पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 13th, 2014

वीज पडून महिलेचा मृत्यू , नऊ मजूर जखमी

वणी – तालुक्यातील भालर शिवारामध्ये वीज पडून ३३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून नऊ मजूर जखमी झाल्याची घटना दि़१३ जुलै ला ४.१५ वाजता घडली़
भालर शिवारातील विठोबा हेपट यांच्या शेतात काम करणाºया दहा मजूरांवर वीज पडल्यामुळे ज्योती शिवा दोडके ही ३३ वर्षीय महिला जागीच मृत्यूमुखी पडली़ वीजेचा धक्का एवढा जबरदस्त होता की, शेतात काम करणारे शेतमालक विठोबा हेपट, अर्चना अशोक गोहोकार, लता नथ्थू टेकाळ, मंजूषा तुळशीराम गोहोकार, योगीता लक्ष्मण दोडके, मंदा विठोबा हेपट, शिवा दोडके हे जखमी झाले असून संगीता मारोती गोहोकार हीची प्रकृती गंभीर असल्याच्या कारणावरुन तीला उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे़
गत ४० दिवसापासून शेतकरी वर्ग पावसाची आतूरतेने वाट पाहत होते़ भालर शिवारातील हेपट यांनी काही प्रमाणात सिंचन करुन बियानांची लागवड केली होती़ शेतीच्या कामाकरीता मजूरवर्ग शेतात राबत असतांना ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस पडत असतांना ही घटना घडली़ या घटनेमुळे भालर गांवात शोककळा पसरली आहे़

July 13, 2014 in मुख्य पान

ट्रेलरखाली चिरडल्याने दोन युवकांचा मृत्यू

 

यवतमाळ  – दुचाकीने गावाकडे जात असताना ट्रेलरने चिरडल्याने झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९.४५ वाजता नागपूर बायपास(कळंबचौक) येथे घडली. सचिन मधुकर बोरकर (२६), विष्णू गुलाब भोसेकर (३०) दोघेही रा. कळंब माथा असे मृतांचे नाव आहे.
सचिन व विष्णू यवतमाळात एक वाहनावर काम करीत होते. रविवारी सुट्टी असल्याने ते कळंब येथे जाण्यासाठी दुचाकीने (क्र. एम.एच. २९/ वाय ७२१)निघाले. नागपूर बायपासवर दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. ही बाब ट्रेलर (क्रमांक एम.एच.३१/ वाय८४९१)चालकाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे ट्रेलरने दोन्ही युवकांना जवळपास ५० मिटर अंतरापर्यंत फरफटत नेले. नागपूर बायपासवर कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलीस शिपायाच्या लक्षात ही घटना आली. त्याने शिट्टी वाजवून ट्रेलरचालकाला थांबविले असता समोरचे दृष्य बघून चालकालाही धक्का बसला. हा अपघात नेमका कसा झाला, त्यालाही कळले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दोनही युवक कळंबकडे जात असताना दुचाकी स्लीप झाल्याने ट्रेलरच्या मागील चाकात सापडली. त्यातच युवकांचा चिरडल्याने मृत्यू झाला. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात मिळताच ठाणेदार दिलीप चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास वांदीले, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अपघात स्थळावर नागरिकांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. सदर ट्रेलर हा पांढरकवडा येथून जालन्याकडे जात होता.  शंकर बोरकर याने या घटनेची तक्रार शहर पोलिसात दिली. त्यावरून ट्रेलरचालक विठ्ठल किसन राऊत रा. रुंदावन टाकळी ता. पांढरकवडा याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गावाकडे जाणाºया युवकांवर काळाने झडप घातली. याघटनेने कळंब शहरात शोककळा पसरली होती.

July 13, 2014 in मुख्य पान
  टोयाटोची दुचाकीला धडक, तिन जखमी 0

टोयाटोची दुचाकीला धडक, तिन जखमी

IMG-20140713-WA0019
आर्णी  – यवतमाळ वरून आर्णीकडे येणाºया टोयाटो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना आज रविवारी सायंकाळी ६ वाजता येथील वीज उपकेंद्राजवळ घडली.
दिलीप देविदास भरबडे, अश्विन अशोक तीजारे, दिनेश राजेंद्र डेहणकर सर्व रा. कापरा ता. यवतमाळ  असे जखमींची नावे आहेत. ते आपल्या दुचाकीने (एम.एच. २९ / एजी ३८६३) आर्णीवरून यवतमाळकडे जात होते. अशातच समोरून येणाºया टॉयाटो वाहनाने (एम. एच. १२/ डिई १९८३ ) वीज उपकेंद्राजवळ धडक दिली. यामध्ये तीघेंही जखमी झाले असून रुग्णालात उपचार  सुरु आहे. या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.

वर्षभरात भारतीयांची कोट्यावधींची मालमत्ता चोरीला 0

वर्षभरात भारतीयांची कोट्यावधींची मालमत्ता चोरीला

theft
नवी दिल्ली – संपूर्ण देशभरातून गेल्या वर्षभरात १३ हजार २१९ कोटी रुपयांच्या मालमत्तेची चोरी झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या २०१३ च्या आकडेवारीतून समोर आले आहे. गेल्या दहा वर्षातील ही दुसरी सर्वात मोठी आकडेवारी आहे. विशेष म्हणजे चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी एक हजार ७६२ कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दिवसेंदिवस वस्तूंच्या वाढत्या किंमतीमुळे चोरी गेलेल्या वस्तूंच्या मालमत्तेच्या किंमतीत वाढ होत असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. वाहनांची चोरी मोठ्य़ा प्रमाणात होते. चोरी केलेल्या मालमत्तेत तीस टक्के वाहनांचा समावेश असतो. कोलकाता, चेन्नई आणि मुंबईतील एकूण मिळून वाहने एकट्या दिल्ली शहरात आहेत. असे पोलिस अधिकारी म्हणाले. रोख, दागिने आणि वाहने यांची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते.
२०१२ मध्ये २१ लाख, सात हजार १९४ लाख रुपयांची मालमत्ता चोरीला गेली त्यापैकी एक लाख, ४१ हजार ७९३ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले. गेल्या दहा वर्षात चोरी केल्या जाणा-या मालमत्तेत ६६१.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मालमत्ता हस्तगत करण्याचे प्रमाण कमी म्हणजेच -४८.३ टक्के इतके आहे.
संपूर्ण राज्याचा विचार केला, तर २०१३मध्ये राज्यातून ४ हजार ३१५ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला होती. त्या तुलनेत ३१९ कोटी रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. अवघा ७.४ टक्के ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. गोव्यामध्ये २०१३ मध्ये तीन हजार ४८ कोटी रुपयांची मालमत्ता चोरीस गेली होती. तर तामिळनाडूमध्ये २०१३ मध्ये ७३.६ टक्के चोरी झालेली मालमत्ता हस्तगत करण्यात आली. त्यापाठोपाठ सिक्कीम(५१.९), आंध्र प्रदेश(५१.७) आणि राजस्थान(५०.७) टक्के मालमत्ता २०१३ मध्ये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. गोव्यामध्ये २०१३ मध्ये सर्वात कमी म्हणजेच केवळ ०.१ टक्के मालमत्ता पोलिसांना हस्तगत करण्यात आली.

ताडदेव येथे भिंत कोसळून दोन ठार 0

ताडदेव येथे भिंत कोसळून दोन ठार

wall-collaps
मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाने शनिवारी चांगलाच तडाका दिला. कुलाबा, शिवडी, मालाड येथे पडझडीच्या घटना ताज्या असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताडदेव येथील व्हाईट हाऊस बारच्या मागील इमारतीचा भाग कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.
मुंबई सेंट्रल पश्चिम येथील व्हाईट हाऊस बारच्या मागे एक मोडकळीस आलेली इमारत आहे. या इमारतीच्या आडोशाला तीन जण झोपले होते. रात्री एक वाजताच्या सुमारास अचानक या इमारतीचा १० फुट उंचीचा भाग कोसळला. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. जुना भाग कोसळल्याने त्याच्या ढिगा-याखाली दबलेल्या जितेंद्रकुमार विश्वेश्वर प्रसाद सिंग (४५) आणि मनोजकुमार बलराम सिंग (३५) यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. मात्र त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर यात मनीष कुमार सिंकदर सिंग हा जखमी झाला. जखमी मनीषला उपचाराकरता महापालिकेच्या नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी मनीषवर उपचार करून त्याला घरी सोडले. तर मृत जितेंद्रकुमार आणि मनोजकुमार या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन त्या दोघांचे मृतदेह अंत्यविधीकरता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ताडदेव पोलिस करत आहेत.

अमरनाथ यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू 0

अमरनाथ यात्रेत तीन यात्रेकरूंचा मृत्यू

Amarnath Yatra at Baltal
श्रीनगर- अमरनाथ यात्रेत जाणा-या तीन यात्रेकरूंचा मृत्यू झाला. यामुळे यंदा या यात्रेत बळी गेलेल्या यात्रेकरूंची संख्या २५ वर गेली आहे. वडोदरा येथील सरोजिनी जी यांचा शनिवारी सायंकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर दोन पुरुष यात्रेकरू शुक्रवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. या यात्रेकरूंची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, २८ जूनपासून सुरू झालेल्या यात्रेत आतापर्यंत दोन लाख भाविकांनी ‘बाबा अमरनाथ’ यांचे दर्शन घेतले आहे.

लोकसभेचा हिशेब चुकता करा!, मगच विधानसभा बोला

मनसेच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर
यवतमाळ – विधासभा मतदारासंघासाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आलेले मनसेचे सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी आज शुक्रवारी स्थानिक विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश आ. शिंदे यांनी दिल्यावर कार्यकर्त्यांनी आधी लोकसभेचा हिशेब चुकता करा, नंतरच विधानसभा बोला, असा सूर आवळला. लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यांना उमेदवाराने पैसे न दिल्याने निवडणुकीचे कर्ज कार्यकर्त्यांना फेडावे लागत असून, कार्यकर्ते दुरावल्या गेल्याने आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना नेत्यांपुढे व्यक्त केल्या.
गेल्या काही वर्षात जिल्ह्यात मनसे चांगली वाढत असल्याचे पाहूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सभेसाठी होकार दिल्याने व यवतमाळात प्रथमच राज ठाकरे यांची सभा होत असल्याने सच्चे कार्यकर्ते जाम खूश होते. अभूतपूर्व अशी सभा यवतमाळात झाल्यानंतर मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी जोमाने कामाला लागले. मतदारसंघात दोन जिल्हे असल्यामुळे उमेदवाराने यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दिली. प्रचारासाठी, आॅटो, लाऊडस्पिकर, कार्यकर्त्यांना चहा, पाणी आदी खर्च केला.  लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवाराचा दारुण पराभव झाला. त्यानंतर उमेदवार यवतमाळ जिल्ह्याकडे फिरकलाच नाही. कार्यकर्ते लोकांचे देणे बाकी असल्याचे फोन लावत असताना, पैसे देण्याचे उमेदवाराने टाळले. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्षात हालचाली सुरू झाल्या असताना, मनसेही विधानसभा काबीज करण्यासाठी जिल्ह्या-जिल्ह्याच्या दौºयावर निघाली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणिस आ. शिशिर शिंदे, माजी आ. जयप्रकाश बावीस्कर व शिरीष सावंत जिल्ह्याच्या दौºयावर काल गुरुवारपासून आहे. उमरखेड व पुसद मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी पुसदमध्ये बैठक घेतली. आज शुक्रवारी यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक विश्रामगृहात घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च उमेदवाराने आमच्या बोकांडी बसविला आहे. याचा हिशेब आधी चुकता करा, त्यानंतरच विधानसभा निवडणुकीचे बोला. असा सूर आवळल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी, सागर पुरी, आनंद एंबडवार, अनिल हमदापुरे, संजय बोकसे, मंगेश रुईकर वणीसाठी जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता काळे, दिग्रससाठी विकास पवार, केळापूर-आर्णीसाठी जिल्हा परिषद सदस्य अल्का टेकाम यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. याचा अहवाल राज ठाकरे यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतरच   उमेदवारांची घोषणा होणार आहे.

July 13, 2014 in मुख्य पान

मुख्यमंत्री मनसे ठरविणार- आ. शिंदे

२०० जागा लढण्याचा निर्धार
यवतमाळ – लोकसभेतील पराभवाला खचून न जाता पक्ष विधानसभा डोळ््यासमोर ठेवून कामाला लागला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उभारी आली असून, मनसेच राज्याचा मुख्यमंत्री ठरविणार असल्याचा विश्वास सरचिटणिस तथा आ. शिशिर शिंदे यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी ते आज शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ते विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यात मनसे स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असून, २०० मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे. निवडणुका म्हटल्या की जय-पराजय निश्चितच आहे. मात्र, लोकसभेच्या पराभवामुळे मनसे खचली नसून, मनसेकडे राज ठाकरे सारखे कणखर नेतृत्व असल्यामुळे भविष्यात पक्षाची वाटचाल चांगली जाणार आहे. पक्ष निवडणुकी पुरताच नसून, जनतेच्या प्रश्नाला घेऊन लढणारा पक्ष असल्याचे यावेळी आ. शिंदे म्हणाले. विधानसभा काबीज करण्यासाठी निवडणुकीत मनसे वेगळे प्रश्न घेऊन मैदानात उतरणार आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटन व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी मनसेची असून, माझ्या दौºयामध्ये मनसेला जिल्ह्यातील तीन मतदारसंघ पोषक असल्याचे पाहणीत आले. मात्र, त्या मतदारसंघाचे नाव सांगण्याचे आ. शिंदे यांनी टाळले. आज यवतमाळ, वणी, दिग्रस, पांढरकवडा या चार तालुक्यांतील कार्यकत्यांच्या बैठकी घेण्यात आल्या असून, इच्छूक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी लांबलचक यादी आहे. मुंबई येथे अहवाल सादर केल्यानंतर उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा होणार असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात मनसेमध्ये गटबाजी असल्याचे पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी माझ्या पाहणीत आढळून आले नसल्याचे सांगितले. यावेळी माजी आ. जयप्रकाश बावीस्कर, सरचिटणिस शिरीष सावंत उपस्थित होते.

July 13, 2014 in मुख्य पान