पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 20th, 2014

पालेभाज्या महागल्या… 0

पालेभाज्या महागल्या…

Congress activists protest against price hike
पालेभाज्या महागल्याने युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी भोपाळमध्ये मोदी सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली.

मोदींच्या शपथविधीचा खर्च १७.६० लाख रुपये 0

मोदींच्या शपथविधीचा खर्च १७.६० लाख रुपये

Swearing-in ceremony of NDA government

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक शपथविधीसाठी एकूण १७.६० लाख रुपये खर्च करण्यात आले.
राष्ट्रपती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. माहितीच्या अधिकारात रमेश वर्मा यांनी या माहितीबाबत विचारणा केली होती. यावर कार्यालयाने शपथविधी सोहळ्याच्या खर्चाची ही माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर २६ मे रोजी मोदींचा शपथविधी पार पडला. यावेळी या सोहळ्यास विविध देशांच्या प्रमुखांसह तीन हजाराहून अधिक पाहुणे उपस्थित होते. मोठ्या दिमाखदार पद्धतीने हा सोहळ पार पडला होता.

यवतमाळच्या सुपुत्राची अवकाश भरारी! लघूग्रहाला डॉ. आशिष महाबळ यांचे नाव

यवतमाळ – अवकाशातील ग्रह ताºयांचे अनेकांना आकर्षण राहिले आहे. ग्रहांना अभ्यासकांचे नाव देण्याचा सन्मान काही ठराविक संशोधकांच्याच वाट्याला आला आहे. १५ फेब्रुवारी २००४ रोजी शोधलेल्या एका लघुग्रहाला यवतमाळ येथील डॉ. आशीष महाबळ या संशोधकाचे नाव देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. आशीष महाबळ हे १९९९ पासून अमेरीकेतील पॅसॅडेना येथील कॅलिफोर्नीया इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नालॉजी (कॅलटेक) मध्ये वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. आशीष अरविंद महाबळ हे मूळचे यवतमाळचे. आजही त्यांचे आई बाबा येथेच राहतात. बाबा एल.आय.सी. मधे नोकरीत होते. त्यामुळे बाबा जेथे जेथे बदलून जायचे त्या त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण परभणी, यवतमाळ, चंद्रपूर येथे, तर त्यापूढील शिक्षण शिवाजी कॉलेज नागपूर येथे झाले. १९७९ साली अमेरीकेची स्काय लॅब पृथ्वीवर कोसळली. त्यावेळी या प्रकरणाचा खूप गाजावाजा झाला. व येथूनच डॉ. आशिषच्या मेंदूत अवकाशा विषयी प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली. अवकाशा विषयीचे मुलाचे आकर्षण व जिद्द पाहून त्याच साली बाबांनी त्याला एक टेलीस्कोप घेउन दिला. तेव्हापासून टेलिस्कोपशी आशिषच नात जूळलं ते कायमचच. शिक्षण सुरू असतांनाच पूणे येथिल आयुका मधे वेळोवेळी होणाºया उन्हाळी शिबीरात त्याची नेहमीच हजेरी असायची. त्यामुळे डॉ. जयंतजी नारळीकर यांच्याशी जवळचे संबंध आले. परिणामत: तेथूनच अ‍ॅस्टंोफिजीक्स मधे पी.एच.डी. केली. याही पूढे जाउन २ वर्षे अहमदाबादमधे राहून पोष्ट डॉक्टरेट केले. नंतर १९९९ ला सरळ अमेरिका गाठली. साडे चार अब्ज वषार्पूर्वी जेव्हा आपली सूर्यमाला घडत होती, तेव्हा मंगळ आणि गुरू या ग्रहाच्या दरम्यान एक ‘फेथन’ नांवाचा ग्रह उदयास येत होता. मात्र गुरू आणि सूर्याच्या ओढा ताणीत त्याचे असंख्य तुकडे झाले व त्याच अवस्थेत ते आजतागायत सुयार्भोवती फिरत आहेत. याला ‘लघुग्रह’ असे म्हणतात. या ठिकाणी किमान १५ ते २० लाख लघुग्रह असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
अ‍ॅरिझोना मधील ‘कॅटलिना स्काय सर्व्हे’ नावाची संस्था, लघुग्रह शोधून त्याच्या कक्षा निश्चित करण्याचे काम करते. अमेरीकेतील पॅसॅडेना येथिल कॅलिफोनीर्या इन्स्टीटयूट आॅफ टेक्नालॉजी (कॅलटेक) च्या कॅटलिना रिअल टाईम टांन्झीयंट सर्व्हे (सी.आर.टी.एस.) या प्रकल्पा अंतर्गत कॅटलिना स्काय सर्व्हेचाच डाटा वापरला जातो. डॉ. आशिष महाबळ हे सी.आर.टी.एस. या संस्थेचे सदस्य आहेत. या सदस्यांनी १५ फेब्रुवारी २००४ रोजी, रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमांतून हा लघुग्रह शोधला. पुढे त्याचा आकार व कक्षा ठरविण्याच्या, डॉ. महाबळांच्या योगदानाबददल या लघुग्रहाला ‘महाबळ’ हे नाव देण्यात आले. लघुग्रहाचे नामकरण मायनर प्लॅनेट सेंटर ही संस्था करते. या लघुग्रहाची पर्यायी नांवे ९०४७२ आणि २००४ सी.टी. ९९ अशी आहेत. हा लघुग्रह अत्यंत लहान असून सध्या तो सूर्याच्या बाजूला – ३० अंशावर आहे. मात्र हा अत्यंत लहान असल्यामुळे हौशी दूबीर्णीतून दिसणे अवघड आहे. बालपणापासून आई वडील व वेळोवेळी लाभलेल्या गुरूजनांच्या मार्गदर्शनामूळे हे यश गाठता आले असे डॉ. आशिष महाबळांचे मत आहे. या निमित्ताने यवतमाळकरांचेच नव्हे तर भारत देशाचे नांव निदान या लघुग्रहाच्या उंची पर्यंत पोहोचले, यात शंका नाही.

July 20, 2014 in मुख्य पान

कळंबच्या चोरट्याकडून आठ दुचाकी जप्त

यवतमाळ – यवतमाळसह वर्धा शहरातून दुचाकी चोरणाºया चोरट्याला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज वणीतून अटक केली. शेख रिजवान उर्फ टोनू अब्दूल रज्जाक (२०)रा. हलबीपुरा कळंब असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. सदर युवक कळंब येथून यवतमाळ, वर्धेमध्ये यायचा वाहनधारकांवर पाळत ठेवून दुचाकी लाबवयाचा. शहरात गत महिन्यात अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहे. दुचाकी चोरटा वणीत असल्याची ‘टिप’ विशेष पथकाला मिळाली. त्यावरून पथक दोन दिवसापासून त्याच्या मागावर होते. अखेर आज चोरटा पथकाला आढळून येताच शिताफीने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, किंमत अडीज लाख रुपये आहे. शासकीय रुग्णालयातून २, न्यायालय परिसर १ व वर्धा येथून २ अशा पाच दुचाकी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पुन्हा काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. तसेच ज्यांनी त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी खरेदी केल्या त्यांचाही तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजू वटाणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय डगले,ऋृषी ठाकूर, गजानन डोंगरे, विशाल भगत, प्रदीप नाईकवाडे, हरिष राऊत, गणेश देवतळे यांनी केली.

 

July 20, 2014 in मुख्य पान
दुबार पेरणीच्या संकटाने शेतकºयाची आत्महत्या 0

दुबार पेरणीच्या संकटाने शेतकºयाची आत्महत्या

photo 001

नेर (यवतमाळ) – दुबार पेरणीही वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील शेतकºयांने जीवनयात्रा संपविल्याची घटना आज रविवारी घडली. वासुदेव आत्माराम नेवारे (५५) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.
गेल्या दिड महिन्यात पावसाने मोजून चार ते पाच वेळाच हजेरी लावल्याने तालुक्यातील शेतकºयांची पीके करपल्या गेली. दुबार, तिबार पेरणी करूनही पावसाचा पत्ताच नसल्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावल्या गेले आहे. ब्राम्हणवाडा येथील नेवारे या शेतकºयाने सुरूवातीला पेरणी केल्यावर पाउस न आल्याने बियाणे उगवलेच नाही. दुबार पेरणीसाठी मांगलादेवी येथील युनियन बँकेकडे कर्जासाठी प्रकरण दाखल केले. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने बँकेने कर्ज नाकारले.कर्ज नद मिळाल्याने दुबार पेरणी कशी करावी अशी चिंता शेतकºयाला सतावत होती. या विवंचनेत आज नेवारे यांनी हनुमान टेकडी जवळ सुरू असलेल्या बांधकामातील गजाला गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी, २ मुले व १ मुलगी असा आप्तपरीवार असून, शासनाने मृतकाच्या कुटूबिंयाना मदत करावी अशी मागणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुनिल घावडे यांनी केली आहे.

July 20, 2014 in मुख्य पान
महामंडळाच्या बस झाल्या भंगार 0

महामंडळाच्या बस झाल्या भंगार

DSCN1812
चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे वाचले प्राण
नेर (यवतमाळ) – आगारातील भंगार बसचा फटका येथील प्रवाशांना बसला असून, चालकाच्या सावधगिरीने २१ जणाचे प्राण वाचल्याची घटना आज रविवारी घडली. या घटनेतून एसटी प्रशासनाने बोध घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
आगारातील एम. एच. २० डी ८६१६ क्रमांकाची बस आज नेहमीप्रमाणे प्रवाशी घेवून कामरगाव येथे गेली. प्रवासी घेवून परतत असताना, खरडगाव जवळील पुलाजवळ बसच्या टायरचे एक्सल तुटले. व चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस शेतात शिरली. बस पलटी होत असताना चालकाच्या सतर्कतेमुळे २१ प्रवाशांचे प्राण वाचले. आगारातील अनेक बसेस भंगार अवस्थेतील असून, खिळखिळ््या बसेसमुळे अपघाताची शक्यता असताना एसटी प्रशासनाने गंभिरतेने घेतले नाही. आज घडलेल्या अपघातातून प्रशासनाने बोध घेवून भंगार बसेस बंद कराव्या अशी मागणी संजय ठाकरे, नितीन मोहरकर, नितीन चव्हाण आदींनी केली आहे.

July 20, 2014 in मुख्य पान