पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 1st, 2015

 जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क - संजय राठोड 0

जिल्ह्यात लवकरच टेक्सटाईल पार्क – संजय राठोड

DSC_6285
पोस्टल मैदानावर महाराष्ट्र दिनाचा वर्धापनदिन
यवतमाळ, दि. 1 : यवतमाळ जिल्हा मोठ्या प्रमाणावर कापुस पिकविणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कापसावर आधारीत प्रक्रीया करणारे मोठे उद्योग निर्माण होणे आवश्यक असतांना एकही उद्योग गेल्या काही वर्षात उभा राहिलेला नाही. राज्य शासनाने विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे प्रक्रीया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विदर्भात येत्या काही दिवसांमध्ये चार टेक्सटाईल पार्क उभे राहात असून त्यात यवतमाळचाही समावेश असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 55 व्या वर्धापनदिनाचा मुख्य सोहळा येथील पोस्टल मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी शुभेच्छा देतांना ते बोलत होते. कार्यक्रमास यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर पोलिस अधिक्षक जे.बी.डाखोरे यांच्यासह अधिकारी, माजी सैनिक, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूवातीस पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. जिल्हृयाचा पालकमंत्री म्हणून काम करतांना जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे. गेल्या पाच महिन्यात प्रशासन अधिक लोकाभिमूख करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम हाती घेतले. नागरिकांची कामे जलदगतीने व ठराविक कालावधीत व्हावी यासाठी सेवा हक्क कायदा लागू केला. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी शासनाने महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी 396 कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला. 12 हजार 716 जलसंधारणाची कामे यातून होणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 503 गावांची निवड करण्यात आली असून टप्प्या टप्प्याने टंचाई परिस्थिती असलेली सर्वच गावे या अभियानाने जोडली जाणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील एकही गाव टंचाईसदृश राहणार नाही.
महसूल राज्यमंत्री म्हणून काम करताना जिल्ह्यासाठी काही नवीन केले पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. जिल्ह्यात तालुकास्तरावरील प्रशासकीय इमारती, तलाठी कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, दर्जा नसलेल्या गावांना महसूली दर्जा, शेतकऱ्यांच्या जमीनींचे तुकडी बंदी आदी विषय प्राधान्याने मी हातात घेतले आहे. लवकरच याचे चांगले परिणाम दृष्टीस पडणार आहे.
रोजगार हमी योजना व धडक सिंचन योजनेतून विहीरींची कामे करत असताना खचलेल्या आणि बुजलेल्या विहीरींनाही दुरूस्तीचा लाभ मिळाला पाहिजे, असा आग्रह मी धरला होता. शासनाने काही दिवसांपूर्वी त्यासंदर्भातला आदेश काढला. शेतकऱ्यांना केवळ विहीरी देऊन उपयोग नाही. विहिरीवर सिंचनासाठी पंप आणि त्याला कनेक्शन नसेल तर उपयोग होणार नाही. प्रत्येकाला वीज कनेक्शन देता यावे म्हणून शासनाने विशेष बाब म्हणून 57 कोटी रूपयाचा निधी जिल्ह्याला नुकताच मंजूर केला. जुन्या प्रलंबित 9 हजार शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याची कार्यवाही जिल्ह्यात वेगाने सुरू आहे. यानंतर मागेल त्याला कनेक्शन, अशी आमची भूमिका यापुढे राहणार आहे.
धामणगाव देव आपल्या जिल्ह्याचे तीर्थक्षेत्र आहे. पोहरादेवी बंजारा समाजाची काशी आहे. धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या या स्थळांचा विकास झाला पाहिजे, या भूमिकेतूनच पाठपुरावा केल्याने शासनाने दोन्ही स्थळांसाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 6 कोटींची तरतूद केली आहे. या स्थळांच्या विकासामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे.
गावगाड्यातील नागरीकांच्या अजूनही अनेक समस्या आहे. त्या समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच या महिन्यापासून समाधान शिबिराच्या माध्यमातून तालुकास्तरावर जनता दरबार घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. या दरबारात येणाऱ्या प्रत्येकाची दखल घेतली जाईल. त्यांच्या समस्या आपुलकीने समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्यापुढील फार मोठे आव्हान आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणा असला तरी निराश होऊ नका. शासन शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. तुमच्या काही समस्या असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना किंवा थेट मला भेटा. धीर खचू देऊ नका, कुटूंबाला उघड्यावर पाडू नका, अशी कळकळीची विनंती जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना याप्रसंगी त्यांनी केली.
उद्योगांसाठी अकृषक परवानगी सुधारणा विधेयक नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात मांडण्यात आले. या विधेयकामुळे पूर्वी ज्या कामसाठी मोठा कालावधी लागायचा ते काम केवळ 15 दिवस ते एक महिन्यात पूर्ण होणार आहे. यामुळे राज्यात उद्योगांना चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी याप्रसंगी सांगितले. ध्वजारोहणानंतर पोलिस दलाच्यावतीने पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्र्यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

May 01, 2015 in विदर्भ
शेतकरी विधवा करणार पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण 0

शेतकरी विधवा करणार पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण

1st may 1
यवतमाळ, दि.१  – आपली हाक व बोंब आता राज्यात कोणीही ऐकत नाही सरकार विदर्भाच्या कोरडवाहु शेतकºयांच्या संपुर्ण पीककर्ज माफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव देण्यास तयार नाही व सरकारने सर्व शेतकºयांचा विश्वासघात केला असून संपुर्ण जगात फिरणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले दुख दूर करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे आता राजधानी दिल्लीला जाऊन शेकडो शेतकरी विधवा पंतप्रधान निवसाबाहेर उपोषण सत्ताग्रह करण्याच्या एकमुखी ठराव आज पांढरकवडा येथे आयोजित सात बारा कोरा करा या आंदोलनात घेण्यात आला . हा ठराव विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या सचिव अपर्णा मालीकर यांनी मांडला. आंदोलनात सहभागी शेतकरी विधवा व दुष्काळग्रस्त  शेतकºयांनी  पाठींबा दिला.
कर्ज मुक्तीसाठी सरकारला बाध्य करण्यासाठी शेतकºयांचे  सर्व पक्ष ,पंथ व विचार सोडून करा वा मारा असे टोकाचे सात बारा कोरा करा आंदोलन सुरु करण्याची घोषणा कापुस उत्पादक शेतकºयांचा प्रश्नांवर मागील दोन दशकापासून सतत लढा देणारे शेतकरी नेते व विदर्भ जनांदोलन समितीचे संयोजक किशोर तिवारी हे आवाहन यावेळी बोलताना केले . या आंदोलनात विदर्भ शेतकरी विधवा संघटनेच्या नेत्या बेबी बैस ,भारती पवार ,चंद्रकला मेश्राम ,अचर्ना राउत ,अंजु भुसारी ,इंदु आष्टेकर ,सुनिता पेंदोरे ,जनाबाई घोडाम सह शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते मोहन जाधव ,प्रेम चव्हाण ,सुनील राउत ,किरण कोल्वते ,प्रीतम ठाकूर ,अंकित नैताम, गोपाल शर्मा , मनोज मेश्राम  ,मुरली वाघाडे ,रामभाऊ मुत्तलवार , शेखर जोशी ,संतोष नैताम ,प्रकाश बोलेनवार ,भीमराव नैताम ,यशवंत गोलमवार , श्रीराम आत्राम ,भास्कर टेकाम ,अतुल कुडवे ,सीताराम आडे,भारत धुर्वे ,रामकुल कुमरे ,माधव तोडसाम सह शेकडो शेतकरी विधवांची उपस्थिती होती.

May 01, 2015 in विदर्भ
करणीच्या संशयातून वहिणीचा खून 0

करणीच्या संशयातून वहिणीचा खून

06_11_2014-crime9
यवतमाळ, दि. १  – करणीच्या संशयातून दिरानेच कुºहाडीचे वार करून वहिनीची खून केल्याची घटना आज दि. १ मे रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तरोडा येथे घडली.
सुनंदा विजय धबाले (५०) रा. तरोडा असे मृतक महिलेचे नाव आहे. तर जयानंद अर्जुन धबाले (४२) रा.तरोडा असे आरोपीचे नाव आहे. अंगणवाडी सेविका मृतक सुनंदा धबाले हिच्यावर तिचा दिर आरोपी जयानंद व त्याची पत्नी आशा हे दोघे जादूटोण्याचा संशय घेत होते. त्यावरून आशा धबाले व सुनंदा धबाले या दोघींमध्ये सतत वाद होत होते. आज सकाळीही त्याच्यात वाद उफाळला. यावेळी आरोपी दिर जयानंद याने रागाच्या भरात घरात घुसून वहिनी सुनंदावर कुºहाडीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली होती. त्याच्यावर उमरखेड येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.

May 01, 2015 in विदर्भ
 अपंग महिलेस पेटविले 0

अपंग महिलेस पेटविले

images
मारेगाव,दि. १ – तालुक्यातील भालेवाडी येथे राहणाºया ३० वर्षीय अपंग महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याची घटना ३० एप्रीलला घडली. अंजना मेश्राम असे मृतक महिलेचे नाव आहे. अनिल भगत या इसमासोबत ती घरठाव करून भालेवाडी येथे राहत होती. अनिल नेहमी मद्यप्राशन करून अंजनासोबत वाद करायचा. घटनेच्या दिवशी गावात लग्न असल्याने सर्व गावातील नागरिक वधुमंडपी गेले होते. ही संधी साधून अनिलने अंजनासोबत वाद सुरू केला. वाद विकोपाला गेल्याने अनिलने अंजनाच्या शरीरावर रॉकेल टाकून पेटवून दिले. तिने आरडाओरड केला मात्र आजुबाजुला कुनीच नसल्याने मदतीला आले आहे. त्यामुळे अंजनाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

May 01, 2015 in विदर्भ
विना-अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात 0

विना-अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात

LPG gas cylinder supplier

नवी दिल्ली – विना-अनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
दिल्लीत १४.२ किग्रॅ सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांची कपात करण्यात आली असून आता विना-अनुदानित सिलेंडरसाठी ६१६ रुपये द्यावे लागणार आहे.
सध्या दिल्लीमध्ये १२ सिलेंडरहे ४१७ या अनुदानित किंमतीमध्ये मिळत आहे. मात्र त्याहून अधिकच्या सिलेंडरसाठी आता ६१६ रुपये द्यावे लागतील.
तर मुंबईत विना-अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत ४.५० पैशांची कपात करत ही किंमत ६२७.५० रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये विना-अनुदानित सिलेंडरची किंमत ६५४.५० रुपयांवरुन ६४९ रुपये आणि चेन्नईमध्ये ६०८.५० रुपये इतकी करण्यात आली आहे.
यापूर्वी विनाअनुदानित सिलिंडरच्या किंमतीत एक मार्च रोजी पाच रुपयांनी, तर एक एप्रिल रोजी ११ रुपयांनी वाढ झाली होती.

May 01, 2015 in मुख्य पान
महाराष्ट्र दिनी विदर्भात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे 0

महाराष्ट्र दिनी विदर्भात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे

agitation-vidarbha
नागपूर- संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना नागपुरात मात्र स्वतंत्र विदर्भाचे झेंडे फडकवण्यात आले. व्ही कॅन संस्थेने (विदर्भ कनेक्शन) वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी झेंडा फडकवला. व्ही कॅनच्या या वेगळ्या विदर्भासाठीच्या आंदोलनाला शंभर लोकही उपस्थित नव्हते. त्यामुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला.
नागपुरमधील विष्णूजी की रसोई येथे विदर्भाचा ध्वज फडकवण्यात आला. यानंतर व्ही कॅन उपस्थित सदस्यांनी वेगळ्या विदर्भासाठी प्रतिज्ञा केली.
वेगळ्या विदर्भाच्या नावावर भाजपाने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.

May 01, 2015 in विदर्भ
धार्मिक स्वातंत्र्य अहवाल, सरकारने फेटाळला 0

धार्मिक स्वातंत्र्य अहवाल, सरकारने फेटाळला

Modi in Paris
नवी दिल्ली – धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीचा अमेरिकन आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. अमेरिकन आयोगाचा अहवाल फारसे महत्व देण्यासारखा नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत, भारताचे संविधान आणि समाज यांना व्यवस्थित समजून न घेता तर्क मांडण्यात आले आहेत असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकन काँग्रेसच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीच्या अहवालातून केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य करण्यात आले आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारतात जातीय व धार्मिक हिंसाचारात वाढ झाली असून, सत्ताधारी भाजपा नेत्यांकडून अल्पसंख्याकांची मानहानी सुरू आहे. त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून हिंसक हल्ले आणि सक्तीच्या धर्मातरालाही अल्पसंख्याकांना सामोरे जावे लागत आहे,
असे ताशेरे अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासंबंधीच्या आयोगाने (यूएससीआयआरएफ) भारतातील धार्मिक स्वातंत्र्याविषयी सादर केलेल्या अहवालात ओढले आहेत. पण नरेंद्र मोदी सरकारला हे आरोप मान्य नसल्याने त्यांनी हा अहवालच फेटाळून लावला आहे.

May 01, 2015 in मुख्य पान
औषधाचा पुत्रप्राप्तीशी संबंध नाही – रामदेव 0

औषधाचा पुत्रप्राप्तीशी संबंध नाही – रामदेव

Baba-Ramdev-maharaj-pictures
नवी दिल्ली – योगगुरु बाबा रामदेव यांनी पुत्रप्राप्तीसाठी औषधे बनवित असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. संयुक्त जनता दलचे खासदार के.सी.त्यागी यांनी गुरुवारी संसदेमध्ये बाबा रामदेव यांची औषध कंपनी पुत्रप्राप्तीचा दावा करणा-या औषधांची विक्री करत असल्याचा आरोप केला होता.
बाबा रामदेव यांच्या औषधांवर बंदी घालण्याची मागणी त्यागी यांच्यासह जया बच्चन आणि जावेद अख्तर यांनी केली होती. यावर रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषद घेऊन हे आरोप फेटाळून लावले.
पुत्रजीवक बीज असे औषधाचे नाव असले तरी, या औषधावर पुत्रप्राप्ती होईल असे कुठेही म्हटलेले नाही. मूळ वनऔषधीचे नाव पुत्रानजीवा असल्याने त्या औषधाला पुत्रजीवक बीज हे नाव देण्यात आले. त्याचा पुत्रप्राप्तीशी काहीही संबंध नाही असे रामदेव यांनी सांगितले.
ज्या खासदारांना आयुर्वेदाबद्दल काहीही माहिती नाही त्यांनी असे आरोप करण्याआधी विचार करायला हवा होता. त्यागी यांनी चूकीचे आरोप केले आहेत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी रामदेव यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी आपल्याला लक्ष्य केले जात आहे असा आरोप त्यांनी केला. राज्यसभेत के.सी.त्यागी यांनी औषधाची पाकिटे दाखवून या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती. जावेद अख्तर आणि जया बच्चन यांनी त्यांना पाठिंबा दिला होता.

May 01, 2015 in देश-विदेश