पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 4th, 2015

   यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस 0

यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह वादळी पाऊस

download

यवतमाळ – जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह आज पाच वाजतादरम्यान जिल्ह्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. काही काही ठिकाणी गारपीट झाल्याने दाणादाण उडाली. पुसद, उमरखेड, महागाव, पांढरकवडा, दिग्रस तालुक्यात सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे.
पांढरकवडा तालुक्याला एक तासपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाºयासह गारपीट झाल्याने आंबा, निंबू, ज्वारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. महागाव तालुक्यात ५.३० वाजतादरम्यान अवकाळी पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट, वादळी वारा सुरू असताना गारपीटीला सुरूवात झाली. अवकाळीच्या तडाख्यात आमणी, अंबोडा, गीरगाव, बिजोरा आदी गावातील जनतेची तारांबळ उडाली. रस्त्यावरील वृक्ष उन्मळून पडली. तसेच वीज तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. दिग्रस तालुक्यात डेहणी, माळहिवरा, कलगाव येथे नुकसान झाल्याची माहिती आहे.

May 04, 2015 in मुख्य पान
अधिक्षक अभियंत्यासह दोन निलंबित 0

अधिक्षक अभियंत्यासह दोन निलंबित

images (1)
यवतमाळ दि. ४ – वीज वितरणच्या हेकेखोरपणामुळे बळी गेलेल्या शेतकºयाला मृत्यू नंतर न्याय देण्याचा उफराटा कारभार वितरणच्या वरीष्ठांनी केला. सोमवारी संतप्त गावकरी शेतकºयाचा मृतदेह घेऊन अधीक्षक अभियंत्याच्या निवासस्थानी जाण्याच्या पवित्र्यात होते. दरम्यान पालकमंत्री ना. संजय राठोड यांचेसह वरीष्ठ अधिकाºयांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने गावकरी शांत झाले. या आधिच उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे यांनीही मनिहार यांच्या तक्रारीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान आज सांयकाळी वीज वितरणच्या अकोला येथील वरीष्ठांनी यवतमाळ मंडळाचे अधिक्षक अभियंता अशोक फुलकरयांचेसह बाभूळगावचे उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे, शहर वितरण केंद्राचे सहाय्यक अभियंता संजय कांबळे यांचे तडकाफडकी निलंबन केले.

May 04, 2015 in मुख्य पान
वीज वितरणच्या त्रासाने शेतकºयाचा मृत्यू 0

वीज वितरणच्या त्रासाने शेतकºयाचा मृत्यू

images
यवतमाळ, दि. ४ – वीजेचे देयक भरणाºया शेतकºयावर चक्क अतिरीक्त वीज वापरल्याचे कारण समोर करून चोरीच्या कलमा लावत शेतकºयाचा मानसिक छळ केला आहे. या छळाला कंटाळून एका शेतकºयाचा मृत्यू झाला आहे. असा आरोप मृतक शेतकºयाच्या मुलाने ४ मे रोजी आयोजित पत्रकार परीषदेत केली.
अमरलाल मनिहार (८२) रा. चिमणाबागापूर ता. बाभुळगाव असे मृतकाचे नाव आहे. ते चिमणाबागापूर येथे गेल्या ४० वर्षापासून ओलिताची शेती करीत होते. दरम्यान सप्टेंबरमध्ये शेतातील डीपी बंद पडल्याने पिकांना पाणी द्यायचे कसे या विवंचनेत ते सापडले. वीज पुरवठा पुर्ववत सुरू व्हावा म्हणून त्यांचा मुलगा अश्विनकुमारने गावात ठेवलेल्या तक्रार पुस्तिकेत तशी तक्रारही नोंदविली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याने २० सप्टेंबरला बाभूळगाव येथील उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे व सहाय्यक अभियंता संजय कांबळे यांच्या विरोधात यवतमाळातील अधिक्षक अभियंत्यानाही निवेदन दिले. त्यांनीही दखल न घेतली नाही असा आरोपही केला आहे. पर्यायाने आपण ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने नोटीस देताच वितरणने ट्रान्सफॉर्मर बदलवून दिले. निवाड्यात वितरण कंपनीला सदोष सेवे पोटी दंड थोटावण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याच कारवाईने भडक लेल्या वितरणच्या अधिकाºयांनी थांगपत्ता लागू न देता आमच्या शेतात सदोष मीटर लावले. एवढ्यावरच न थांबता खोटे पंच उभे करून मंजूर विद्यूत मागणीपेक्षा माझ्या शेतातील पंपासाठी जास्त विद्यूत भार घेतल्या जात असल्याचा बनावट अहवालही तयार केला. याच अहवालाच्या आधारे तब्बल एक लाख एक हजार ७२० रुपयांचे वीज देयक देण्यात आले. त्याच बरोबर त्याच पत्रामध्ये वीज चोरी असा उल्लेख करून मानहानी करण्याचा प्रतापही वितरणच्या अधिकाºयांनी केल्याचे अश्विनकुमार यांनी सांगितले. त्यामुळे आमची सत्यता पटविण्यासाठी २० जानेवारीला वितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांकडे जाऊन लावलेला दंड रद्द करावा, असे निवेदन दिले. संबधित अधिकाºयाने तो अर्जही मान्य केला. मात्र ६ एप्रिल २०१५ रोजी फायनल असेसमेंट म्हणून वीज देयक कमी करून पुन्हा ६१ हजार ३८७ रुपये दंडाची मागणी करण्यात आली. त्यामुळे एकट्यावरच सुडबुद्घीने कारवाई झाल्याने व्यथीत झालेल्या माझ्या वडीलांना मोठा मानसिक धक्का बसला. वितरणने वेळीच तक्र ारीची दखल घेत कारवाई केली असती तर माझ्या वडीलाचा जीव वाचला असता, असा आर्तस्वरही शेतकरी पुत्राने यावेळी काढला. यावेळी पत्रपरिषदेला राजु निवल, प्रशांत दर्यापूरकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाºयांची हिवरा(दरणे) रेती घाटावर धाड, १२ ट्रकसह दोन जेसीबी जप्त 0

जिल्हाधिकाºयांची हिवरा(दरणे) रेती घाटावर धाड, १२ ट्रकसह दोन जेसीबी जप्त

IMG-20150504-WA0083

यवतमाळ, दि. ४ – जिल्ह्यात रेती घाटावर जेसीबीने अवैधपने रेतीचे उत्खन्न सुरू आहे. जिल्हाधिकाºयांनी आज सोमवारी ४ एप्रिल रोजी कळंब तालुक्यातील हिवरा(दरणे) नजीकच्या रेती घाटावर धाड मारली. यावेळी जेसीबीसह १२ ट्रक जप्त केले.
जिल्ह्यातील नदीसह रेती घाटावरून अवैधपने रेती तस्करी सुरू आहे. अनेक माफीयांनी लिलावातील घाटाला हात न लावता इतरत्र घाटातून रेतीचे ओव्हरलोड उत्खनन चालविले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटावर कारवाई केली होती. तसेच आज सोमवारी महिवाल यांना कळंब तालुक्यातील हिवरा (दरणे) या गावा जवळील नदीपात्रातून अवैधपणे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी पोलिसांचा ताफा घेत घटनास्थळ गाठले असता, तब्बल १२ ट्रक व दोन जेसीबी जप्त केले. सदर रेती माफीयांवर फौजदारी कारवाई केली जाणार असून, मोठा दंडही वसूल केला जाणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा खनिकर्म विभाग कार्यान्वित करण्यात आले आहे. मात्र मोबाईल एसएमएस प्रणीलीचा वापरच केला जात नसून, अवैध उत्खननानेही कळस गाठला आहे. बोटावर मोजण्याइतक्याच कारवाया जिल्हा खनिकर्म अधिकाºयांनी केल्या आहे. फौजदारीऐवजी दंड वसूल करून माफीयांना सोडण्यात येत आहे. रेती चोरीच्या असंख्य तक्रारीमुळे जिल्हाधिकाºयांनी तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी धाडसत्र सुरू केले असून, आठवड्यात दोन मोठ्या कारवाया झाल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे.

May 04, 2015 in मुख्य पान
 प्रत्येकाने बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करावा - मोदी 0

प्रत्येकाने बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करावा – मोदी

2

नवी दिल्ली – सत्ता आणि वैभव सोडणे खूपच कठीण आहे. गौतम बुद्धांनी सत्ता सोडून करुणेचा मार्ग निवडला. समाज जिवनासाठी बुद्धांनी जो मार्ग दाखविला आहे, त्याच मार्गाचा प्रत्येकांनी अवलंब करावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीच्या तालकटोरा मैदानावर बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक देशांच्या राजदुतांनी व केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. पुढे बोलताना म्हणाले की, २१ व्या शतकात हे अशियाचे असले तरी ते बुद्धशिवाय नाही. दुसऱ्याच्या कल्याणाशिवाय परलोकी तर सोडाच पण संपूर्ण जागात तुम्हाला सुख मिळणार नाही, असे ते म्हणाले.

May 04, 2015 in मुख्य पान
 बिबट्याचा हल्ला, बालक ठार 0

बिबट्याचा हल्ला, बालक ठार

1
पुणे – जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आणखी एका बालकाचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी नगर-कल्याण महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.
वन विभागाच्या नाकर्तेपणामुळे या भागात गेल्या महिना-दोन महिन्याच्या कालावधीत बिबट्याने हल्ला केल्याच्या सहा घटना घडल्या आहेत. याकडे वन विभागाचे अधिकारी सोईस्कररित्या कानाडोळा करत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरीता सोमवारी सकाळी जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, खामुंडी गावच्या ग्रामस्थांनी नगर-कल्याण रास्ता रोखून धरला. यामुळे सोमवारी नगर-मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन माघारी घेण्याकरीता ओतूर पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अगोदर बोलवा, मगं काय ते बघू अशी भूमिका घेतल्याने पोलिसांची चांगलीच गोची झाली. अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेचे आमंत्रण दिल्यानंतरच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसामधील ही तिसरी घटना आहे. त्यात २ बालकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे जुन्नर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साई संतोष मंडलिक असे मृत्युमुखी पडलेल्या अडीच वर्षीय बालकाचे नाव आहे. रविवारी सायंकाळी मंडलिक कुटुंब अंगणात बसले होते. अचानक आलेल्या बिबट्याने सर्वांसमोर साईला ओढून नेले. सगळ्यांनी आरडाओरड केली. मात्र बिबट्याने बालकाला सोडले नाही, असे नातेवाईकांनी सांगितले. मागील महिन्यात जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय बालिका गंभीर जखमी झाली होती.

 

May 04, 2015 in मुख्य पान
 पुण्यात एकाच रात्री तीन खून 0

पुण्यात एकाच रात्री तीन खून

06_11_2014-crime9
पुणे – रविवारच्या रात्री पुणे शहरात खुनाच्या वेगवेगळ्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली असून पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबिल ओढा वसाहतीत रात्री साडदहा वाजण्याच्या सुमारास नितीन कसबे (वय ३५) याच्यावर कोयता आणि सत्तूरने वार करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत कसबेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रात्रीच चैता रंडवे, श्रावण कुरुगे, काळ्या रंडवे आणि अन्य चौघांना अटक करण्यात आली.दुसरी घटना दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतीलच राजाराम पुलाजवळ घडली. मोतीराम पवार या ५५ वर्षीय व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला व नंतर त्यांचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आला. ही हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी याप्रकरणी गणेश होले या इसमाला अटक केली.दरम्यान, कात्रजमध्येही अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याचीही दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असून पोलिस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

May 04, 2015 in मुख्य पान
नागालँडमध्ये दहशतवादी हल्ला, आठ जवान शहीद 0

नागालँडमध्ये दहशतवादी हल्ला, आठ जवान शहीद

TERRORIST
कोहिमा – नागालॅंडच्या मॉन जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी घात लावून केलेल्या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले असून, सह जवान जखमी झाले आहेत. निमलष्करी दलाचे चार जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे.
रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास आसाम रायफल्सचे १८ जवांन चांगलांगसू गावात पाणी आणण्यासाठी ट्रकमधून चालले असताना आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला.
जवानांच्या ट्रकवर त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला. आसाम रायफल्सच्या जवानांनीही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दहशतवादीही ठार झाले आहेत मात्र त्यांचा आकडा समजू शकलेला नाही. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे.
एनएससीएन (के) या दहशतवादी गटाने हा हल्ला केल्याचा संशय आहे. एनएससीएन(के) ने मागच्या महिन्यात केंद्राबरोबर पंधरावर्षापासून असलेला शस्त्रसंधी करार मोडून सुरक्षापथकांना लक्ष्य केले.
दोन एप्रिलला या संघटनेच्या दहशतवाद्यांनी अरुणाचलप्रदेशच्या तिराप जिल्ह्यात लष्कराच्या ताफ्यावर सापळा रचून हल्ला केला होता. यात तीन जवान शहीद झाले होते तर, तीन जवान जखमी झाले होते. मागच्या शनिवारी कामलेंगचिंग गावात झालेल्या चकमकीत लष्कराने एनएससीएन-के च्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते

May 04, 2015 in मुख्य पान
महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे होतील – शरद पवार 0

महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे होतील – शरद पवार

NCP press conference
मुंबई – सरकारमध्ये एकत्र सहभागी असूनही, परस्परांना जागा दाखवण्याची एकही संधी न सोडणारे शिवसेना-भाजपा मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी वेगळे होतील अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हे भाकीत त्यांनी वर्तवल. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरवण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विरोधाबद्दल बोलताना पवार म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका व्यक्तीगत असून, त्याच्याशी आपण सहमत नसल्याच त्यांनी स्पष्ट केल.जेम्स लेनच्या पुस्तकाबद्दल बाबासाहेब पुरंदरे गप्प ? असा सवाल टि्वटरवरुन विचारत आव्हाड यांनी बाबासाहेबांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यावर आक्षेप घेतला होता. शिवसेना-भाजपा युतीबद्दल शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताला महत्व आहे. कारण शिवसेनेचे सत्तेत असूनही वर्तन विरोधकांसारखे आहे.भाजपाही शिवसेनेला जागा दाखवून देण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबईमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ जवळपास समसमान आहे. मागच्या महापालिका निवडणुकीपर्यंत शिवसेना सर्वाधिक जागा लढवीत होती तर, भाजपाला कमी जागा मिळत होत्या.मात्र आता आमदार संख्या समसमान असल्याने भाजपा यावेळी दुय्यम भूमिका स्वीकारणार नाही असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. कारण महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाला स्थानिक स्तरावर विस्तारण्याची जास्त संधी आहे. त्यामुळे शरद पवार यांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण ठरते.

May 04, 2015 in मुख्य पान