पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 25th, 2015

   माओवाद्यांचा पत्नीसह काँग्रेस नेत्यावर गोळीबार 0

माओवाद्यांचा पत्नीसह काँग्रेस नेत्यावर गोळीबार

images

गडचिरोली – छत्तीसगडच्या जगदलपुर जिल्ह्यातील कोंटा येथील काँग्रेस नेते पोडीयम सुक्का आणि त्यांच्या पत्नीवर माओवाद्यांनी गोळीबार केला. तर जिल्ह्यातील परसपाल येथेही माओवाद्यांनी दोन नागरिकांची मध्यरात्री हत्या केली. ‘जीरमघाटी हल्ल्या’च्या पार्श्वभुमीवर हा हल्ला केला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काँग्रेस नेते पोडीयम सुक्का आणि त्यांच्या पत्नीला जखमी अवस्थेत तेलंगणाच्या भद्राचलम रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. सलवा जुडूममध्ये पोडीयम सुक्का यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड ‘जीरमघाटी’ घटनेला आज दोन वर्षे पुर्ण होत आहेत. या घटनेत ३० पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांना माओवाद्यांनी ठार केले होते. सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा विद्याचरण शुक्ल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल यांचा मृत्यू झाला होता. परसपाल येथील हल्ल्यात मृत नागरिकांची सलवा जुडूममध्ये भुमिका असल्याचा आरोप माओवाद्यांनी केला होता. यावरून त्यांची हत्या केली जात असल्याचे समजते.

May 25, 2015 in मुख्य पान
विद्यार्थ्यांच्या अंगावर फेकले उकळते तेल 0

विद्यार्थ्यांच्या अंगावर फेकले उकळते तेल

11
नाशिक – मनमाड रेल्वे स्थानकावर यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये चालत्या गाडीत पॅनट्री (स्वयंपाक गृहातील) कर्मचाऱ्यांनी तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावल्याचा प्रकार घडला. यात पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी रेल्वे स्वयंपाक गृहातील १८ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर जखमींना मनमाड उप जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी बंगळूरहून दिल्लीकडे यशवंतपूर एक्सप्रेसने ६२ विद्यार्थी प्रवास करीत होते. यावेळी त्यांनी रेल्वे पॅनट्री कर्मचाऱ्यांकडून बिर्याणी घेतली. दरम्यान बिर्याणीमध्ये लोखंडी स्क्रू निघाल्याने त्याबाबत विचारणा करण्यास हे विद्यार्थी मॅनेजरकडे गेले असता, तेथील कर्मचाऱ्याने तापते तेल विद्यार्थ्यांच्या अंगावर फिरकावले. यादरम्यान बोगीत हाणामारी झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर हाणामारीत गरम पाणी खाली सांडल्याने ५ जण जखमी झाल्याचे पॅनट्री बोगी मॅनेजर यांनी सांगितले आहे. रेल्वे पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले असून ३ विद्यार्थी आणि २ पॅनट्री कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या सगळ्या गोंधळात यशवंतपूर एक्सप्रेस मनमाड स्थानकात एक तास खोळंबून होती.

 

May 25, 2015 in मुख्य पान
३ अपघातात २० ठार, २४ जखमी 0

३ अपघातात २० ठार, २४ जखमी

10
पालघर/पुणे/नांदेड – आठवड्याचा पहिलाच दिवस राज्यात झालेल्या तीन भीषण अपघातांनी घातवार ठरत आहे. तीन अपघातात २० जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. पहिल्या दुर्घटनेत बारामती तालुक्यातील तिरुपती दर्शनासाठी गेलेल्या भक्तांच्या स्कॉर्पिओला आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे अपघात होऊन यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री अडीचच्या सुमारास झाला. दुसऱ्या एका घटनेत आज सकाळी पावणेचारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन बसमध्ये टक्कर होऊन झालेल्या अपघातात ११ प्रवासी ठार झाले तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ७ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे.जखमींना मुंबई आणि गुजरातमधील वेगवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिसऱ्या घटनेत नांदेड जिल्ह्यात स्विप्ट कारला भरधाव डंपरने धडक दिल्याने बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बारामती तालुक्यातील तिरुपती भक्तांचा आंध्रप्रदेशातील कर्नूल येथे झालेल्या अपघातात ७ युवकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सागर अंकुश रसाळ, सागर बाळासाहेब रसाळ, अजित रामचंद्र रसाळ, अनिल रमेश गवळी, शेखर बापूराव गवळी, ऋषिकेश पोपट गवळी, मोहन दत्तात्रय गवळी आदी सामिल आहेत. हे सर्वजण बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ आणि उंडवडी सुपे येथील रहिवासी आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये गुजरातमधील नडीयाद येथून एक खासगी आरामबस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असताना तलासरीजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या एका मिनी बसने या आराम बसला जोराची धडक दिली. डिव्हायडर तोडून ही बस आरामबसवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसमधील ११ प्रवासी जागीच ठार झाले. तर २० जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
भरधाव डंपरने धडकेत कारमधील दोघेजण ठार, तर चार जण गंभीर
नांदेड – भरधाव वेगात असणाऱ्या टिप्परने समोरून येणाऱ्या कारला धडक दिल्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी येथील एकाच कुटुंबातील दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री लोह्याजवळील सुनेगाव टाळावा येथे हा भीषण अपघात झाला.
या अपघातात कारमधील राजेंद्र कानगावकर (वय ४७), वच्छला कानगावकर हे दोघेजण जागीच ठार झाले. तर वैशाली कानगावकर, साधना कानगावकर, समर्थ कानगावकर व कारचालक गंभीर जखमी झाले आहेत.
उमरी येथे साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून कानगावकर कुटुंबीय स्विफ्ट डिझायर कारने (एम एच ४४ जी १६८४) परळीकडे परतत होते. लोह्याच्या शिवाजी चौकातून गंगाखेड मार्गाकडे वळाल्यानंतर दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या सुनेगाव तलावालगत समोरून येणाऱ्या भरधाव वेगातील टिप्परने (एम एच २६ ३४१) कारला समोरून धडक दिली. घटनेनंतर टिपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे निधन 0

दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे निधन

8f81great_bhet_eknath_avahad_300x255
बीड – देशातील दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते अॅड. एकनाथ आवाड यांचे हैदराबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात अल्सरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
‘मानवी हक्क अभियाना’च्या माध्यमातून दलित व वंचितांसाठी संघर्ष करणारे बंडखोर दलित नेते अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या निधनामुळे दलीत चळवळीचा लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. पोटाच्या अल्सरने त्रस्त असलेले आवाड हैदराबाद येथील एशियन रुग्णालयात उपचार घेत होते. तिथेच सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आवाड यांच्यावर उद्या (मंगळवारी) सकाळी बीड जिल्ह्यातील तेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आव्हाड यांच्या निधनामुळे परिवर्तनाच्या लढाईतला बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आव्हाड यांचा जन्म मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मातंग कुटुंबात झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीत शिष्यवृत्तीच्या बळावर, लोकांच्या मदतीने आव्हाडांनी बी.ए. आणि नंतर एम.एस.डब्ल्यू.चा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते विवेक पंडित यांच्याबरोबर ठाणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी काम करू लागले. वेठबिगारांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठवले होते.
‘मानवी हक्क अभियान’ या चळवळीच्या माध्यमातून आवाड यांनी मराठवाड्यातील सुमारे पन्नास हजार दलितांच्या जमिनी वाचविल्या. आव्हाड यांच्या या अभियानामुळे मराठवाड्यातील दलितांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळाले. गुलामीचे प्रतीक असलेली गावकीची कामे दलितांनी सोडावीत आणि आत्मसन्मानाने जगावे हा आवाडांच्या चळवळीचा उद्देश होता. त्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. या संघर्षातूनच ‘जग बदल घालुनि घाव’ हे त्यांचे आत्मकथन जन्माला आले. त्यांचे हे पुस्तक चळवळीसाठी मार्गदर्शक ठरले आहे.

 

May 25, 2015 in मुख्य पान