पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for August 19th, 2014

आंतरराज्यीय चेकपोस्टचे सहा लाख लुटले पाटणबोरी येथील घटना

यवतमाळ –  पाटणबोरी येथून तीन किमी अंतरावर महाराष्टÑ-आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय चेकपोस्टवर जमा झालेली सहा लाख रूपयांची रोकड  बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना वाहन अडून दोन युवकांनी लुटल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली.
पाटणबोरीनजीक पिंपळखुटी येथे महाराष्टÑ शासनाचा अत्याधुनिक चेकपोस्ट नाका आहे. तो सद्भाव कंपनीमार्फत चालविला जातो. या चेकपोस्टवर प्रत्येक वाहनचालकाकडून ९० रूपये व अधिक सेवाशुल्क  आकारले जाते. तसेच ओव्हरलोड वाहनांकडून दंडही आकरण्यात येतो. येथे दररोज दीड ते पाऊणे दोन लाख रुपये रक्कम जमा होते. ही रक्कम सद्भाव कंपनीचा व्यक्ती दररोज यवतमाळ येथे जाऊन आयसीआयसीआय बँकेत भरणा करतो.
आज मंगळवारीसुद्धा नेहमीप्रमाणे सकाळी १०.१५ वाजता कंपनीतील प्रवीण राऊत (वय २२) रा. यवतमाळ हा युवक ५ लाख ६५ हजार रूपयांची रोकड घेवून यवतमाळला निघाला. चेकपोस्टवरून एका स्कुटीवर तो पाटणबोरी येथे आला. पाटणबोरी येथे आल्यानंतर तेलंगणा बंदमुळे त्याला आंध्रची बस मिळाली नाही. पाटणबोरीकडून पांढरकवड्याकडे जाणाºया एका दोन दुचाकीस्वारांनी त्याला आपल्या वाहनावर घेतले. ढोकीच्या अलीकडे एका बंद ढाब्यामागे सदर युवकांनी गाडी भरधाव वेगाने नेऊन थांबविली. एका युवकाने त्याची बॅग हिसकावली व एकाने त्याला दगडाने डोळ्याजवळ दुखापत केली. प्रवीणला मारहाण करून दोन्ही युवक पांढरकवड्याकडे स्प्लेंडर दुचाकीने पसार झाले. सदर दोन्ही युवक ३० वर्ष वयाचे आहेत. बॅगमध्ये संपूर्ण १०० रुपयांच्या नोटा मिळून ५.६५ लाख रुपये होते. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिली असून अज्ञात आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.

August 19, 2014 in मुख्य पान
 भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री 0

भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री

ravi
नवी दिल्ली – कसोटी मालिकेत इंग्लंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने भारतीय संघ व्यवस्थापनात काही महत्वाचे बदल केले आहेत.
इंग्लंड विरुध्दच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. या मालिकेत डंकन फ्लेचरच मुख्य प्रशिक्षक असतील. मात्र भारतीय संघाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये रवी शास्त्रींचाही सहभाग असेल. या मालिकेपुरता गोलंदाजी प्रशिक्षक ज्यो डॉस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांची जागा संजय बांगर आणि भारत अरुण घेणार आहे. डॉस आणि पेनी यांना या मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. २५ ऑगस्टपासून सुरु होणा-या एकदिवसीय मालिकेत बांगर आणि भारत अरुण फ्लेचर यांचे सहप्रशिक्षक असतील. २००७ मध्ये बांगलादेश दौ-यात रवी शास्त्री भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक होते. आयपीएलच्या २०१४ च्या हंगामात संजय बांगर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली पंजाब संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यात भारत अरुण भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक होते. बांगर आणि अरुण यांच्याबरोबर आर.श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.

पाकिस्तानातील हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार 0

पाकिस्तानातील हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार

Militants target security forces convoy in Srinagar
इस्लामाबाद – पाकिस्तानातील वायव्य भागातील आदिवासी प्रदेशावर लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाले आहेत.
उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर या आदिवासी प्रदेशात या अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. या भागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाल्याची माहिती लष्कर प्रवक्त्यांनी दिली. ‘तीस आणखी अतिरेकी ठार झाले. तसेच नऊ वाहने आणि काही मोटरसायकल या हल्ल्यात नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. याआधी मंगळवारी सकाळी उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर येथे लपलेले १८ अतिरेकी पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ठार झाले होते. कराची येथील विमानतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तर वाझिरीस्तानमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कारवाईत ६५० अतिरेकी ठार झाले आहेत.

August 19, 2014 in मुख्य पान
व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, स्काइप व वाइबर मोफतच 0

व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, स्काइप व वाइबर मोफतच

mobile-apps
नवी दिल्ली- व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅप्सला शुल्क आकारण्याची मोबाईल कंपन्यांची मागणी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरीटी ऑफ इंडिया (ट्राय) ने फेटाळून लावल्याने हे सर्व अॅप ग्राहकांना मोफत उपलब्ध रहाणार आहेत. फ्री मेसेजिंग अॅप्समुळे मोबाईल कंपन्यांचे मोठे नुकसान होते, ते भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्याची मागणी मोबाइल कंपन्यांनी केली होती.
व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅपमुळे एसएमएस आणि कॉलचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मोबाइल सर्व्हिस देणा-या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्याची मागणी मोबाइल कंपन्यांनी ट्रायकडे केली होती. या कंपन्यांकडून आकारल्या जाणा-या शुल्काचा काही हिस्सा मोबाइल कंपन्यांना देण्यात यावा आणि काही हिस्सा सरकारने घ्यावा, अशी मागणी या कंपन्यांनी केली होती.हे अॅप निशुल्क असले तरी ते वापरण्यासाठी संबंधित ग्राहकाला मोबाईलमध्ये इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, असे ट्रायच्या निदर्शनास आले. त्यामुळे मोबाईल कंपन्यांना अतिरिक्त पैसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.तर हे फ्री मेसेंजर अॅप्स ज्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचे नेटवर्क वापरतात त्या कंपन्यांना नेटवर्क वापरण्याचे पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फ्री अॅप्सवर शुल्क लावण्याची मोबाईल कंपन्यांची मागणी आणि ट्रायकडे प्रस्तावित असलेला प्रस्ताव ‘ट्राय’ने फेटाळून लावला आहे. इस्टंट मेसेजिंगच्या दुनियेतील अल्पावधितच प्रसिद्ध झालेल्या व्हॉटस अ‍ॅप,  लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅपने मोबाईल कंपन्यांची झोप उडवली आहे. ब्राझील, भारत, मेक्सिको, रशिया यांसारख्या देशात व्हॉटस अ‍ॅप युझर्सची संख्या झपाट्याने वाढते आहे. जगभरात व्हॉट्स अ‍ॅपचे दर महिन्याला ४५ कोटी इतेक अ‍ॅक्टिव युझर्स आहेत. दर दिवसाला व्हॉट्स अ‍ॅपवरुन सुमारे ७० कोटी फोटो आणि १० कोटी व्हिडीओ शेअर केले जातात. याआधी फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक युझर्स असलेल्या फेसबुकला व्हॉटस अॅपने १९ अब्ज डॉलर मोजून खरेदी केले होते.