पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for June 19th, 2014

विहिरीत बुडून तिघांचा मृत्यू 0

विहिरीत बुडून तिघांचा मृत्यू

images
पांढरकवडा – तालुक्यात विविध दोन घटनेत विहिरीत बुडून तिन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना आज गुरूवारी घडल्या. शेतात विहीरीवर पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर त्याना वाचविण्याच्या प्रयत्नात  एकाचा मृत्यू झाला.  या घटनेने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
झिबला हुसेन परचाके (६०), चेंडकु रामपुरे (४०) रा. करंजी, अमित पुरुषोत्तम नवले (२५) रा. रामपूर कारेगाव  अशी मृतकांची नावे आहे. करंजी येथील कांबळे यांच शेतात झिबला व चेंडकु हे काम करीत होते. दरम्यान तहान लागल्याने झिबला हे शेतातीलच विहीरीवर पाणी पिण्यासाठी गेले होते. यावेळी तोल जाऊन ते विहीरीत पडले. ही बाब निदर्शनास येताच  त्याना वाचविण्यासाठी चेंडकुने विहीरीत उडी टाकली. त्यामध्ये त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तर अमित नवले हा रामपूर कारेगाव येथील शेतकरी प्रकाश सहस्त्रबुद्घे याच्या शेतात गेला होता. दरम्यान सकाळी ७ वाजताच्या सुमारास पाणी पिण्यासाठी विहीरीवर गेला. यावेळी पाणी काढताना तोल जाऊन तो विहीरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामे करून मृतदेह  शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या घटनांनी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

गुराख्याचा गळयावर फिरवला चाकु   0

गुराख्याचा गळयावर फिरवला चाकु

index
सावळी सदोबा  – जंगलात गुरे ढोरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याच्या गळ््यावर चाकु फिरवून प्राणघातक हल्ला केल्याची  घटना  बुधवारी दुपारी येळशी येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पांढरकवडा येथील उपविभागीय पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
धर्मानंद देवतळे (५०) रा. नामापुर तांडा असे गुराख्याचे नाव आहे. गावातील नागरिकांच्या गायी चारण्यासाठी तो येडशी येथील जंगलात गेला होता. अशातच एका अज्ञात व्यक्तीने अचानक धर्मानंदच्या गळ््यावर धारदार चाकु फिरवला. तसेच हातावर व बरगडीवरही चाकुने सपासप वार केले. जखमी अवस्थेत गुराखी येडशी या गावापर्यंत आले. त्यांनी हा प्रकार तेथील नागरिकांना सांगताच त्याला एका वाहनाने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. हल्ला चढविणारा आरोपीने याच जंगलात गुरे चारणाºया दोन गुराख्यांना धर्मानंद बद्दल विचारणा केली होती. या प्रकरणाची तक्रार जगन्नाथ देवतळे (६६) यांनी पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन ठाणेदार पंजाब वंजारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळावरून चपला व अन्य साहित्य जप्त केले. दरम्यान आज पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुराख्यावर कोणी व का हल्ला चढविला हे अजुनही उघड झाले नसून पोलिस आरोपीचा कसुन शोध घेत आहे.

June 19, 2014 in विदर्भ
जागतिक रॅपिड बुध्दीबळ, आनंदला कास्यपदक 0

जागतिक रॅपिड बुध्दीबळ, आनंदला कास्यपदक

Viswanathan Anand at an event
दुबई – जागतिक रॅपिड बुध्दीबळ स्पर्धेमध्ये भारताचा अव्वल बुध्दीबळपटू विश्वनाथन आनंदने जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. मात्र कार्लसनला पराभूत करुनही, आनंदला या स्पर्धेमध्ये कास्यपदकावर समाधान मानावे लागले तर, कार्लसनला सुवर्णपदक मिळाले.
स्पर्धेच्या गुणांकन पध्दतीमुळे कार्लसनला पराभूत होऊनही सुवर्णपदक जिंकता आले. कार्लसनने पंधरापैकी सर्वाधिक अकरा गुण मिळवले. आनंद, फॅबियानो कारऊना आणि अलेक्झांडर मोरोझेवीच हे संयुक्तपणे १०.५ गुणांसह दुस-या स्थानावर होते. मात्र टायब्रेकमध्ये इटलीच्या फॅबियानोची आनंदपेक्षा सरस कामगिरी असल्याने त्याला रौप्य पदक मिळाले तर, आनंदने रशियाच्या मोरोझोवीचवर मात करत कास्यपदक पटकावले. कार्लसनला पराभूत केल्यानंतरचे आनंदचे तीन्ही सामने ड्रॉ झाले होते. याउलट कार्लसनला फक्त आनंदकडून पराभव स्वीकारावा लागला. कार्लसनने आठ विजय मिळवताना, सहा सामने ड्रॉ झाले त्यामुळे कार्लसन सुवर्णपदक मिळाले.

June 19, 2014 in क्रीडा
स्वीस बँकांतील भारतीयांच्या ठेवी वाढल्या 0

स्वीस बँकांतील भारतीयांच्या ठेवी वाढल्या

Swiss-National-Bank

नवी दिल्ली- स्वीस बँकेत भारतीयांकडून जमा झालेल्या ठेवीमध्ये तब्बल ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती स्वित्झर्लंडमधील मध्यवर्ती बँकेने दिली आहे. ही रक्कम जवळ जवळ १४ हजार कोटी इतकी असल्याचे बँकेने म्हटले आहे.
स्वित्झर्लंडमधील असलेल्या बँकांमध्ये २०१३मध्ये भारतीयांकडून ठेवण्यात आलेल्या ठेवी ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे देशातील मध्यवर्ती स्वीस नॅशनल बँक(एसएनबी)च्या ताज्या आकडेवारी म्हटले आहे. भारतीयांच्या ठेवींमध्ये वाढ झाली असली तरी जगातील अन्य देशातील खातेदारांचा विचार केल्यास स्वीस बँकांमधील एकूण ठेवींमध्ये घट झाल्याचे ‘एसएनबी’ म्हटले आहे. ठेवींचे प्रमाण २०१३च्या आर्थिक वर्षाअखेर ९० लाख कोटींनी कमी झाल्याचे बँकेने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे. २०१२या आर्थिक वर्षात भारतीयांकडून स्वीस बँकांमध्ये ठेवण्यात येणा-या ठेवींचे प्रमाण एक तृतीयांशने कमी झाले होते. भारतीयांकडून ठेवींमध्ये घट होण्याचा सर्वांत निच्चांक ठरला होता. तर २०१३ अखेर व्यक्तीगत भारतीयांनी ठेवीदारांनी स्वीस बँकांच्या खात्यांमध्ये १.९५ अब्ज स्वीस फँक तर मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांमार्फत ७.७३ कोटी स्वीस फँक इतक्या ठेवी ठेवल्या आहेत. भारतासह जगभरातील अनेक देशांकडून स्वीस बँकांमध्ये असलेल्या ठेवींची माहिती मागवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. अशा वेळी एसएनबीने ही आकडेवारी प्रसिद्ध केल्यामुळे स्वीस बँकांमधील पैसा हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतातील नरेंद्र मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. ही समिती पदेशात असलेल्या भारतीयांच्या काळ्यापैश्याचा तपास करणार आहे.

June 19, 2014 in मुख्य पान
 वाघिणीची शिकार; आरोपींना सक्तमजुरी 0

वाघिणीची शिकार; आरोपींना सक्तमजुरी

19062014-md-ng-2-5319-1-large
अमरावती – व्याघ्र प्रकल्पातील ढाकणा येथील वाघिणीच्या शिकार प्रकरणातील दोषी ३ आरोपींना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ९0 हजार रुपयांचा दंड अमरावती येथील मुख्य न्याय दंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयाने ठोठावला आहे. तर यातीलच ३ आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मात्र एका वर्षात अतिशीघ्र गतीने तेही एकाच वर्षात वाघाच्या शिकार प्रकरणी आरोपींना शिक्षा ठोठावणारे हे भारतातील पहिले प्रकरण ठरले आहे.
यामध्ये आरोपी मधुसिंग लिहारसिंग राठोड (३0), चिंताराम लिहारसिंग राठोड (२८) आणि विनोद प्रेमलाल पवार निघेट रा. सिंधबन मोथाखेडा ता. चिखलदरा यांचा समावेश आहे. तर सागरलाल गोरेलाल पवार, मिश्रीलाल जुगदया चव्हाण दोघे रा. सिंधबन व नरवीलाल रुचलेसिंग पवार रा. सावलीखेडा यांची सुटका झाली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानांतर्गत ढाकणा परिक्षेत्रातील बोरीपाटा राऊंडमध्ये येणार्‍या दक्षिण डोलार बिटमध्ये ४ मार्च २0१३ ला एका वाघिणीची राखीव वनक्षेत्रात शिकार करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय शिकारी रंजीत भाटिया (बावरिया) रा. हुशापूर पंजाब (६0) याने ४ आरोपींना लोखंडी चिमटा (ट्रॅप) दिला. त्या चारही आरोपींनी तो लोखंडी चिमटा घेऊन गाभाक्षेत्रातील धोकाग्रस्त व्याघ्र अधिवासात जाऊन सापळा रचला. ३ दिवसानंतर पुन्हा त्याच ठिकाणी गेल्यावर सापळ्य़ात एक पट्टेदार वाघीण अडकल्याचे दिसले. तेव्हा अनुकुचीदार भाला वाघिणीच्या तोंडात टाकून तिची हत्या करण्यात आली. वाघिणीच्या मिशा, नखे, हाडे, चामडे काढून ते दीड महिना घरात लपवून ठेवले व मांस समोरच्या दरीत फेकून दिले. यातील मधुसिंग राठोडने मध्यप्रदेशातील तुकईथळ रेल्वेस्थानकावर जाऊन वाघाचे अवशेष त्याच्या हवाली केले व सौद्यात ठरल्याप्रमाणे पैसे घेतले होते. दरम्यान, खबर्‍याने दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने लगेच आरोपींना अटक करून छडा लावला होता. या पथकाने संपूर्ण भारतात छापे मारून १३ जणांना अटक केली होती. १४ मे २0१३ हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात ३ वेगवेगळय़ा चार्जशीट दाखल केल्या होत्या. १६ मे २0१३ ला फाईल ओके करुन १२ फेब्रुवारी२0१४ ला कोर्टात पुरावे सादर करण्यात आले होते. गत २ महिन्यांपासून या प्रकरणाच्या निकालाबाबत वनखात्यासह निसर्गप्रेमी वन्यजीव अभ्यासकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अमरावती येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जयंत राजे यांच्या न्यायालयाने मधुसिंग लिहारसिंग राठोड, चिंताराम राठोड, विनोद प्रेमलाल पवार तिघे रा. सिंधबन मोथाखेडा या तिघांना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ९0 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर विनोद प्रेमलाल पवार, सागरलाल पवार आणि नटवीलाल पवार या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याच प्रकरणात अनेश छात्रसिंग राठोड हा माफीचा साक्षीदार होता. मात्र त्याने वेळीच बयान बदलविल्याने त्याच्यावर खोटे बोलणे व शिकारीत सहभागी असल्याचा ठपका ठेवून अशा दोन ट्रायल चालविण्याचे आदेश न्यायालयाने बजावले आहेत. या प्रकरणात एकूण १४ आरोपींना अटक केली असून अद्यापही फरार आहे. जंगलातील अतिसंरक्षित क्षेत्रात आग पेटविणे, वाघ मारणे, व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणे, धोकाग्रस्त व्याघ्र अधिवासात शस्त्रास्त्र घेऊन शिरणे यासाठी प्रत्येकाला ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणी प्रत्येकी ९0 हजाराचा दंड सुनावण्यात आला. टायगर पोचिंग (वाघाची शिकार)मध्ये जलदगतीने एका वर्षाच्या आत निकाल लागणे हे भारतातील पहिलेच प्रकरण म्हणावे लागेल. कारण आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या वेगाने कुठल्याही प्रकरणाचा निकाल लागला नाही, हे विशेष. न्यायालयात वनविभागाच्या वतीने जिल्हा विशेष सरकारी वकील अँड़ उदय शशीकुमार देशमुख तर आरोपींच्या बाजूने अँड़ पी.बी. महल्ले यांनी काम पाहिले.

 डॉ. भाभांच्या बंगल्याची ३७२ कोटींना विक्री 0

डॉ. भाभांच्या बंगल्याची ३७२ कोटींना विक्री

19062014-md-ng-1-9404-2-large
मुंबई : भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील ‘मेहरनजीर’ या बंगल्याची ३७२ कोटींना विक्री करण्यात आली आहे. बंगला खरेदी करणार्‍या मालकाने आपले नाव घोषित करू नये, अशी विनंती ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ला (एनसीपीए) केली आहे. त्यानुसार नव्या मालकाचे नाव जगजाहीर करण्यात येणार नाही.
डॉ. होमी भाभा यांचा हा बंगला केवळ मुंबईच्याच नव्हे तर भारताच्या आधुनिक इतिहासाची पाऊलखुण मानली जाते. या बंगल्याचा लिलाव जूनमध्ये करण्याचा निर्णय या जागेचा ताबा असणार्‍या ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ने (एनसीपीए) घेतला होता. या बंगल्याचा भूखंड १७ हजार १५0 चौरस फुटांचा आहे, तर १३ हजार ९५३ चौरस फूट बिल्टअप क्षेत्र आहे.लिलावाची प्राथमिक किंमत २५७ कोटींची ठेवण्यात आली होती. मात्र त्यापेक्षा ११५ कोटी जास्त बोली लावून बंगला खरेदी करण्यात आला. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या बंगल्याची लिलावाच्या माध्यमातून विक्री न करता ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून घोषित केला जावा, अशी मागणी करत भाभा अणुसंशोधन केंद्रातील कर्मचारी संघटनांनी जनहित याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत लिलाव प्रक्रियेवर स्थगिती आणण्यास नकार दर्शवला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनीही केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

अट्रॉसिटीच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा - डी.आर. बनसोड 0

अट्रॉसिटीच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा – डी.आर. बनसोड

TNAIMAGE67823Amravati
अमरावती : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा (अट्रॉसिटी) तातडीने निपटारा करण्याचे निर्देश सोमवारी विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय दक्षता समितीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या त्रैमासिक आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. बनसोड बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल.आय. वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते. तर यवतमाळचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अमरावतीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे, वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी, अकोल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी बी.एन. इंगळे, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले.
बैठकीत सर्वप्रथम अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत दाखल झालेले गुन्हे व मंजूर केलेल्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. विभागात यवतमाळ जिल्ह्यात प्रलंबित प्रकरणांची संख्या जास्त आहे. यवतमाळसह विभागातील सर्वच जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेने जलद गतीने तपास करुन आरोपींवर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही ते यावेळी म्हणाले.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत विभागात मार्च 2014 अखेर 97 एकर जमिनीचे वाटप झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट जमिनीचे वाटप व्हावे अशी अपेक्षा विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली. तसेच ज्या जिल्ह्यात या योजनेसाठी प्रस्ताव व लाभार्थी दोन्ही आहेत अशा जिल्ह्यांनाच निधी द्यावा, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या 20 टक्के सेस फंडातून घेण्यात आलेल्या कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकानिहाय तसेच उपविभागीय अधिकारी स्तरावर माहिती घेऊन खर्चाचे नियोजन करावे. रमाई घरकुल योजनेत जास्तीत जास्त प्रस्ताव मिळवून गोरगरीबांना निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही श्री. बनसोड यांनी केली.

निम्न पैनगंगा’ च्या भुसंपादनात शासनाची फसवणूक , तीन अधिकाºयांसह शेतकºयारवर गुन्हे 0

निम्न पैनगंगा’ च्या भुसंपादनात शासनाची फसवणूक , तीन अधिकाºयांसह शेतकºयारवर गुन्हे

e24bimg_203812_chimta_nended4t534_240x180-150x150
यवतमाळ – पर्यावरण व वनमंत्रालयाच्या एनओसीविना अधांतरी लटकलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भुसंपादनात प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, आर्णीचे दूय्यम निबंधक व शेतकºयाने संगणमतातून शासनाला लाखोंचा चुना लावला आहे. याप्रकरणात धरण विरोधी संघर्ष समितीने आर्णी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालावरून संबधीतावर फसवणूकीचे गून्हे दाखल करण्यात आले आहे.
गोदावरी खोºयातील उपनदी असलेल्या निम्न पैनगंगा नदीवर सिंचन प्रकल्प उभारणीसाठी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सर्वशक्ती पणाला लावली आहे. मात्र या प्रकल्पाच्या बूडीत क्षेत्रात हजारो हेक्टर सोन्यासारखी सुपिक जमिन व अनेक गावे जात असल्याने त्याऐवजी विष्णूपुरी पध्दतीचे बंधारे बांधावे यासाठी धरण विरोधी संघर्ष समितीने आपला विरोध चालविला आहे. या विरोधाला न जूमानता शासनाच्या जलसंपदा खात्याने प्रकल्पासाठी भुसंपादनाचे काम हाती घेत आर्णी तालुक्यातील खडका येथील काही हेक्टर शेतींचे संपादनही केले. भुसंपादन करताना कोरडवाहू शेतीचे सातबारे बागायती दाखवून संपादनाचा भरमसाठ निधी काही शेतकºयांच्या संगणमतातून लाटण्यात आला आहे. अशाच प्रकारे खडका येथील शेतकरी दत्तात्रय लिंगावार यांचेकडील ४ हेक्टर २ आर शेती २५ संप्टेबर २००९ रोजी संपादीत करण्यात आली. संपादनाची प्रक्रिया तत्कालीन निम्न पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सुधाकर बोरसे, आर्णीचे उपअभियंता राजपाल वाणे यांनी दुय्यम निबंधक बी. एन. टगेवार यांचेकडून खरेदीखताव्दारे करून घेतली. कोरडवाहू शेती असताना, ती ओलीताची दाखवित हा गैरप्रकार करण्यात आला. शेतीचा आकार ९.४० असताना खरेदी करतेवेळी तो १०.४० असा करण्यात आला. खडकाचे दर वापरता इतर जिल्ह्यातील सुपिक जमिनीसाठी असलेले खरेदी दर वापरून २० लाख ५५ हजार ७९४ रूपयाचा अधिक मोबदला लाटल्याची तक्रार संघर्ष समितीने जिल्हाधिकाºयासह पाटबंधारे विभाग व पोलिसात डिसेंबर २०१३ मध्ये केली होती. तक्रारीवरून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी भुसंपादनात दोषी असलेल्या तलाठ्यावरही कारवाई केली. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने १३ मे २०१४ रोजी संघर्ष समितीचे विजय राउत यांनी आर्णी च्या दिवाणी न्यायालयात शेतकरी लिंगावार यांचेसह बोरसे, वाणे व टगेवार यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले. त्यावरून आज आर्णी येथील प्रथम श्रेणी दंडाधिकारी तुषार आगलावे यांनी या प्रकरणाचा निकाल देत संबधितावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आर्णी पोलिसांना दिले. त्यावरून पोलिसांनी फसवणूकीसह विविध कलमान्वये गून्हे दाखल केले आहे. या प्रकरणात संघर्ष समितीच्यावतीने अ‍ॅड. प्रमोद चौधरी यांनी काम पाहिले. या निर्णयाचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटिल जगताप, मुबारक तंवर, अ‍ॅड. बालाजी येरावार, प्रल्हाद गांवडे, मिलिंद श्ािंदे यांनी केले आहे.