पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 28th, 2014

गोळीबार करून दरोडा

नाशिकरोड -नाशिकरोडच्या दत्तमंदिर चौकाजवळील शहाणे ज्वेलर्सवर आज भरदुपारी पडलेल्या दरोड्यात रोकड आणि सोन्याची लुट करण्यात आली. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानमालक व त्याचा मावस भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नाशिक पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने चित्तथरारक पाठलाग करुन तीन सशंयितांना शहापूरजवळ अटक केली. त्यांच्याकडून मोटारीसह, शस्त्रे, मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
नाशिक-पुणे महामार्गावर दत्तमंदिरजवळील ड्र‌िम प्लाझामध्ये अभय अरुण शहाणे यांचे शहाणे ज्वेलर्स हे दुकान आहे. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मावस भाऊ सागर सोमनाथ शहाणे (वय२६) दुकानात एकटेच होते. त्यावेळी हिंदी बोलणारा एकजण लाल व्हर्ना कार (एमएच १२ जे.सी. ६५२४) घेऊन दुकानाजवळ आला. अभय शहाणे कोठे आहेत, अशी चौकशी केली. ते थोड्यावेळाने भेटतील असे सागरने त्याला सांगितले. त्यामुळे तो निघून गेला. अभय शहाणे तीनच्या सुमारास दुकानात आले. त्याचवेळी चौकशी करणाऱ्या तरुणासह चौघे दुकानात आले. पिस्तुलचा धाक दाखवून सोनं व रोकडची मागणी करू लागले. कारचालक वरच्या रुममध्ये बसलेल्या सागरजवळ आला. त्याला पिस्तुल दाखवून रोख पन्नास हजार आणि दहा तोळ्याची लगड बॅगमध्ये टाकली. सागरला घेऊन तो खाली आला. तेव्हा अभय शहाणे यांनी त्या सर्वांना प्रतिकार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे लुटारुंनी त्यांच्या पोटात गोळी मारली. पिस्तुल आपटून काऊंटर फोडले. तेथील सोने बॅगमध्ये भरले. एका लुटारूने सागरला खाली पाडून त्याच्यावर पिस्तुल रोखले. तो त्याच्यावर गोळी करणार इतक्यात त्याने धाडसाने पिस्तुल खाली पाडले. दुसऱ्या झपटीमध्ये त्याचा मोबाईल खाली पडला. जखमी अवस्थेतही अभय शहाणे यांनी टेबलवरील काचा लुटारुंच्या दिशेने फेकल्या. त्यात धारधार काच एका लुटारूच्या पोटात लागली. दोघांचा प्रतिकार पाहून लुटारू कारकडे पळाले. सागरही मागे धावला. त्याने चालकाच्या काचेवर बुक्की मारली. परंतु, दरोडेखोर पळून गेले. हा प्रकार पाहून परिसरातील अजिंक्य वालकर व त्यांच्या मित्राने मोटारसायकलवरून मोटारीचा पाठलाग केला. परंतु, ते मुंबईच्या दिशेने पसार झाले.

July 28, 2014 in मुख्य पान

१५६ वार करून युवकाचा खून

नागपूर – जुन्या वैमनस्यातून तिघांनी चाकूचे १५६ घाव घालून युवकाचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना सोमवारी सकाळी उमरेडमार्गावरील विहिरगाव भागात उघडकीस आली. रोशन सुरेश भुरे (वय १९, रा. माकडे ले-आउट, भांडे प्लॉट चौक), असे मृताचे नाव आहे. खूनाच्या या घटनेमुळे विहिरगावमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपी शिक्षण घेत असल्याची माहिती आहे.
रोशन हा खासगी काम करीत होता. त्याचे वडील वाडीकाम करतात. रविवारी त्याची आई नागद्वारला गेली. अन्य नातेवाइकांसह वडीलही गुरुवारी नागद्वारला जाणार होते. काही दिवसांपूर्वी गाडीचा कट लागल्याने अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत रोशनचा वाद झाला होता. रविवारी सायंकाळी तीन विद्यार्थी त्याला घेऊन विहिरगाव येथे गेले. तेथे सर्वांनी मिळून दारू पिल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांनी त्याच्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. रोशन ज‌िवाच्या आकांताने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना मारेकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. दरम्यान रोशन हा पानठेल्यामागे लपला असल्याचे मारेकऱ्यांना दिसताच पुन्हा चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. मारेकऱ्यांनी त्याच्यावर तब्बल १५६ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात रोशन खाली पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोशन ठार झाल्याचे लक्षात येताच मारेकरी पसार झाले. सोमवारी सकाळी एका युवकाचा मृतदेह विहिरगाव भागात असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर पोलिसांना कळविताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करुन मृतदेह मेडिकलकडे रवाना केला. घटनास्थळी आढळलेल्या मोबाइलवरून मृतकाची ओळख पटली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन ‌तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले.

July 28, 2014 in मुख्य पान

मनसेकडून कर्नाटक सरकारच्या पुतळ््याचे दहन

280720142875
यवतमाळ- कर्नाटकातील सीमाभागात येळ्ळूर येथे मराठी भाषीकांना मारहाण करून जखमी करण्यात आले. या घटनेचे पडसाद आज यवतमाळातही उमटले. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाºयांनी नेताजी चौकात कर्नाटक सरकारच्या पुतळ््याचे दहन करून या घटनेचा निषेध नोंदविला.
कर्नाटकात सीमाभागात राहणाºया मराठी माणसांवर अन्याय सुरू आहे. यात कर्नाटक सरकारकडून मिळणारी वागणूक निषेधार्ह आहे. या घटनेचा निषेध नोंदवित महाराष्टÑातही कानडी भाषिक आहे, हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा यावेळी देण्यात आला. सोमवारी ५ वाजता नेताजी चौकात असलेल्या मनसे कार्यालयाजवळ पुतळा दहन करून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी, अनिल हमदापूरे, संजय देठे, देवा शिवरामवार, नीरज वाघमारे, विकास पवार, अभिजित नानवटकर, अमित बदनोरे, अंजू चिलोरकर, रेश्मा आठवले आदी उपस्थित होते.

July 28, 2014 in मुख्य पान
  जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनांसह  १२ वाहनांची तोडफोड 0

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहनांसह १२ वाहनांची तोडफोड

IMG-20140728-WA0003
शहरात माथेफिरूंचा धुमाकूळ ,  दोन युवक ‘सीसीटीव्ही’त कैद
यवतमाळ – शहरात रविवारच्या मध्यरात्री अज्ञात दोन दुचाकीस्वार युवकांनी धुमाकूळ घालित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या वाहनांसह तब्बल बारा वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. दोन्ही  माथेफिरू  युवक ‘सीसीटीव्ही’ कॅमेºयात कैद झाले असून पोलिसांपुढे दोन्ही आरोपी शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
दुचाकीवर स्वार असलेल्या अज्ञात दोन युवकांनी काल मध्यरात्री दर्डानगरसह वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया नगरात चांगलाच धुमाकूळ घातला. सर्वप्रथम दर्डा नगरात वाहनांची तोडफोड केल्याचे सांगितल्या जाते. विशेष म्हणजे तोडफोड करण्यात आलेल्या वाहनांमध्ये राष्टÑवादीच्या नेत्यांसह मनसे जिल्हाध्यक्ष अशोक पुरी यांच्या वाहनाचा समावेश आहे. त्यानंतर दुचाकीस्वारांनी आपला मोर्चा श्रीकृष्णनगर, महादेवनगर, शिवाजीनगर, ओमसोसायटी, दाते कॉलेज चौकात वळविला. घरासमारे उभ्या असल्याल्या वाहनांवर दगडफेक करून काचा फोडल्या. ही बाब सकाळी उघडकीस येताच खळबळ उडाली. ही तोडफोड नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली. याबाबत चर्चेला उधाण आले आहे. दर्डानगर, श्रीकृष्णनगरात वाहन फोडल्यानंतर दुचाकीस्वार महादेवनगरकडे येत असताना विधाता कोचिंग क्लासेससमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. मात्र रात्री अंधार असल्याने चित्र स्पष्ट दिसत नाही. याच परिसरातील संजय ढोक यांचे एम.एच.२९/आर ४७०७ या वाहनाच्या काचा फोडल्या. सीसीटीव्हीत दाखविल्याप्रमाणे तेव्हा रात्रीचे १ वाजून १३ मिनिट झाले होते. कृषीनगरातील राहुल दौलतकर यांचे एम.एच. ३२/ एम १ या क्रमांकाचे वाहन फोडले. ओम सोसायटीत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचे निवास्थान आहे. रात्री बाहेरून आल्यानंतर त्यांचे वाहन घरासमोर उभे होते. तर देशमुख आतमध्ये कामात व्यस्त असताना बाहेर वाहनांवर दगडफेक केल्याचा आवाज आला. लगेच त्यांनी बाहेर येऊन बघितले असता दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांनी स्कोडा क्रमांक एम.एच. ४३/ एजे ५६९७, एम.एच.२६/एल १४४४ या वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर दाते कॉलेज चौकातही असाच धुमाकूळ घालून तोडफोड केली. याप्रकरणी वाहनधारकांनी वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. वाहनांचे नुकसान झालेल्यांमध्ये जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख,  शशिकांत भूते (दाते कॉलेज चौक), राहुल दौलतकार (कृषीनगर), संजय ढोक(महादेवनगर),डॉ. निशांत चव्हाण (शिवाजीनगर), डॉ. राजेश खडसे (श्रीकृष्णनगर) आदींचा समावेश आहे. काही वाहनधारकांनी पोलिसात तक्रार केली नसल्याने बारा वाहनांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे. अज्ञात दुचाकीस्वारांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाहन ‘टार्गेट’ केल्याने विविध चर्चेला उधाण आले आहे.

July 28, 2014 in मुख्य पान

राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही – सुनील तटकरे

लढविलेल्या एकूण जागा राष्ट्रवादी काँग्रेस 69 लढविलेल्या एकूण जागा २00४ची निवडणूक २00४ साली काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादीने ७१ जागा जिंकल्या. मात्र, निकालानंतरच्या वाटाघाटीत काँग्रेस कोट्यातील २ कॅबिनेट व १ राज्यमंत्री पदाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. आधी सोडला होता दावा राष्ट्रवादी काँग्रेस 124 157 वर्धा : मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी वध्र्यात मांडली.
राष्ट्रवादी १४४ जागांच्या भूमिकेवर ठाम आहे. तशी अटीतटीची वेळ आल्यास पक्षाचे नेते शरद पवार आणि
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पातळीवर हा मुद्दा निकालात काढला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

July 28, 2014 in मुख्य पान

येळ्ळूरमध्ये मराठी भाषिकांवर लाठीमार

बेळगाव : येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक रविवारी सकाळी ६ च्या सुमारास कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला. या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करून मदरुमकी गाजविली. पाठोपाठ येळ्ळूर गावात पोलिसांनी प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. घरातील वस्तूंची तोडफोड करून अनेकांना बेदम मारहाण केली, तर अनेक वाहनांचेही पोलिसांनीच नुकसान केले. पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. पोलिसांचा हा धुडगूस येळ्ळूरमध्ये सुमारे अर्धा तास सुरू होता.
येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य – येळ्ळूर’ फलक हटविण्यासाठी कर्नाटक पोलिसांची फौज रविवारी पहाटेच येळ्ळूरमध्ये दाखल झाली. यावेळी सकाळी महिला आपल्या दारात रांगोळ्या घालत होत्या. पोलिसांनी त्यांना हटकून हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांनी सकाळी फलक काढला. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महिलांशी हुज्जत घातल्याने याचा जाब केंद्राकडे दाद मागणार कर्‍हाड : कर्नाटकात मराठी बांधवांवर होणारे अत्याचार चुकीचे आहेत. कर्नाटक पोलिसांकडून निर्माण केली जाणारी दहशत खपवून घेणार नाही., असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. ते म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधवांवर होणार्‍या अत्याचारांबाबत यापूर्वी केंद्र सरकारशी बोललो होतो. आता पुन्हा हा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळे तातडीने केंद्राशी चर्चा करू.

July 28, 2014 in मुख्य पान

मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची इंडियन मुजाहिदीनची धमकी

 

मुंबई- इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना पत्राद्वारे दिली आहे. यामुळे, मुंबईसह राज्यात हायअर्लट जारी केले आहे. या धमकीपत्राची पोलिस कसून चौकशी करत असून सर्वत्र पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

या निनावी पत्रातून १९९३ च्या मुंबई स्फोटांची किंवा तत्सम घटनेची पुनरावृत्ती करण्याचा दहशतवाद्यांचा इशारा  स्पष्ट होत आहे. या पत्रात गाझामध्ये मुस्लिमधर्मीयावर होत असलेले हल्ले आणि त्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकी सुद्ध देण्यात आली आहे.  हिंदी आणि इंग्रजी अशा द्विभाषीक पत्रातून पाठवलेल्या मजकूरातून ही बाब उघड झाली आहे. यात ‘१९९३ मध्ये तुम्ही नशीबवान ठरला होता. मात्र आता हिंमत असेल तर आम्हाला थांबवून दाखवा’ अशी धमकी दिली आहे.

पत्राखाली इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नाव आहे. हे पत्र कोणी आणि कोठून पाठवले, तसेच हे पत्र दहशतवादी संघटनेने पाठवले की कोणीतरी जाणुनबूजून मस्ती करत आहे, याचा पोलिस तपास करत आहे.

July 28, 2014 in मुख्य पान