पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for August 16th, 2014

नियोजन आयोग गुंडाळणार! - पंतप्रधान नरेंद्र मोदी 0

नियोजन आयोग गुंडाळणार! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

2014-08-16~modi-fort__ns
नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या पहिल्या भाषणात लाल किल्ल्यावरून केली. विरोधी पक्षांना सोबत येण्याचे आवाहन करून देशातील जातीय आणि धार्मिक हिंसाचार रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशवासीयांना उद्देशून केलेल्या आपल्या ६५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी अहिंसा, स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता, उद्योग अशा विविध विषयांवर भाष्य केले. उत्पादन क्षेत्रावर भर देऊन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत आयात कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगितले. राज्य सरकारांना सोबत घेऊन देशाला प्रगतिपथावर आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मी देशाचा पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधानसेवक म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय, असे सांगत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. भारताला शेतकरी, कामगार वर्गाने घडवले आहे. भारताच्या वाटचालीत सर्व माजी पंतप्रधानांचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना मी वंदन करतो, असेही मोदी म्हणाले. सरकार सर्व पक्षांना घेऊन पुढे चालत असून, विरोधी पक्षांनी दिलेल्या सहमतीसाठी मोदींनी त्यांचे आभार मानले.
ते म्हणाले की, देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी राज्यांनाही सोबत घेऊ. त्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवस्थेत थोडा बदल करावा लागेल. नियोजन आयोग बरखास्त करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करू. यात राज्य सरकारलाही स्थान दिले जाईल, अशी शाश्वतीही त्यांनी दिली. ही नवीन संस्था सरकारी-खासगी भागीदारी आणि तरुणांतील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करण्यावर भर देण्यासह नवीन संकल्पना मांडण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.

देवभूमीत पुन्हा पूर, ३० ठार 0

देवभूमीत पुन्हा पूर, ३० ठार

uttara
देहरादून – देवभूमीत पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू असून ढगफुटी आणि धोधो पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत ३० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्यावर्षी महाप्रलयाचा तडाखा बसलेल्या उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरंही मातीच्या ढिगाऱ्यांखाडी दबली आहेत. रस्त्यांवर कोसळलेल्या दरडींमुळे मदतकार्यातही मोठे अडथळे येत आहेत.
पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर क्षेत्राला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाच्या तडाख्यात या एकाच जिल्ह्यात १४ जण ठार झाले आहेत. आणखीही काही जण दरडींखाली दबले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हरिद्वारमधील हैनपुरी या संपूर्ण गावाला पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान शहीद 0

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान शहीद

images
जम्मू काश्मीरमधील अवतीपोरा येथील भारतीय हवाई दलाच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील अवतीपोरा येथील भारतीय हवाई दलाच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यात अन्य चार जण जखमी झाले आहेत.
पुलवामा जिल्ह्यातील हवाई दलाच्या या अड्ड्यावरील बीएसएफ जवानांवर दहशदवाद्यांनी आधुनिक शस्त्रांसह गोळीबार केल्याचे अधिका-यांनी सांगितले. हवाई दलाच्या या अड्ड्यावर बीएसएफची १६५वी तुकडी तैनात होती. जखमींना हवाई अड्ड्यावरील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरातील दहशतवाद्यांकडून झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी ११ ऑगस्ट रोजी बीएसएफ जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यात आठ जण जखमी झाले होते.

भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी फडकवला इंग्लंडमध्ये तिरंगा 0

भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी फडकवला इंग्लंडमध्ये तिरंगा

mithali
वॉर्मस्ले (इंग्लंड)- ब्रिटिश भूमीत शनिवारी तिरंगा डौलाने फडकला. ही कमाल भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी केली. मिथाली राजच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी शनिवारी सहा विकेटनी जिंकली. सलामीवीर स्मृती मंढाना (५१) आणि कर्णधार मिथाली राजची (नाबाद ५०) दमदार फलंदाजी विजयात मोलाची ठरली. भारताचा पुरुष संघासमोर सलग तिस-या पराभवाचे सावट असतानाच दरवर्षी कसोटी खेळणा-या इंग्लंडविरुद्ध भारताच्या महिला त्यांच्याच देशात बाजी मारतात, ही बाब लक्ष वेधून घेते.
मिथाली-शिखाचा संयम
विजयासाठी १८१ धावांचे आव्हान गाठणे, भारतासाठी नक्कीच सोपे नव्हते. मात्र तिस-या दिवसअखेर ४ बाद ११९ धावा करत पाहुण्यांनी विजयाच्या आशा कायम ठेवल्या. अपेक्षेप्रमाणे चौथ्या आणि पाचव्या दिवशी कर्णधार मिथाली राजवरच भारताची सर्वाधिक भिस्त होती. तिने चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना शिखा पांडेच्या मदतीने विजयावर शिक्कामोर्तब केले. मिथाली आणि शिखा जोडीने ३४.३ षटके खेळून काढताना पाचव्या विकेटसाठी ६८ धावांची नाबाद भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये संयम किती आवश्यक आहे, हे महिला क्रिकेटपटूंनी दाखवून दिले. एकीकडे भारताचे पुरुष फलंदाज खराब फटके मारून बाद होत असतानाच मिथाली-शिखाची संयमी फलंदाजी महिला क्रिकेटचा उंचावलेला दर्जा सिद्ध करते.
मिथालीने विजयावर शिक्कामोर्तब करताच क्षणभर २००६ मधील इंग्लंड दौ-याची आठवण झाली. त्यावेळी मालिकेतील दुस-या आणि अखेरच्या कसोटीत मिथालीने पहिल्या डावात ६५ आणि दुस-या डावात नाबाद २२ धावा करताना मालिका विजयात मोलाचा वाटा वाटा उचलला होता. ‘सिनियर’ मिथाली पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावली. शुक्रवारी अखेरच्या सत्रात धोकादायक वाटलेली इंग्लंडची मध्यमगती गोलंदाज केट क्रॉसला शनिवारी यश लाभले नाही. पहिल्या डावात पाच विकेट घेणारी यजमानांची मध्यमगती गोलंदाज जेनी गनचेही मिथाली-शिखा पुढे काहीच चालले नाही.