पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 24th, 2014

धारदार शस्त्राने युवकाचा खून

यवतमाळ – धारदार शस्त्राने युवकाचा खून करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता दरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या आर्णी-घाटंजीबायपासवर घडली. विजय अमरनाथ उपाध्ये (३०)रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी असे मृताचे नाव आहे.
विजय हा फायनांन्स एजन्सी चालवित असून या व्यवसायीक वादातून चार जणांनी हा खून केल्याची चर्चा आहे. एक युवक रक्ताच्या थारोळ््यात बायपासवर पडून असल्याची माहिती चार्ली कमांडोला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता विजय अखेरच्या घटका मोजत होता. चार्ली कमांडोंनी त्याना उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वडगावरोड पोलिसांनी देखील शासकीय रुग्णालय गाठून संशयीत आरोपींचा शोध घेणे सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

July 24, 2014 in मुख्य पान

गुराख्यास मारहाण करणाºया आरोपीस कारावास

यवतमाळ  – क्षुल्लक कारणावरून गुराख्याला मारहाण करणाºया आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आज गुरुवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एम.पळसापूरे यांनी हा निकाल दिला.
शंकर विश्वनाथ कांबळे (४५) रा. बेलोरा असे आरोपीचे नाव आहे. दिलीप तुकाराम हस्ते (३५) हे गुराखी असून गावातील नागरिकांच्या बकर्या चारत होते. त्याच्याकडे आरोपीच्या बकर्या चारण्यासाठी होत्या.३ मे २०१३ रोजी रात्री ८ वाजता हस्ते हे १०० रुपये मागण्यासाठी आरोपी शंकरकडे गेला होता. यावेळी आरोपीने वाद करून त्याच्यासोबत भांडण सुुरु केले. ही बाब निदर्शनास येताच फिर्यादीचा मुलगा अमित हस्ते (२०)  हा भांडण सोंडविण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपीने काठीने डोक्यावर मारहाण करून अमितला गंभीर जखमी केले. याप्रकरणी हस्ते यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूध्द भांदवि कलम ३२४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जमादार प्रभाकर चोटे यांनी आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम.एम. पळसापूरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये दोष सिध्द झाल्याने आरोपी शंकर कांबळे यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. बचावपक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.

July 24, 2014 in मुख्य पान

अल्जेरियाचे विमान कोसळले

अल्जियर्स –  बुर्किना फासोहून अल्जेरियाकडे येत असलेले एअर अल्जेरिया कंपनीने प्रवासी विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या विमानात एकूण ११६ जण होते. अल्जेरियाच्या हवाई वाहतूक खात्याने या बातमीला दुजोरा दिला आहे. या विमानात एकूण ११० प्रवासी आणि ६ क्रू मेंबर होते, अशी माहिती आहे. या विमानात अर्ध्याहून अधिक फ्रान्सचे नागरिक प्रवास करत होते.
बुर्किना फासोची राजधानी औगादुगोच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ५० मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानातील प्रवासी युरोप, मध्यपूर्व आणि कॅनडा येथे जाणारे होते, अशी माहिती आहे. विमानाच्या शोधा घेण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. हे विमान एका आठवड्यात चार वेळा उड्डाण करत होते, अशी माहिती आहे.

July 24, 2014 in मुख्य पान

कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका ४० वर्षीयवर महिलेवर कारमध्ये बलात्कार करण्यात आलाय. ओळखीच्या असलेल्या दोन जणांनी बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शॉपिंग करण्यासाठी ही माहिला मंगळवारी वांद्र्याला आली होती. त्यानंतर तिने वांद्रे रेल्वे स्थानका बाहेरून रिक्षा केली. पण रिक्षावाल्याने तिला तिने सांगितलेल्या ठिकाणी न सोडता धारावीला सोडलं. तिथे ही पीडित महिला टॅक्सीची वाट पाहत उभी होती. त्यावेळी तिच्या ओळखीचे असलेले दोघे आरोपी गाडीने आले आणि घरी सोडण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसवलं. यानंतर दोघांनी तिच्यावर धावत्या कारमध्येच बलात्कार केला आणि २५ मिनिटांनी पुन्हा धारावीजवळ सोडलं, अशी माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली. त्यानंतर धारावी पोलिसांनी तिची तक्रार दाखल केलीय.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, पण त्यांना अटक केलेली नाही. आपण कोणताही गुन्हा केला नसल्याचं सांगत आरोपींनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यामुळे पेच निर्माण झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केलाय.

July 24, 2014 in मुख्य पान