारे त्यांनी कारकिर्दीचा शुभारंभ केला होता. महानिर्वाण, तीन पैशांचा तमाशा, पडघम या नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीत प्रवास बहरत गेला. एक होता विदूषक, चौकट राजा, हरिशचंद्राची फॅक्टरी, मुक्ता, तू तिथे मी, कळत- नकळत अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार संगीत दिले. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले. नुकताच प्रदर्शित झालेल्या यशवंतराव चव्हाण या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले आहे.
0
भारतीय दूतावासावर हल्ला, चार दहशतवादी ठार
काबूल- अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर हल्ला करणा-या चारही दहशतवाद्यांना ठार मारल्याचे आयटीबीपीचे प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले.
पश्चिम अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील भारतीय दूतावासावर चार सशस्त्र दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी हल्ला केला. या चारही जणांना ठार मारल्याचे इंडो- तिबेटन सीमा दल (आयटीबीपी) प्रमूख सुभाष गोस्वामी यांनी सांगितले. यातील एका दहशतवाद्याला आयटीबीपी आणि तीन दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या जवानांनी ठार मारले.
भारतीय दूतावासातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिका-यांनी दिली. तसेच काबूल येथील दूतावास आणि जलालाबाद येथील वकिलातीत बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर मझर ए शरीफ आणि खंदहार या भागातही चोख सुरक्षा ठेवण्यात आली असून या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. भारत सरकार अफगाणिस्तानच्या संपर्कात असून, परराष्ट्र सचिव सुजाता सिंग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली.
0
शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाचा भरचौकात खून
यवतमाळ – पूर्ववैमनस्यातून येथील शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांचा भरचौकात निघृण खून केला. आज सायंकाळी उमरसºयातील तीन फोटो जवळ घटलेल्या या हत्याकांडाने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रामनारायण उर्फ दादु इंद्रजीत मिश्रा (४०) रा. उमरसरा असे मृतकाचे नाव असून ते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते. आज सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दादुच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून उमरसरा येथील तीन फोटो चौकात त्याला बोलावले होते. त्यावरुन तो आपल्या दुचाकीने घटनास्थळी आला होता. यावेळी दुचाकीने आलेल्या दोन अज्ञात मारेकºयानी तलवारीने दादुच्या डोक्यावर सपासप घाव मारले. यामध्ये दादु रक्ताच्या थारोळ््यात जमीनीवर कोसळला. काही कळायच्या आतच मारेकरी तेथून पसार झाले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी आॅटोत टाकुन त्याला कै. वसंतराव नाईक महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करुनही दादुचे प्राण वाचविता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच आ. संजय राठोड यांनी रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली.
दादु मिश्रा यांनी उमरसरा ग्रामपंचात अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याच्या कामाची वरिष्ठाकडे तक्रार केली होती. तेव्हापासून त्याना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याची माहिती असून त्यातूनच विठ्ठल नामक व्यक्तीने हा हल्ला केला असावा अशी चर्चा आहे. यावेळी शिवसैनिकांनीही घटनास्थळ व रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच चार्ली कमांडो पथक, वडगाव रोड पोलिस, टोळी विरोधी पथक, उपविभागीय अधिकाºयांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पाहणी केली. हा खून कोणी व का केला हे अजुनही उघड झाले नसुन पोलिस मारेकºयांच्या शोधात रवाना झाले आहे.
0
मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ््यात
यवतमाळ – रेती वाहतुक करणाºया वाहनावर कारवाई करण्याची भिती दाखऊन दहा हजार रुपये लाच स्विकारणाºया लोणबेहळ सर्कलच्या मंडळ अधिकाºयास रंगेहात अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी ही कारवाई केली असून लाचखोर अधिकाºयांचे धाबे दणानले आहे.
ज्ञानेश्वर किसन गरकळ असे लाचखोर मंडळ अधिकाºयाचे नाव आहे. आर्णी तालुक्यात असलेल्या रेती घाटामधुन रेती वाहून नेणाºया वाहनावर कारवाई करण्याची भिती मिलन घोरफडे रा. गाजेगाव जि. सातारा याना भिती दाखविली. तसेच रेती वाहतुक सुरळीत सुरु ठेवण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली. या बाबतची तक्रार
घोरफडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरुन आज पथकाने आर्णी तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. दरम्यान तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपये स्विकारताच गरकळ याला रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, सुधाकर कोकेवार, गजानन राठोड, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अमित जोशी, निलेश पखाले, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे यांनी केली.
0
आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास
यवतमाळ – पारवा येथील दोन भावंडावर प्राणघातक हल्ला करणाºया आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला.
हनुमान पांडूरंग पेंदोर रा. पारवा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २०१२ रोजी ढोल ताशे मंडवितांना अविनाश चंद्रभान सोयाम, गजानन चंद्रभान सोयाम या दोन्ही भावंडावर चाकुने वार करुन प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी अे.जी. कोळथळकर यांनी आरोपीला अटक करुन प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.टी. बारणे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये एकुण ९ साक्ष तपासण्यात आल्या. त्यापैकी घटनास्थळ व जप्ती पंचनाम्यावरील साक्षदार फितूर झाला. मात्र जखमी व डॉक्टरांची साक्ष ग्राह्य धरुन आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारीपक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र मेश्राम यांनी युक्तीवाद केला.
0
मुक्ती कोण पथे’ अमृत महोत्सवाचे २४ मे रोजी उद्घाटन

यवतमाळ – नॅशनल आंबेडकराईट गार्ड (नाग) च्या वतीने ‘मुक्ती कोण पथे’ अमृत महोत्सवा निमित्त उर्जा दिनाचे उद्घाटन २४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आंबेडकरी विचारवंत अशोक बुरबुरे याच्या हस्ते होणार आहे.
अध्यक्षस्थानी कवडू नगराळे हे राहणार आहे. स्वागताध्यक्ष नंदकिशोर निमगडे , आ. संदिप बाजोरीया, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, बुद्धप्रिय थूल , प्रा. अनिल काळबांडे, नंदकुमार रामटेके उपस्थित राहणार आहे. धम्म चळवीत योगदान देणारे धम्मभूमिचे संपादक विजय डांगे, महाप्रजापती गौतमी बुद्घ विहार जामनकर नगर, विश्वशांती बुद्घविहार उमरसरा, नालंदा बुद्घ विहार पिंपळगाव, महाप्रजापती गौतमी बुद्घ विहार दलित सोसायटी, धम्मगंध बुद्घविहार गुरुनानगर नगर, गौतमी बुद्घ विहार तलाव फैल, मातोश्री रमाबाई आंबेडकर बुद्घविहार पाटीपूरा, चंद्रमणी बुद्घविहार नेताजी नगर, अशोका बुद्घविहार अशोक नगर, सम्राट अशोक बुद्घविहार पाटीपूरा, शिलाचारा बुद्घविहार पाटीपूरा, लुंबिनी बुद्घविहार लुंबिनी नगर, श्रावस्ती बुद्घविहार गिरीजा नगर, शांतीदूत बुद्घ विहार वडगाव, भीमाई बुद्घ विहार वाघापूर, सिद्घार्थ बुद्घविहार फाळेगाव, नागभूमि बुद्घविहार वडगाव, गौतमी महिला मंडळ लोहारा इत्यादी विहारांच्या धम्मसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सुप्रसिद्घ पुरातत्व संशोधक व धम्मलेखक गोपीचंद कांबळे यांना भीम-उर्जा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तनंतर लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली कवि संमेलन होणार आहे. यामध्ये संध्या सराटकर, प्रा. अशोक इंगळे , शेषराव पिराजी धांडे, डॉ. गणेश टाले, अशोककुमार दवणे, योगानंद टेभुर्णे, बळी खैरे, संदेश ढोले, माधव सरकुंडे, दशरथ मडावी, मन्सुर एजाज जोश, संघमित्रा टेंभूर्णे, सिद्धार्थ भगत , गित घोष, हेमंतकुमार कांबळे, सुनिल कुमरे, जनार्दन मोहिते, अनिल कोसे, सुनील वासनिक, मनिषा कांबळे, प्रा. महेंद्र हंबर्डे, विजय गाडगे, जगदिश भगत, प्रकश खरतडे, प्रमोद कांबळे, आनंद गायकवाड इत्यादी वकी यात सहभागी होणार आहे. संचालक प्रशांत वंजारे हे करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नाग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी केले आहे.
0
रेल्वेची टॅक्टरला धडक एक ठार

गोंदिया – गोंदिया-बालाघाट रेल्वेमार्गावरील गर्रा रेल्वेस्टेशनजवळ गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास रेल्वेने टॅक्टरला धडक दिली. या अपघातात टॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. टॅक्टर वाळू घेऊन रेल्वे क्रॉसिंग करीत असतानाच अडकला आणि कटगीकडून बालाघाट मार्गे गोंदियाकडे येत असलेल्या रेल्वेने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, टॅक्टरचे चेसीस, ट्रॉली, इंजीनचे तुकडे झाले. तर काही रेल्वेच्या इंजीनसोबत २०० मीटर दूरपर्यंत फेकले गेले. टॅक्टरमध्ये तीन जण बसले होते. यातील एकाचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. रेल्वेची या अपघातात कुठलीही हानी झालेली नसून इतर वित्त व जिवित हानी झालेली नाही
0
सोनिया गांधींकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. सोनिया गांधी यांनी मोदींना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सूत्रांनी सांगितले.
१६ मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपने २८२ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले होते. तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाला केवळ ४८ जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचे जगभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी अभिनंदन केले होते.
0
सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घट

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेने सोने आयातीचे निर्बंध शिथिल केल्याच्या दुस-याच दिवशी सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घट झाली. या वर्षातील सोन्याच्या किमतीतील दिवसभरातील ही सर्वात मोठी घट आहे. तसेच सोन्याचे दर दहा महिन्यांच्या निच्चांकावर आले आहेत.
नवी दिल्लीत सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर २८ हजार ५५० इतके झाले आहेत. ऑगस्ट २०१३ नंतरचा हा सर्वात कमी दर आहे. तर मुंबईतही दहा ग्रॅमचा दर २७ हजार ८४० इतका झाला आहे.
0
लाचखोर पोलीस अटकेत

यवतमाळ – मर्ग तपासामध्ये अटक करू नये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्ती टाळण्यासाठी एका आरोपीला २० हजार रुपयाची लाच मागणाºया उमरखेड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी ही कारवाई केली.
रवी रामचंद्र कपिले असे पोलीस शिपायाचे नाव असून तो उमरखेड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कर्तव्यावर होता. ८/२०१४ क्रमांकाच्या मर्गचा तपास कपिलेकडे होता. याप्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अटक व गुन्ह्यातील मोटरसायकल जप्ती टाळण्यासाठी २० हजार रुपयाची लाच मागितली होती. या बाबतची तक्रार आरोपीच्या मामाने ३ एप्रिल रोजी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून ४ एप्रिल रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात जाऊन पडताळणी केली असता सदर पोलीसाने २० हजार रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी कपिले याच्याविरुद्घ गुन्हा दाखल करून अटक केली.
0
कार झाडावर आदळली, एक ठार,सहा जखमी

यवतमाळ – लग्न समारंभ आटोपून यवतमाळकडे परत येत असताना भरधाव कार झाडावर आदळल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता खानगाव (फाटा) घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह सहाजण गंभीर जखमी झाले.
आशा अंगद राजाभोज (५८)रा. श्याम सोसायटी, असे मृत महिलेचे नाव आहे. महेंद्र अंगद राजाभोज (४२) रा. श्याम सोसायटी, कविता अंगद राजाभोज (३०), मंजुषा विवेक शाहू (३०)रा. इंदोर, हिमांशू महेंद्र शाहू (७), आयुषी विवेक शाहू (२),वेदायू महेंद्र राजाभोज, अशी जखमींची नावे आहे. महेंद्र राजाभोज हे स्वत: वाहन चालवित होते. त्यांचा अँग्लो हिंदी हायस्कूलजवळ फोटो स्टुडिओ आहे. राजाभोज कुटुंबीय चंद्रपूर येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. रात्री हा समारंभ आटोपल्यानंतर सकाळी चंद्रपूर येथून एम.एच.०२/पीए-९१९६ क्रमांकाच्या सँट्रो वाहनाने यवतमाळकडे परत येत होते. दरम्यान महेंद्रला रात्रीच्या जागरणामुळे डुलकी येत होती. त्यामुळे काही वेळासाठी वाहन थांबविण्याचा सल्ला कुटुंबियांनी दिला. मात्र यवतमाळ अगदीजवळ असल्याचे सांगून पुढील प्रवासाला निघाले. खानगाव(फाटा) येथे पोहोचत नाही तोच डुलकी आल्याने त्यांचे भरधाव वाहन झाडावर जावून आदळले.
0
अजय बन्सोड हत्याकांडातील दोन आरोपीस अटक

यवतमाळ – पूर्व वैमनस्यातून तलावारीचे वार करून अजय भीमराव बन्सोडचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री पाटीपुरा येथे घडली होती. दरम्यान आज एटीएस पथकाने दोन आरोपींना अटक केली असून उर्वरीत एक आरोपी फरार आहे.
रितेश बाविस्कर, राजा जंगले रा. अशोक नगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. घटनेच्या दिवशीच आरोपी सचिन डोंगरे (२४), अनिकेत दिनेश वासनिक दोघेही रा. पाटीपुरा यांना अटक केली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खून प्रकरणातील आरोपी नितीन धुळे रा. पाटीपुरा हा फरार असून त्यांचा शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई एटीएस पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश टाले, सुभाष कामटकर, योगेश डगवार, आशिष चौबे, सुभाष नागदिवे, नितीन इंगोले, साजीद खान, दुषन पोपटकर यांनी केली.











