पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 29th, 2015

 'मान्सून' अरबी समुद्रात दाखल 0

‘मान्सून’ अरबी समुद्रात दाखल

mumbai
पुणे : गेल्या आठवड्यापासून श्रीलंकेच्या उंबरठय़ावर रेंगाळलेल्या मान्सूनच्या वाटचालीत प्रगती झाली असून, गुरुवारी मान्सूनने अरबी समुद्राच्या दक्षिण भागात प्रवेश केला.
नैऋत्य मौसमी वार्‍याची प्रगती गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेमध्येच रेंगाळली होती. निर्धारित वेळेच्या आधी दाखल होऊनही म्हणावी तशी प्रगती दिसत नसल्याने प्रत्यक्ष पाऊस हुलकावणी देत राहिला. लागोपाठ आठ दिवस श्रीलंकेत ठाण मांडून बसल्यानंतर गुरुवारी त्याच्या वाटचालीत प्रगती दिसून आली. श्रीलंकेचा अर्धा भाग, दक्षिण अरबी समुद्र, कॉमोरीन प्रदेश व बंगालच्या उपसागराचा बराचसा भाग व्यापला आहे. यंदा मान्सून निर्धारित वेळेपूर्वीच केरळमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मान्सूनच्या वाटचालीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण न झाल्यास पुढील दोन ते तीन दिवसांत तो केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे.

May 29, 2015 in मुख्य पान
 उपराजधानीत १0२ तीक्ष्ण शस्त्रे जप्त 0

उपराजधानीत १0२ तीक्ष्ण शस्त्रे जप्त

29052015-md-ng-9-6537-1-large
नागपूर – मोमीनपुरा येथील एका जनरल स्टोर्सवर पोलिसांनी धाड टाकून बुधवारी मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या उपराधानी नागपूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.साहाय्यक पोलीस आयुक्त भगत यांनी माहिती दिली. मोहंमद नईम व जैजुल आबेदीन अंसारी (४९) रा. मोमीनपुरा असे अटक करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारावर तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर, साहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडसे, साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व तपास पथक कर्मचारी संजय आठवले, गंगाधर मुटकुरे, चंद्रशेखर वैद्य, अब्दुल करीम, देविदास, सुनील दिवटे, रवी, सचिन भिमटे, चालक विश्‍वास वाघ यांनी बुधवारी, २७ मे रोजी सायंकाळी मोमीनपुरा येथील आबिद जनरल स्टोर्सवर धाड टाकली. आरोपी अंसारी याचे आदिब जनरल स्टोर्स नामक दुकान आहे. त्याने ड्रॉव्हरमध्ये विक्रीकरिता विविध तीक्ष्ण शस्त्रे ठेवली होती. धाडीदरम्यान तहसील पोलिसांनी पाहणी केली असता त्यांना मोठा शस्त्रसाठा आढळला. ही सर्व शस्त्रे मुंबई येथून आणली असून आरोपी मार्च महिन्यापासून शस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत आहे. दरम्यान तलवार, ३१ खंजर, ८ कुकरी, ४३ चाकू, १४ सुरी, ५ गुप्ती असे एकूण १0२ अवैध शस्त्रे दुकानातून जप्त करण्यात आले. पोलिसांनी शस्त्रांसह ४ लाख ७0 हजार ९८0 रुपयेसुद्घा जप्त केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अंसारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. मुंबईवरून आरोपी कोणत्या मार्गाने शस्त्रे आणायचा आणि कुणाला विकायचा तसेच जप्त शस्त्रे व रोख रक्कम त्याने कुठून आणली, यासंदर्भात तपास सुरू असल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त भगत व पो. नि. मुजावर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सपोनि. बोंडसे, पाटील तसेच आठवले, मुटकुरे, वैद्य, अब्दुल करीम, देविदास, दिवटे, रवी, भिमटे, विश्‍वास वाघ आदी उपस्थित होते.

May 29, 2015 in मुख्य पान