यवतमाळ – अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील येलदरी येथे घडली. सुरेश पोहणकर, असे मृताचे नाव आहे. पोहणकर हे आपल्या नातेवाईकासोबत दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने सुरेश पोहणकर यांचा मृत्यू झाला. साहेबराव शामराव गोलाईतकर (४४) रा. वानोळा यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
Archive for July 16th, 2014
वीज वितरण अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून तंत्रज्ञाची आत्महत्या
यवतमाळ – वीज वितरण कार्यालयात कार्यरत तंत्रज्ञाने आत्महत्या केल्याची घटना दिग्रस येथे घडली. विजय व्यवहारे असे मृताचे नाव आहे. वीज वितरण कंपनी दिग्रसचे कनिष्ठ अभियंता अक्तर सलीम अक्तर मन्नान यांच्या जाचापायी आपल्या पतीने आत्महत्या केल्याची तक्रार मृतक तंत्रज्ञाच्या पत्नीने पोलिसात केली आहे.
हेमा विजयराव व्यवहारे यांनी पो.स्टे. दिग्रस येथे दिलेल्या तक्रारीनुसार विजय व्यवहारे हे १२ वर्षापासून शहर विभागात कार्यरत होते. परंतु शहर विभागात जास्त वर्ष झाल्यामुळे त्यांनी सहाय्यक यांच्याकडे विनंती अर्ज सादर केल्याने त्यांची बदली तुपटाकळी येथे झाली होती. कनिष्ठ अभियंता अक्तर सलीम यांनी त्यांना वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत होते तसेच त्यांना रात्री बेरात्री कॉल करून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. सुटी असतानासुद्धा कामावर बोलावून वेठीस धरीत असल्याचा आरोप तक्रारीतून केला. या घटनेची माहिती अक्तर यांना दिल्यानंतर उद्धट शब्द वापरल्याचा आरोप केला आहे. हेमा व्यवहारे यांच्या तक्रारीवरून आज दिग्रस पोलिसांनी अक्तर सलीम अक्तर मन्नान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शिवसेनेकडून वैदीकांच्या पुतळ््याचे दहन
हाफीज सईद मुलाखत व कश्मीर वक्तव्याचा निषेध
यवतमाळ – २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर मार्इंड हाफीज सईदची मुलाखत घेउन, कश्मीर संदर्भात बेजबाबदार वक्तव्य करणाºया वेदप्रकाश वैदीक यांचा जिल्हा शिवेसनेने निषेध नोंदवित आज बुधवारी दत्त चौकात प्रतिकात्मक पुतळा जाळला.
गेल्या काही दिवसापुर्वी वेदप्रकाश वैदीक यांनी पाकिस्थानात जाउन, दहशवादी हल्ल्याशी संबधीत असलेल्या हाफीज सईदची मुलाखत घेतली. तसेच कश्मीर संदर्भात बेजबाबदार विधान केले. याबाबतचे छायाचित्र देशभरातील वृत्तपत्रात प्रसिध्द झाल्याने याचे पडसाद यवतमाळात उमटले असून, आज जिल्हा शिवसेनेने दत्त चौकात वैदिक यांच्या विरोधात नारेबाजी करून निषेध नोंदविला. जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, राजेंद्र गायकवाड, तालुका प्रमुख किशोर इंगळे, शहर प्रमुख पराग पिंगळे यांच्या नेतृत्वात वेदप्रकाश वैदीक यांच्या प्रतिकात्मक पुतळ जाळण्यात आला. यावेळी संजय रंगे, सुरेश ढेकळे, राजू टोंबरे, संतोष गदई, गिरीष व्यास, अरूण वाकडे, प्रमोद जाटे, काजल काबंळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
शेतकºयाकडील दीड लाख लुटले
यवतमाळ – बँकेतून पैसे काढून गावाकडे जाणाºया शेतकºयाची दुचाकी अडवून मारहाण करून १ लाख ६८ हजार रुपये लुटल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजता महागाव तालुक्यातील माळेगाव घाटात घडली. सातघरी येथील शेतकरी लखीराम गणू राठोड यांनी काळी दौ. येथील कृषी केंद्र चालकाकडून बियाणे, रासायनीक खत खरेदी केली होती. उधारीचे ६० हजार रुपये देण्यासाठी व पेरणीसाठी लागणारे बियाणे खरेदी करण्यासाठी महागाव येथील युनियन बँकेतून १ लाख ६८ हजार रुपये काढले होते. पिशवीमध्ये पैसे ठेऊन कबिदास पवार यांच्यासोबत एम.एच. २९ / एक्स ९५०७ मोटरसायकलने गावाकडे जात होते. अशातच माळेगाव घाटात आरोपी रमेश भाटू राठोड, राहुल रमेश राठोड रा. हुडी ता. पुसद यानी दुचाकी अडवून शेतकºयाला खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर सदर रक्कम घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे.
मालकासोबत इमानदारी; रस्त्यात मात्र चोरी!
टायरचोरीचे कनेक्शन मद्रास, हैद्राबादमध्ये ; २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
यवतमाळ – महाराष्टÑासह इतर राज्यातून टायर चोरून मध्यप्रदेशात नेणारी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेर येथे जेरबंद केले. यातील तीन आरोपी चालक असून मालकाने दिलेला माल इमानदारीने नियोजित ठिकाणी पोहोचवित होते. मात्र परतीच्या प्रवासामध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची चाके व इतर साहित्य चोरी करीत असल्याची कबुली दिली. मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यांतही या टोळीचे नेटवर्क असून, आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करून २१ जुलैपर्यंत पोलीस कोेठडी मिळविली.
तीन महिन्यांपूर्वी लाडखेड येथील बसस्थानकासमोर उभ्या अससेल्या कन्टेनरची १५ चाके चोरट्यांनी चोरून नेले होते. सदर चोरी या टोळीने केली असावी, या संशयावरून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. घनश्याम गाझी जाटम रा. डोंगरपुरा जि. बाझापूर, अरारफ खान वहित खान रा. मोना जि. ग्वालीयर, अनिस खान रसूल खान रा. मगेरा जि. शिप्रा, इस्ताप रशिल खान रा. मोना जि. ग्वालीयर (मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहे. त्यापैकी तीन जण ग्वालीयार येथील ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत होते. दोन दिवसांपूर्वी आर्णी व अन्य भागातून चार चाकी वाहनाचे टायर चोरून नेत असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून एम एच ०६/ २१६२ क्रमांकाचा ट्रक व १३ टायर जप्त केले. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करून २१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी मिळविली. या आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपीपैकी तीन जण ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून नोकरी करीत असून दोन जण हेल्पर म्हणून काम करत असल्याचे उघड तपासात निष्पन्न झाले. ग्वालीयर येथून ट्रान्सपोर्ट कंपनीमधून साहित्य घेऊन ते मद्रास, हैद्राबादसह अन्य राज्यात जातात. इमानदारीने नियोजीत ठिकाणी सर्व माल पोहचवून परतीच्या प्रवासात येताना ते चोरी करीत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. महामार्गावर थांबून असलेले अपघातग्रस्त वाहनासह अन्य ट्रक, कारचे चक्के, बॅटºया डिजल आदि साहित्य चोरी करण्याचा गोरखधंदा ते करीत होते. यामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येऊन आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश तोगडवार करीत आहे.
सुधीर कोठारी यांची हुकुमशाही भ्रष्टाचार झाकण्यासाठी माझा बळी – अनंता साटोणे
– २८ जुलैपासून आमरण उपोषण
प्रतिनिधी / नागपूर
वर्धा जिल्हा अंतर्गत येणाºया हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत असलेल्या अनंता साटोणे यांना समितीने तडकाफडकी बडतर्फ केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्वरित बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजू न केल्यास वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ जुलैपासून साटोणे हे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा समितीचे पीडित कर्मचारी अनंता साटोणे यांनी आज पत्रपरिषदेद्वारे दिला.
अनंता साटोणे हे १६ आॅक्टोबर १९९७ साली हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत झाले. त्यांनी कामावर असताना वरिष्ठांनी सांगितलेले कामे प्रामाणिकपणे केली. परंतु हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी मनमानी करीत कोणतेही कारण नसताना ७ जुलै २०१४ रोजी बडतर्फ करण्याची कारवाई केली.
वास्तविक अनंत साठवणे यांनी २००० पासून पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी व २००८ पर्यंतचे एरियर्स देण्यात यावे. तसेच सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनंता साटोणे यांनी केली होती. यासाठी वरिष्ठांकडे अर्ज विनंत्या केल्या होत्या. आपल्याला न्याय मिळण्यासाठी अनंता साटोणे यांनी प्रयत्न केले असता सभापती सुधीर कोठारी यांनी कोणतेही महत्वाचे कारण नसताना बडतर्फीची कारवाई केली आहे.
यापूर्वीही सुधीर कोठारी हे नगराध्यक्ष असताना त्यांनी घराचे प्रकरण उकरून काढून व अतिक्रमण करून घर बांधले असल्याचा आरोप करीत घर पाडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी पाठविण्यात आले होते. परंतु या गोष्टीला विरोध करताच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी असताना अनंता साटोणे यांना बडतर्फ केले होते. कोठारी यांची ही ‘मेरी मर्जी’चा कारभार असून त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये व आपला हक्कही मागू नये यासाठी ही सूडभावनेतून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप अनंता साटोणे यांनी केला आहे.
२२ फेब्रुवारी २०१३ रोजी ड्युटीचा वेळ संपताच सायंकाळी ७.१५ वाजता अनंता साटोणे हे घरी गेले. यांचा कामाचा वेळ सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत आहे. २२ फेब्रुवारी बाजार निरीक्षक येथील वीज पुरवठा खंडित झालेला होता. बाजार निरीक्षक राठोड यांनी यासंदर्भात साटोणे यांना कळविले. माहिती मिळताच साटोणे बाजार निरीक्षक कार्यालयात हजर झाले व राठोड यांची भेट घेतली. यादरम्यान राठोड यांनी कुठलाही विचार न करता साटोणे यांना अश्लिल शिविगाळ केली व कुठल्याही प्रकरणात फसवून बडतर्फ करणार असल्याची धमकी दिली. यासंदर्भात राठोड यांनी समिती तयार करून खोटानाटा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला व त्या आधारे ७ जुलै २०१४ रोजी साटोणे यांना बडतर्फे करण्यात आले. कुठल्याही कृषी उत्पन्न समितीने आपल्या कर्मचाºयांवर उत्पन्नाच्या ३५ टक्के खर्च करावा असा राज्य शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांवर मात्र ८ टक्के खर्च करीत असल्याचे साटोणे यांनी सांगितले. या समितीच्या सभापतीने कर्मचाºयांचे शोषण करायला प्रारंभ केला असून त्यांनी समितीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांच्या इशाºयावरून साटोने कुठलेही कारण समोर करून बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप साटोणे यांनी केला. हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजु न केल्यास साटोणे हे २८ जुलैपासून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुधीर कोठारीची मनमानी
बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांचा मनमानी कारभार सुरू असून कर्मचाºयांना दहशतीत ठेवण्यासाठी त्यांना बडतर्फ करणे, याशिवाय बाजार समितीतील अनेक कर्मचाºयांना घरकामगारासारखे घरातील वैयक्तिक काम करण्यासाठी राबविण्यात येत आहे.









