पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for October 31st, 2014

दलित अत्याचार विरोधात मुंबईत आंदोलने 0

दलित अत्याचार विरोधात मुंबईत आंदोलने

ap11

मुंबई- अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार पातळीवर याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने शुक्रवारी वानखेडे स्टेडियम येथे नवे मुख्यमंत्री शपथ घेत असताना सरकारचे लक्ष या गंभीर घटनांकड़े वेधण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी विविध संघटनांनी आक्रमक होत तीव्र आंदोलने केली. यात फेसबुक आंबेडकर राईट मुव्हमेंट (फेम), संभाजी ब्रिगेड, कबीर कला मंच, रिपब्लिकन सेना, कायद्याने वागा, दलित अत्याचार विरोधी कृती समिती, आंबेडकर सेन्टर फॉर जस्टिस एंड पीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोशिएशन ऑफ़ इंजीनियर, नॅशनल फेडरेशन ऑफ़ पेट्रोलियम, एस. सी. एस. टी. एम्पोलीय असोशिएशन आदी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले.

शुक्रवारी चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम येथे नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होत असताना, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मरीन ड्राइव्ह चौपाटी परिसर, चर्चगेट पूर्व पश्चिम, तसेच वानखेडे स्टेडियमच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ सनदशीर मार्गाने आंदोलने करण्यात आली. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त असताना सुरक्षाला छेद देऊन संघटना कार्यकर्ते सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या साहित्यिक उर्मिला पवार, उषा अम्बोरे, आनंदराज आंबेडकर, राज असरोंडकर, कुंदा प्रमिला निळकंठ, सिद्दार्थ मोकले, रेवत कनिंदे, वैभव छाया, सुमेध जाधव, सुधीर ढवले, सुबोध मोरे, संजय रणदिवे, फिरोज मीठीबोरवाला, अॅड़. संघराज रुपवते, किशोर कांबळे, रेखा कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्त्याना पोलिसांनी अटक केली. तसेच त्यांची रवानगी येलो गेट पोलिस ठाण्यात आणि मरिन लाइन्य पोलिस ठाण्यात करण्यात आली.

October 31, 2014 in मुख्य पान
गतिमान कारभारासाठी सेवा हमी विधेयक आणणार - मुख्यमंत्री फडणवीस 0

गतिमान कारभारासाठी सेवा हमी विधेयक आणणार – मुख्यमंत्री फडणवीस

1414595499devendra-fadnavis
मुंबई – जनतेची कामं वेळेत व्हावी यासाठी राज्यात सेवा हमी विधेयक आणू अशी घोषणा राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्याची गेल्या १५ वर्षात विस्कटलेली घडी नीट बसवून महाराष्ट्राला नंबर वन बनवू असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
शपथविधी सोहळ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला. यापूर्वीही अनेकदा पत्रकार परिषद घेतल्या पण आज थोडे दडपण जाणवतंय असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जनतेला पारदर्शी, गतिमान सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.  जनतेला कामांसाठी सरकारी कार्यालयाच्या फे-या माराव्या लागू नये यासाठी सेवा हमी विधेयक राबवणार अशी घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या विधेयकामुळे जनतेला ठराविक वेळेत त्यांची कामं पूर्ण करुन घेण्याचा अधिकार मिळेल असेही त्यांनी सांगितले.

October 31, 2014 in मुख्य पान
राष्ट्रीय एकात्मता दौड बंधुभाव वाढीसाठी मोलाची ठरेल - राहुल रंजन महिवाल 0

राष्ट्रीय एकात्मता दौड बंधुभाव वाढीसाठी मोलाची ठरेल – राहुल रंजन महिवाल

DSC_3630
दौडमध्ये हजारो यवतमाळकरांचा सहभाग
यवतमाळ : देशाची एकात्मता आणि राष्ट्रीय एकसंघता टिकवून ठेवने आवश्यक आहे. त्यादृष्टीने एकात्मता दौड महत्वाची ठरणार असून यातून एकमेकांप्रती बंधुभावणाही वाढीस लागण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. दौड विसर्जीत झाल्यानंतर स्थानिक पोस्टल मैदानावर झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुळकर्णी,
अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नरेंद्र टापरे, श्री.सिरोडकर, डॉ.राजेश अडपावार, उपवनसंरक्षक प्रमोदचंद लाकरा, अप्पर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पोस्टल मैदान येथून सकाळी 8 वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. त्यानंतर पोस्ट ऑफीस चौक, एलआयसी चौक, बसस्थानक, नेताजी चौक, पाचकंदील चौक, येरावार चौक अशी फिरत दौड पुन्हा पोस्टल मैदानात विसर्जीत झाली. या दौडमध्ये हजारो यवतमाळकर नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. तसेच विविध सामाजिक संघटना, शाळा, विद्यार्थी, एनसीसी व स्काऊट गाईडचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. संपुर्ण मार्गात दौडमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेसोबतच स्वच्छतेचा संदेश दिला. हातात घेतलेले फ्लेक्स, जनजागृतीपर संदेश व वाहनावर लावण्यात आलेल्या बॅनरद्वारे हा संदेश देण्यात आला. सहभागींनी मोठ्याप्रमाणावर एकात्मतेचे नारे देऊन हा संदेश संपुर्ण यवतमाळकरांना दिला. विविध सामाजिक संघटनांनी वाजत गाजत तसेच संगीताच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदविला. दौडमध्ये संघटनांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

October 31, 2014 in मुख्य पान
टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित 0

टू-जी घोटाळा- ए.राजा, कनिमोळीसह १९ जणांवर आरोप निश्चित

25-2g-sacm-302
नवी दिल्ली – टू-जी घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने शुक्रवारी माजी दूरसंचारमंत्री ए.राजा, कणिमोळी यांच्यासह १९ जणांविरोधात आरोप निश्चित केले. पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने ए.राजा, कणिमोळी तसेच स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहीद बलवा, करीम मोरानी, करुणानिधी यांच्या पत्नी दयाळू अम्मा, विनोद गोएंका यांच्यासह एकूण १९ जणांवर आरोप निश्चित केले आहेत.
याप्रकरणी दिल्लीतील पटियाळा हाऊसमधील विशेष न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आपण निर्दोष असल्याचे सांगत याप्रकरणी सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी या सर्वांनी न्यायालयाकडे केली आहे.

October 31, 2014 in मुख्य पान
फडणवीसांनी घेतले गडकरीचे आशीर्वाद 0

फडणवीसांनी घेतले गडकरीचे आशीर्वाद

1
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरविली. त्यावर मिठाईचा गोडवा जिभेवर  ठेवत ‘नितीनजी, डोक्यावर हात असू द्या, मी महाराष्ट्र घडवतो की नाही बघा.!’ असा आशीर्वाद फडणवीसांनी मागताच गडकरी सद्गदित झाले.

October 31, 2014 in मुख्य पान
६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार 0

६ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने केला बलात्कार

rape-victim
बंगळुरू- बंगळुरूत शालेय विद्यार्थीवरील अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पूर्व बंगळुरूमधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने शाळेतच सहा वर्षीय मुलीवर सलग दोन दिवस बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  गेल्या दहा दिवसांतील ही दुसरी घटना असून याप्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय शिक्षकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

October 31, 2014 in मुख्य पान
राज्यात 'देवेंद्रपर्व' सुरू 0

राज्यात ‘देवेंद्रपर्व’ सुरू

devendra-fadanvis
मुंबई – वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक अशा सोहळ्यात, खच्चून भरलेल्या गर्दीच्या साक्षीने विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या निमित्ताने भाजपचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात विराजमान झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत फडणवीस यांचा शपथविधी झाला. या सोहळ्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती खास अशी ठरली. शिवसेनेने या सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. मात्र, आज दुपारी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी फोन केल्यानंतर उद्धव यांनी बहिष्काराची तलवार म्यान केली. गर्दीमुळे उद्धव यांना काहीसा उशीर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर उद्धव तेथे पोहोचले.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक धार्मिक गुरू, उद्योजक, चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
यांनी घेतली शपथ
कॅबिनेट मंत्री
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णु सावरा
राज्यमंत्री
दिलीप कांबळे, विद्या ठाकूर

October 31, 2014 in मुख्य पान