नवी दिल्ली – उत्तर दिल्लीतील इंद्रलोक परिसरात शनिवारी सकाळी एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाचे घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु असून, आतापर्यंत दहा जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले आहे.
अजूनही काही जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. ही इमारत ५० वर्ष जुनी होती. यात काही कुटुंबे रहात होती. आतापर्यंत दहा जणांना ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
अजूनही काही जण ढिगा-याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. नेमके किती जण अडकले आहेत तो आकडा आताच सांगता येणार नाही असे दिल्लीचे पोलिस उपायुक्त मधुर वर्मा यांनी सांगितले.
सकाळी नऊ वाजता दिल्ली पोलिसांना इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या चार गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. इंद्रलोक परिसरातील तुलसीनगरमध्ये ही इमारत होती. हा दाटवस्तीचा भाग असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत.

















































