असल्याने तेथेही डॉक्टरांना तैनात करण्यात आले आहे.
Archive for July 6th, 2014
0
वैद्यकीय अधिका:यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई
0
तामिळनाडूत भिंत कोसळून ११ ठार

चेन्नई – तामिळनाडूमधील तिरुवेल्लर जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि मुलांचा समावेश आहे.
‘शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे ही वीस फूट उंच भिंत कोसळली. यामध्ये ११ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये नऊ आंध्र प्रदेशमधील तर इतर तामिळनाडू येथील रहिवासी आहेत’,अशी माहिती तिरुवेल्लर जिल्हाधिकारी के. वीरा. राघव यांनी दिली. या प्रकरणी ज्या कंपनीसाठी ही भिंत उभारण्यात येत होती त्या कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. रामनाथन आणि बाळू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.आठवड्याभरापूर्वीच चेन्नईमधील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
0
मुरुड समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू
अलिबाग- अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांचा रविवारी मुरुड येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत.
समुद्रात पोहोयला गेले असताना ही दुर्घटना घडली. या सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
चेंबूर येथील घाटलागाव परिसरातील १५ जण अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ते सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील सहाजण बुडाले. यात विनोद झलाई, दिनेश पवार, दिलीप गोले, संजय पांचाळ, शंकर चव्हाण आणि रोहित झाला यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ४० ते ४५ वयोगटातील आहेत.













