पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 28th, 2015

मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सावत्र बापाचा मृत्यू 0

मुलीवरील बलात्कारप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सावत्र बापाचा मृत्यू

AAROPI
कल्याण – मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाचा पोलीस कोठडीत मूत्यू झाला आहे. प्रदीप भानुदास ताटे ( वय- ३२) असे मूत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे.बलात्कारप्रकरणी ताटेला कोळसावाडी पोलिसांनी २४ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर कल्याण न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ठार मारण्याची धमकी देऊन सहाव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कल्याण पूर्वेत श्रीमलंग रोडला नांदिवली गाव परिसरात प्रदीप ताटे हा पत्नी मुलांसह राहत होता. प्रदीपच्या पत्नीला पहिल्या पतिपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. प्रदीपची पत्नी अंधेरी येथील एका सुरक्षा संस्थेत गार्ड म्हणून नोकरी करते. त्यामुळे ती दोन-तीन दिवस नोकरी निमित्त बाहेर असते. काही दिवसांपूर्वी पत्नी कामावर गेल्याची संधी साधून प्रदीपने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन याची कुठे वाच्यत केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही बाब पीडित मुलीने बापाच्या भीतीपोटी दडवून ठेवली होती. मात्र, अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला शारिरीक त्रास होऊ लागला. त्यानंतर धाडस करुन या मुलीने घडलेला धक्कादायक प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या नवऱ्या विरोधात तक्रार नोंदविली होती.

 

May 28, 2015 in मुख्य पान
विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले 0

विधवेला लग्नाची परवानगी नाकारत जात पंचायतीने जिवंत जाळले

fire3
पाटणा, दि. २८ – एका ३५ वर्षीय विधवा महिलेचे तिच्या विधूर सास-यांशी संबंध असल्याची बातमी कळताच त्या महिलेला जात पंचायतीने जिवंत जाळले.
सुपौल जिल्ह्यातील पिपरा गावातील रहिवासी असणारी महिला व तिचे चुलत सासरे यांच्यातील संबंधांची माहिती विधवा महिलेच्या सासूला मिळताच तीने या प्रकरणाची माहिती पंचायतीला दिली. या प्रकरणी या विधवा महिला व तीचे चुलत विधूर सासरे घनशी यांना लग्न करायचे होते परंतु, जात पंचायतीला हा निर्णय मान्य नसल्याने एका कागदावर या महिलेशी झालेल्या घटनेबाबत गावातील कोणतीही व्यक्ती जबाबदार नाही या आशयाच्या मजकूरावर सही घेऊन तिला अंदाजे शंभर जणांसमोर जिवंत जाळले.
या प्रकरणी सुपौलच्या पोलीस अधीक्षकांना विचारले असता त्यांनी या घटनेची अद्याप माहिती नसल्याचे सांगितले आहे. तर, येथील ठाणे अंमलदार चंदन कुमार यांनी हत्येची तक्रार दाखल कुणीही केली नसल्याने आत्महत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे असे सांगितले. या विधवा महिलेला तीन मुलं असून घनशी या विधूर चुलत सास-यासही तीन मुले असून त्यांची पत्नी तीन वर्षापूर्वी वारली होती.

May 28, 2015 in मुख्य पान
दलित तरुणाचा संशयास्पद मृत्यू 0

दलित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

crime
अहमदनगर – नगरच्या कोतवाली पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या दलित तरुणाचा आज सायंकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी मारहाण केल्याची नातवाईकांची तक्रार आहे. तर पळून जाताना तो जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पारनेर तालुक्यातील नितीन बाळू साठे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पोलिसांनी त्याला चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशी सुरू असताना शौचाला जातो असे सांगून तो विवस्त्र अवस्थेत पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता, असा पोलिसांचा दावा आहे. काही वेळातच पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच पुन्हा पकडले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आणि दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. पोलिसांच्या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला असून पोलिस तो पळून जाताना जखमी झाल्याचा बनाव रचत आहेत, असा आरोप त्याचे नातेवाईक आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

May 28, 2015 in मुख्य पान
दोन मॉडेल्सचा पोलीस ठाण्यात गोंधळ 0

दोन मॉडेल्सचा पोलीस ठाण्यात गोंधळ

03
मुंबई- छेडछाड प्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत दोन मॉडेल्सनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घातला. त्यांच्या या गैरवर्तणुकीमुळे पोलिसांनी मुंबईतील मॉडेल श्रुती गुप्ता आणि पूजा मिश्रा या दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारच्या मध्यरात्री ऑडी कारमधील काही तरुणांनी या मॉडलेची छेड काढली होती. याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलीस काहीच कारवाई करत नसल्याचा आरोप करत या मॉडेलनी आत्ताच्या आत्ता त्या चार मुलांना अटक करुन तुरुंगात टाका, अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गुरुवारी गोंधळ केला. त्यामुळे या मॉडेलविरोधात गैरवर्तणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी रात्री उशिरा पूजा आणि श्रृती घरी येत असतांना अंधेरी पश्चिम येथील लिंक रोड येथे एटीएमजवळ थांबल्या असता तेथे एका ऑडी कारमधून आलेल्या तरुणांनी अश्लील वक्तव्ये केली. दरम्यान पेट्रोलिंग करणारे पोलिस तेथे पोहचले. तेव्हा ते तरुण पळून गेले. परंतू या दोन मॉडेल्सनी पोलिसांवरच आरोप करत त्यांना जाणीवपूर्वक पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला. त्यामुळे त्या तरुणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले परंतू त्या दोघींनी त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि हे ते तरुण नाहीत, असे सांगून ख-या गुन्हेगारांना आत्ताच्या आत्ता अटक करा, अशी मागणी केली. तसेच पोलिसांविरोधात शिवीगाळ केली. यावेळी तेथे असलेल्या महिला पोलिसांनाही त्यांनी धक्काबुक्की केल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेचे चित्रिकरण सीसीटीव्ही कॅमे-यात असल्याने या दोघींना लवकरच अटक होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनजी नलावडे यांनी सांगितले.

गुंड आप्पा लोंढेची निर्घृण हत्या 0

गुंड आप्पा लोंढेची निर्घृण हत्या

01
पुणे – जिल्ह्यातील कुख्यात गुंड आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे (५५) याचा उरुळी कांचनजवळील सिंधवने रोडवर गोळ्या झाडून खून करण्यात आला. सकाळी मॉर्निक वॉकला जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर जखमी झाल्यानंतर त्याच्यावर सत्तुराने वार करुन हत्या करण्यात आली. गुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पा उर्फ प्रकाश लोंढे आज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर चालत जात असताना दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये आप्पा गंभीर जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना त्वरीत हडपसर येथील नोबल रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ससून येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, ससूणच्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे घटनास्थळावर बंदोबस्त ठेवण्यात आला. आप्पा उर्फ प्रकाश हरीभाऊ लोंढे यांची बारामती, हवेली, दौंडसह पुणे जिल्ह्यात दहशत होती. त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे पुणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल होते, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजीतसिंह परदेशी यांनी दिली. लोणी काळभोरचे पोलीस निरीक्षक अभीमान्यू पवार, सहायक पोलीस निरीक्षक रंजीतसिंह परदेशी, पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळावर गावठी पिस्तुलाची एक पुंगळी सापडली आहे.

May 28, 2015 in मुख्य पान
 हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक 0

हिट अँड रन खटल्याच्या फाईल्स जळूून खाक

Salman Khan at Sessions Court
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन खटल्याशी संबंधित सर्व फाईल्स, कागदपत्रे मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्याची नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
२१ जून २०१२ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीमध्ये सलमानच्या खटल्याशी संबंधित फाईल्स आणि कागदपत्रे आगीमध्ये जळाली. त्यामुळे सध्या राज्याच्या गृहखात्याकडे सलमानच्या खटल्याशी संबंधित कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत.
मन्सूर दर्वेश यांनी दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. २००२ पासून सलमानच्या खटल्यावर आतापर्यंत किती खर्च झाला. राज्य सरकारने किती वकिल नियुक्त केले याची माहिती मन्सूर दर्वेश यांनी मागितली होती.
दर्वेश यांनी दोन सरकारी विभागांकडे अर्ज केले होते. त्यावर सरकारने २०१२ च्या मंत्रालयाच्या आगीत कागदपत्रे जळाल्याने आम्ही तुम्हाला उपलब्ध करुन देऊ शकत नाही असे उत्तर दिले. या खटल्यात सप्टेंबर २०१४ पासून विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक सुनावणीसाठी त्यांना सहाहजार रुपये शुल्क दिले जाते याची सरकारला माहिती आहे.
मंत्रालय आग प्रकरणानंतर राज्य सरकारने जळालेल्या सर्व फाईल्स, कागदपत्रे पुन्हा तयार करु असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत त्यांना ते शक्य झालेले नाही. सलमान खानचे प्रकरण त्याचे एक उदहारण आहे असे दर्वेश म्हणाले.
२८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमानने बांद्रयामध्ये आपल्या आलिशान लॅण्ड क्रूझर गाडीखाली पदपथावर झोपलेल्या पाच जणांना चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला चार जण जखमी झाले होते.
सहा मे रोजी सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल देताना सलमानला पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सलमानने लगेचच या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याला जामिन मंजूर केला. विशेष म्हणजे सलमानला पाचवर्षांची शिक्षा होऊनही एकदिवसही तुरुंगात काढावा लागला नाही.

May 28, 2015 in मुख्य पान
डाॅ.तानाजी चव्हाण यांना,राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार 0

डाॅ.तानाजी चव्हाण यांना,राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार

IMG_20150527_082525
कल्याण,ठाणे – वेगवेगळ्या क्षेत्रात प्रामाणिक पणाने समाजिक कार्य करत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून किंवा विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून,त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी गौरविण्यात येत असतो.व राष्ट्रीय मानवसेवा चिकत्सा रत्न पुरस्कारने गौरविण्यात आलेल्या डाॅ.तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन आमचे प्रतिनिधी सतिष राठोड यांनी संग्रहीत केलेली माहिती.
राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार हे आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या डाॅक्टरांना देण्यात येतो.असा हा पुरस्कार सोहळा दि.२१ मे या दिवशी औरंगाबाद येथे पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा.ना गिरीषजी महाजन ( जलसंपदा मंत्री ), मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष), मराठी चित्रपट नायिका मानसी नाईक उपस्थित होते.आणि डाॅ.तानाजी चव्हाण यांना मा. हरिभाऊ बागडे (महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष) यांच्या हस्ते राष्ट्रीय मानवसेवा चिकित्सा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
* डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण *
डाॅ.चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण एका छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन प्राथमिक शिक्षणातही स्काॅलरशिप व नवोदय परिक्षा यशस्वी झालेले आहेत.
* डाॅ.चव्हाण यांचे वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय सेवेतील वाटचाल *
पुणे विद्यापीठ, औरंगाबाद, मुंबई, स्री व पुरुष नसबंदी शस्रक्रिया तज्न्य. तसेच पुणे विद्यापीठातून MBBS चांगल्यागुणाने उत्तीर्ण झाल्यानंतर,शिर्डी साईबाबा संस्थान येथून कामाची सुरुवात.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात नासिक येथिल बोलठाण व न्यायडोंगरी गांव येथे वैद्यकिय अधिकारी तसेच नांदगांव येथे तालुका आरोग्य अधिकारी (THO) पदावर २००९ पर्यंत कार्यरत.व २००९ पासुन जळगांव जिल्ह्यातील चाळीसगांव तालुका येथे THO जून २०१४ पर्यंत कार्यरत. जून २०१४ नंतर आजपर्यंत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर-अंबरनाथ येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत.
* डाॅ.चव्हाण यांना वैद्यकीय सेवेतील मिळालेले पुरस्कार *
सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्र गौरव पुरस्कार, व यापूर्वी शासन सेवेतील आदर्श आरोग्य अधिकारी ,आदर्श सर्जन पुरस्कार व आदर्श कारभार पुरस्कार ( Administrator Award ) असे अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले असुन शासन आरोग्य सेवेत उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणूनही गौरविण्यात आललेे आहेत.
मार्च २०१५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री मा.ना सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नागपूर प्रशिक्षण संस्था येथे Best Monitor Award ने सन्मानित झालेले आहेत.
प्राथमिक शिक्षण छोट्याश्या खेडेगावातून झाले असुन, परिस्थितीवर मात करुन आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे.त्यांच्या पत्नी सुध्दा डाॅक्टर असुन,सध्या विक्रीकर विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
* डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” संस्था व कार्य *
डाॅ.चव्हाण यांचे “जगरत्न प्रतिष्ठान” ही संस्था सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.
“जगरत्न प्रतिष्ठान” यांचे जनसेवा आरोग्य संस्थेमार्फत गोर-गरीब ,गरजू, अनाथ व वृधांसाठी मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य करीत आहे.तसेच डाॅ.तानाजी चव्हाण व सौ. डाॅ.सविता चव्हाण यांचे तरुणांसाठी वयात येतांना घ्यावयाची काळजी, आणि ” दशा व दिशा ” या विषयावर मोफत मार्गदर्शन शिबीर राबवितात.
* भविष्यात या सुविधा मोफत देण्याचा मानस *
भविष्यात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त दवाखाना, हाॅस्टेल, वृधाश्रम व तरुणांना मोफत मार्गदर्शन व सर्व आरोग्याशी निगडित समस्यांवर मार्गदर्शन व सल्ला केंद्र उभारण्याचा मानस आहे.
डाॅ.तानाजी चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या ” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ” व वाचक परिवारातर्फे हार्दीक शुभेच्छा………