
अहमदनगर – पोलिसांनी जवखेडा हत्याकांडाचा तपास वेळेत पूर्ण केला नाही तर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवू असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलिसांना दिला आहे. याप्रकरणी कोणतीही चुकीची कारवाई होऊ देणार नाही असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी पिडीत कुटुंबियांना दिले आहे.
जवखेडा येथील जाधव कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाला ४० दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्याप मारेक-यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी चार जणांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली असली तरी या चौघांनी कोर्टात धाव घेत नार्को टेस्टला विरोध केला आहे. कोर्टानेही या चौघांची नार्को टेस्ट करण्याची परवानगी नाकारली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी जाधव कुटुंबियांची भेट घेतली. मारेक-यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पिडीत कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. दोषींवर कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना दिले आहे.
Archive for November, 2014
0
जवखेडा हत्याकांडाचा तपास सीबीआय कडे – मुख्यमंत्री
0
पूर्ववैमनस्यातून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

कोल्हापूर – पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. रंकाळा परिसरातील पानारी मळा या भागात राहाणा-या किशोर भोसले यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना जिवंत जाळण्याच प्रयत्न करण्यात आला.
किशोर भोसले आणि रणजीत पांडूरंग मोरस्कर यांच्यात वारंवार हाणामा-या होत असत. या वैमनस्यातून हा प्रकार घडला. मोरस्कर यांच्या गुंडानी मध्यरात्री दोन वाजता भोसले यांच्यासह त्यांच्या गरोदर पत्नी आणि इतर तीन जण गाढ झोपेत असताना घरात रॉकेलचे बोळे फेकले आणि घराला आग लावून दिली.
तसेच भोसले यांच्या कुटुंबियांना घराबाहेर पडता येऊ नये यासाठी घराच्या कड्याही लावून घेतल्या. यावेळी घराच्या पाठीमागे दरवाजा असल्याने भोसले आणि त्यांच्य़ा कुटुंबियांना घरातून बाहेर प़डणे शक्य झाले यामुळे मोठी जिवितहानी टळली.
या घटनेमुळे रंकाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नसली तरी मात्र या आगीत त्यांच्या घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
0
रेल्वे अपघातात १८ हजार ७३५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली – गेल्या काही वर्षांपासून रेल्वे ट्रॅकवरील अपघातांतील मृतांचे प्रमाण वाढतच चालले आहे. रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर अपघातांबाबत उपाययोजना करुनही अपघातातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये रेल्वे ट्रॅकवर सुमारे १४ हजार ९७३ अपघाती मृत्यूची नोंद झाली होती. तर २०१२ मध्ये हेच प्रमाण १६ हजार ३३६ वर पोहोचले. त्यापाठोपाठ २०१३ मध्ये १९ हजार ९९७ अपघाती मृत्यू झाले होते. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत रेल्वे ट्रॅकवरील अपघातात सुमारे १८ हजार ७३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बहुतांशी रेल्वे अपघात हे रेल्वे रुळ ओलांडणे, रेल्वेतून खाली पडल्याने, अपघात तसेच आत्महत्या यामुळे होतात. यांसारखे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही गंभीर पावले उचलली जात आहे. रेल्वे रुळ न ओलांडता जिन्यांचा वापर करा यांसारख्या सूचना वारंवार प्रवाशांना केल्या जातात. तसेच विविध प्रवासी जनजागृती कार्यक्रमही रेल्वेकड़ून राबवले जात असल्याची माहिती रेल्वे अधिका-यांनी यावेळी दिली.
Comments Off on क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागून अंपायरचा मृत्यू
क्रिकेट मॅच दरम्यान बॉल लागून अंपायरचा मृत्यू

नवी दिल्ली – फिलिप ह्युजच्या मृत्यूनंतर जेमतेम दोन दिवसांनीच क्रिकेट मॅच सुरू असताना बॉल लागल्यामुळे गंभीर इजा होऊन मृत्यू होण्याची आणखी एक घटना घडली. यावेळी ही घटना इस्रायलमध्ये अॅसडोड शहरात घडली.
इस्रायलच्या क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन एका स्थानिक स्पर्धेत अंपायर (पंच) म्हणून बॉलरच्या दिशेला उभा होता. मॅच सुरू असताना फिल्डरने प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूला रनआऊट करण्याच्या उद्देशाने स्टम्पच्या दिशेने फेकलेला बॉल एका स्टम्पला आपटून थेट अंपायर हिलेल ऑस्कर (५५) यांना लागला. बॉल इतक्या जोरात लागला की, अंपायर ऑस्कर मैदानातच कोसळले, थोड्याच वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण ब्रेन हॅमरेज की मॅसिव्ह हार्टअॅटॅक (ह्रदयविकाराचा तीव्र धक्का) हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर कळेल. याआधी पाच वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये वेल्स येथे एका मॅचदरम्यान फिल्डरने फेकलेला बॉल चुकून अंपायरलाच लागला आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियात एका महत्त्वाच्या स्थानिक स्पर्धेत फलंदाजी करताना बॉल लागल्यामुळे फिलिप ह्युज हा २५ वर्षाचा गुणी फलंदाज मैदानातच कोसळला आणि कोमात गेला होता. कोमात गेलेल्या ह्युजचा दोन दिवसांनी मृत्यू झाला, शेवटपर्यंत तो कोमातून किंचितही बाहेर पडू शकला नव्हता. ह्युजच्या अकाली मृत्यू आधी १९९८ मध्ये एका मॅच दरम्यान हेल्मेट न घालता फॉरवर्ड शॉर्ट लेगला फिल्डिंग करत असलेल्या रमण लांबाचा डोक्याला बॉल लागल्यामुळे मृत्यू झाला होता.
0
मुलीच्या लग्नासाठी ३७ लाख रुपये द्या; पित्याला दिल्ली हायकोर्टाचा आदेश

नवी दिल्ली -आपल्या आर्थिक क्षमतेनुसार मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणे हे वडिलांचे कर्तव्य आहे, असे सांगत दिल्ली हायकोर्टाचे न्या. जी. पी. मित्तल यांनी सैनिक फार्म परिसरात राहणा-या एका व्यक्तीला स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी ३७ लाख रुपये आईकडे देण्यास सांगितले.
लग्नानंतर अवघ्या काही वर्षातच पती-पत्नी वेगवेगळे राहू लागल्यामुळे आईनेच मुलीचा सांभाळ केला होता. या पार्श्वभूमीवर आईने मुलीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडे मोठ्या रकमेची मागणी केली. सैनिक फार्ममधील पॉश बंगला, मनालीत रिसॉर्ट तसेच आणखी बरीच मौल्यवान संपत्ती स्वतःजवळ बाळगणा-या मुलीच्या वडिलांना तिच्या आईने लग्नासाठी जास्त पैसे देण्यास सागितले. वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी पाच लाख रुपये आणि जेवणाचा खर्च करण्याची तयारी दाखवली होती. अखेर आईने कोर्टात दाद मागितली.
कोर्टाने वडिलांना लग्नाचा खर्च करण्यासाठी आईकडे ३७ लाख रुपये देण्यास सांगितले. यावेळी बचावासाठी बोलताना वडिलांनी लग्नात लाखो रुपये खर्च करणे, महागड्या भेटी देणे म्हणजे हुंडा देण्यासारखेच आहे आणि हा गुन्हा असल्याचे सांगितले. यावर उत्तर देत कोर्टाने लग्नात मुलीला आपल्या आर्थिक कुवतीनुसार स्वच्छेने एखादी वस्तू अथवा सेवा दिल्यास ती भेट ठरेल, मात्र विशिष्ट मागणी पूर्ण करण्यासाठी मुद्दाम एखादी वस्तू अथवा सेवा देणे म्हणजे हुंडा देणेच आहे, असे सांगितले. कायद्यानुसार हुंडा देणे आणि घेणे हा गुन्हा आहे पण स्वेच्छेने झालेले देणे-घेणे हे गुन्हा नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
0
खरे सोने दाखवून डुप्लिकेटची विक्री

नाशिकरोड – खरे सोने दाखवून नंतर बनावट सोने गळ्यात मारणाऱ्या महिलेसह तीन जणांना गुन्हे शाखा क्रमांक तीनच्या पथकाने नारायणबापू चौकाजवळ शुक्रवारी अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ हजाराचा ऐवज जप्त केला.
जेलरोड-सायखेडा रोडवरील नारायणबापू चौकातील अभिनव शाळेजवळ गणेश गंगाराम प्रजापती (४२, व्यापारी, रा. अबलापूर रेल्वे स्टेशनजवळ लखनऊ), बालचंद धनीराम गुजराती (वय २५) आणि राधा राजू राय (३५, मजुरी, दोघे रा. मैहेबुलापूर, लखनऊ) हे निम्म्या दरात सोने विकत असल्याचे पोलिस निरीक्षक सानप यांना समजले. हे तिघे व्यवहारावेळी खऱ्या सोन्याचे दागिने दाखवून नंतर तसेच दिसणारे पितळाचे दागिने गळ्यात मारत होते. गणपतीच्या मुखवट्याचे दागिने व पितळी नाणी ते पंधरा हजार रुपये तोळा या दराने ग्राहकांना विकायचे. सोने निम्म्या दरात मिळत असल्याच्या लालचेने ग्राहक जाळ्यात अडकायचे. पोलिसांनी पंचक येथील संतोष रामनाथ नागरे यांना बनावट ग्राहक करून दोन पंचासमेवत त्यांना अभिनव शाळेजवळ पाठवले. पोलिस निरीक्षक सानप व त्यांचे सहकारी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ दबा धरून बसले. नजीकच असलेल्या युनियन बँकेच्या एटीएमजवळ प्रजापती व त्यांच्या साथीदारांशी रामनाथ नागरे यांची गाठ पडली. बनावट सोने विकत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन किलो गणपतीच्या मुखवट्याचे पितळी दागिने, साडेतीन किलो पितळी नाणी, खऱ्या सोन्याचे १. ४०० ग्रॅमचे चार हजाराचे दागिने, पावणेतीन हजाराची रोकड, मोबाइल जप्त केले. पोलिस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक निरीक्षक जी. डी. देवडे, सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, शंकर गडदे, ललिता आहेर, राजेंद्र जाधव आदींनी ही कारवाई केली.
0
चित्रपटांनी केली पोलिसांची प्रतिमा मलीन – मोदी

गुवाहाटी -‘गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट करून पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्याची गरज आहे. पोलिस दल अत्याधुनिक आणि पोलिसांनी ‘स्मार्ट’ असायला हवं. पण चित्रपटांनी पोलिसांची प्रतिमा मलीन केली आहे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेत मोदींनी सुरक्षेवर भर दिला.
‘आता बदलण्याची वेळ आली असून पोलिस दलाने ‘स्मार्ट’ झालं पाहिजे. SMART चा अर्थ आहे S म्हणजे Strict आणि Sensitive, M म्हणजे Mobile, A म्हणजे Alert, Accountable, R म्हणजे Reliable, Responsible, T म्हणजे Tech savvy किंवा Trendy.’ ‘देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तचर यंत्रणा आणखी बळकट आणि सक्षम झाल्या पाहिजेत. ज्या देशाकडे बळकट गुप्तचर यंत्रणा आहे. त्या देशाला शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहण्याची वेळ येत नाही’, असं मोदींनी सांगितलं.
‘जनतेच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून अनेक पोलिस शहीद झालेत, हे लोकांना कळलं पाहिजे. आतापर्यंत ३३ हजार पोलिस ड्युटीवर कर्तव्य पालन करताना शहीद झाले. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. शिवाय चित्रपटांमधूनही पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे’, असं मोदी म्हणाले. ‘जनतेपर्यंत शहीदांची गाथा पोहचवण्याचं काम करण्यासाठी शहीद पोलिसांच्या सन्मानासाठी स्पेशल टास्क फोर्स असायला हवा. नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं एक पुस्तक प्रत्येक राज्याने शहीद जवानांसाठी बनवलं पाहिजे. एवढचं काय तर प्रत्येक पोलिस ठाण्याची वेगळी वेबसाईट झाली तरी काही हरकत नाही’, असं मोदींनी सांगितलं.
0
पतीच्या खून प्रकरणी पत्नी व प्रियकराला आजन्म कारावास

यवतमाळ – जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया कृष्णापूर येथे पतीचा खून करणाºया पत्नीसह तीच्या प्रियकराला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. पांढरकवडा येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले यांनी आज शनिवारी हा निकाल दिला. शिला रविंद्र निब्रड, राजू मारोती वासेकर रा. कृष्णापूर ता. वणी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.
२२ फेबु्रवारी २०१३ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती रविंद्र उर्फ लघु निब्रड हा झोपून होता. यावेळी आरोपी पत्नी शिलाने त्याच्या तोंडावर उशी दाबुण धरली. तर तीचा प्रियकर राजूने त्याचे जवळील सुरीने छाती व पोटावर वार करून खून केला होता. त्यानंतर मृतदेह अंगणातील फाटकाजवळ नेऊन टाकला व रक्ताने माखलेली सुरी त्याच्या हातात ठेवून कोणीतरी मारून फेकल्याचा देखावा निर्माण केला. मात्र शिलाने शिरपूर पोलीस ठाणे गाठून माझ्या पत्नीचा खून केल्याचा जबानी रिपाट दिला. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१,२०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान पत्नी व तीच्या प्रियकराने रविंद्रचा खून केल्याची माहीती समोर आली. त्यावरून दोघांनाही अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी येथील सत्र न्यायालयाचे तदर्थ अतिरीक्त सत्र न्यायालयाधिश एस.पी. डोरले याच्या न्यायालयात पार पडली. यावेळी सरकारी पक्षातर्फे नऊ जणांच्या साक्ष तपासण्यात आल्या. त्यामध्ये मृतकचा मुलगा विशाल याची साक्ष महत्वाची ठरली. दोष सिद्घ झाल्याने भादंवि कलम ३०२ अंतर्गत आरोपी शिला व राजू या दोघानाही आजन्म कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महीने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर २०१, ३४ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महीने सक्तमजुरी आणि भादंवि २०३, ३४ अंतर्गत १ वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी काम पाहीले.
0
जिल्हा रुग्णालयाच्या अधिष्ठातांवर खडणीचा गुन्हा

डॉक्टरला खंडणी मागणे भोवले
यवतमाळ – येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरला खंडणी मागितल्याप्रकरणी अधिष्ठातासह एका व्यक्तीविरूद्घ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालात डॉ. आनंद डोंगरे हे अधिष्ठाता पदावर कार्यरत आहे. तर याच महाविद्यालयात डॉ. प्रशांत चक्करवार (३४) रा. यवतमाळ हे मनोरुग विशेषतज्ञ या पदावर १३ आॅगस्ट रोजी रुजू झाले. ते कर्तव्य बजावित असताना अधिष्ठाता डोंगरे हे त्यांना नाहक त्रास देत होते. चक्करवार यांची पत्नी सुध्दा रुग्णालयातच कार्यरत असून त्यांनाही त्रास दिला. दरम्यान डोंगरे यांनी डॉ. चक्करवार यांची ड्यूटी बाह्यरुग्ण विभागात लावून खोटे आरोप करुन पुन्हा वेठीस धरले. यावेळी डॉ. डोंगरे यांनी चक्करवार यांच्या सह्या घेऊन तुला व तुझ्या पत्नीला नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी दिली. अधिष्ठाता कडून रुजू झाल्यापासूनच त्रास देण्यात येत असल्याने चक्करवार त्रस्त झाले होते. दरम्यान डोंगरे यांच्या सांगण्यावरून गिरमे नामक व्यक्तीने चक्करवार यांना पैशाची मागणी करून प्रकरण दडपण्याची हमी दिली. अधिष्ठाताकडून चक्क खंडणी मागण्यात येत असल्याची तक्रार चक्करवार यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून डोंगरे याचे विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी दोघाविरुध्द खंडणीचा गुन्हा नोंद केला आहे.
0
कमी दाबाच्या ठिकाणी नवीन विज उपकेंद्राचे काम हाती घ्या – केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर

यवतमाळ: विजेच्या कमी दाबामुळे शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना विविध अडचणींना समोर जावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी कमी दाबाचा विज पुरवठा होतो. तेथे नवीन विज उपकेंद्र उभारणीचे काम तातडीणे हाती घ्या, अशी सूचना केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केल्या. अहिर यांनी विश्रमभवन येथे जिल्ह्यातील विज वितरणच्या प्रश्नांवर विद्युत विज वितरण व पारेषण अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ. मदन येरावार, आ. राजू तोडसाम, आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. राजेंद्र नजरधने, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, कार्यकारी अभियंता तगडपल्लीवार, नगराळे, कांबळे, पुरकर, हितेश शेट, राजू डांगे आदी उपस्थित होते. यावेळी अहिर यांनी नवीन बांधकामाधीन उपकेंद्राचा आढावा घेतला. कृषी पंपांची प्रलंबित जोडणे तातडीणे करण्याबाबत त्यांनी सूचविले. अवैद्य विज पुरवठ्याचे कनेक्शन नियमित करुण ग्राहकांना विज पुरवठा करण्यात यावा. अनेक ग्राहकांना अवास्तव बिल दिले जाते, अशा ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निवारण केले जावे, पारेषण व वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपसात समन्वय ठेवून काम करावे, काही केंद्र उपकेंद्र पूर्ण झाले असल्यास ते तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही अहिर यांनी केल्या.विज पुरवठ्याच्या संदर्भात कंपणीकडून वारंवार निवीदा कढल्या जाते. मोठ्या रकमेच्या निविदा काढण्याऐवजी कमी किमतीच्या निविदा अधिक्षक अभियंता स्तरावर काढण्याकरीता संबंधितांना अधिकार बहाल करण्याबाबत त्यांनी सूचना केली. कंत्राटदार वेळेत कामे पूर्ण करत नसतील तर त्यांच्यावर कार्यवाही करा, असे त्यांनी सूचविले. जिल्ह्यातील विज वितरण व्यवस्था, देखभाल व दुरुस्ती, प्रलंबित कृषी पंपांची जोडणी आदीबाबत त्यांनी चर्चा केली. बैठकीला विद्युत निरिक्षक राजू महालक्ष्मे, सहाय्यक विद्युत निरिक्षक प्रदिप तंबाखे, शाखा अभियंता पानतावणे तसेच प्र.मा. मुळे, एस.पी.राठोड, मनोज बोद्रे आदी उपस्थित होते.
0
भारतात प्रत्येक चौथा माणूस पाळतो अस्पृश्यता

नवी दिल्ली, – संविधानातील तरतुदीमुळे समाजातील जातीपातीतील अस्पृश्यता ६४ वर्षांपूर्वी संपुष्टात आली असली तरीही ती खरच संपली आहे का हा एक प्रश्नच आहे. भारतात आजही प्रत्येक चौथा माणूस अस्पृश्यता पाळतो, असे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास प्रत्येक धर्मातील आणि जातीतील लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले असून त्यामध्ये मुसलमान, अनुसूचित जाती व जमातीतील नागरिकांचाही समावेश आहे.
ब्राह्मणांमध्ये अस्पृश्यता पाळण्याचे सर्वाधिक प्रमाण असून त्यापाठोपाठ ओबीसींचा क्रमांक लागतो. तर धर्मानुसार हिंदू, शिख आणि जैन धर्मपंथीय नागरिक सर्वाधिक अस्पृश्यता पाळतात. इंडियन नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) ही संस्था व युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड, अमेरिका यांनी सुमारे ४२ हजार घरात जाऊन केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. १९५६ साली स्थापन झालेली एनसीएईआर ही देशातील सर्वात जुनी व मोठी नॉन-प्रॉफिट इकॉनॉमिक पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट आहे. २०१५ साली या सर्वेक्षणातील संपूर्ण माहिती समोर येऊ शकेल.
या सर्वेक्षणादरम्यान लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील पहिला प्रश्न होता, तुमच्या कुटुंबात कोणी अस्पृश्यता पाळतं का? याचे उत्तर ‘नाही’ असे मिळाल्यास त्यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला, आणि तो होतास अनुसूचित जातीतील एखाद्या इसमाने तुमच्या स्वयंपाकघरात शिरलेले किंव्या तुमची भांडी वापरलेले तुम्हाला चालेल का? संपूर्ण भारतभरात केल्या गेलेल्या या सर्वेक्षणादरम्यान २७ टक्के लोकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले. आणि हा प्रकार ब्राह्मणांमध्ये सर्वाधिक (५२ टक्के) दिसला तर ब्राह्मणेतर लोकांपैकी २४ टक्के लोकांनीही आपण या ना त्या प्रकारे अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
विशेष बाब म्हणजे, ओबीसी नागरिकांनीही याला होकारार्थी उत्तर (३३ टक्के) देत आपल्या घरात अस्पृश्यता पाळण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सांगितले. तर अनुसूचित जाती व जमातीतील अनुक्रमे १५ व २२ टक्के नागरिकांनीही अस्पृश्यता पाळत असल्याचे मान्य केले.
तर विविध धर्मातील नागरिकांनी दिलेल्या उत्तरानुसार प्रत्येक तिसरा हिंदू नागरिक (३० टक्के) अस्पृश्यता पाळत असून, शिख (२३ टक्के), मुस्लिम (१८ टक्के) आणि ख्रिश्चन नागरिकही (५ टक्के) अस्पृश्यता पाळतात. या यादीत जैनांचा सर्वात वरचा (३५ टक्के) क्रमांक लागतो.
समाजात राहताना ‘जातीचे जोखड फेकून देणे’ हे अवघड असते, असेच या सर्वेक्षणातून समोर आल्याचे मत एनसीएईआरमधील सर्वेक्षण प्रमुख डॉ. अमित थोरात यांन व्यक्त केले.
अस्पृश्यता पाळण्यात मध्यप्रदेश राज्याचा सर्वात वरचा क्रमांक (५३ टक्के) लागतो, त्यापाठोपाठ हिमाचल प्रदेश (५० टक्के), छत्तीसगड (४८ टक्के), राजस्थान व बिहार (४७ टक्के), उत्तर प्रदेश(४३ टक्के) आणि उत्तराखंड(४० टक्के) यांचा क्रमांक लागतो. याबाबतीत पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात प्रगत राज्य असून या राज्यातील अवघ्या १ टक्के नागरिकांनी आपण अस्पृश्यता पाळत असल्याचे सांगितले, तर २ टक्के लोकांसह केरळचा याबाबतीत दुसरा क्रमांक, ४ टक्के लोकांसह महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. उत्तरपूर्व राज्यातील ७ टक्के आणि आंध्र प्रदेशमध्ये फक्त १० टक्के नागरिक अस्पृश्यता पाळतात.
0
उल्हासनगरमध्ये १०० जणांना विषारी वायूची बाधा

ठाणे – अंबरनाथ एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीच्या टॅंकरने शनिवारी रात्री उशिरा उल्हास नदीमध्ये विषारी रसायन सोडले. हे रसायन पाण्यात मिसळल्याने विषारी वायू तयार झाला.
या विषारी वायूची बाधा होऊन उल्हासनगरमध्ये शंभरपेक्षा अधिक नागरीक आजारी पडले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास नागरीकांना अचानक श्वासो श्वासाचा त्रास सुरु झाला. पोटात मळमळणे, उलटया, डोळयांची आग असे त्रास सुरु झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.
लगेचच या सर्व नागरीकांना उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
विषारी रसायन नदीमध्ये सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसीमधून अशा प्रकारे कायदा आणि पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून विषारी रसायने नदीमध्ये सोडली गेली आहेत. मात्र पोलिस आणि अन्य यंत्रणांकडून अशा घटनांकडे डोळेझाक केली जाते.
0
नायजेरीयात दहशतवादी हल्ल्यात १२० ठार

कानो – नायजेरीयातील कानो शहरातील एका मशिदीवर शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२० नागरीक ठार झाले असून, २७० जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारच्या नमाज पठणासाठी नागरीक मोठया संख्येने मशिदीत एकत्र जमले असताना, दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटामध्ये स्वत:ला उडवून घेतले त्याचवेळी तिथे आलेल्या अन्य दहशतवाद्यांनी नागरीकांवर अंदाधुंद गोळीबार केला.
नायजेरीयातील वरिष्ठ धार्मिक नेते मोहोम्मद सानूसी दुसरे यांच्या राजवाडयाला लागून ही मशिद होती. मागच्या आठवडयात सानूसी यांनी नायजेरीयातील जनतेला बोको हरम या दहशतवादी संघटने विरोधात हातात शस्त्र उचलण्याचे आव्हान केले होते.
शुक्रवारी सकाळीच मैदगुरी शहरातील एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्याचा प्रयत्न उधळून लावला होता. आठवडयाच्या सुरुवातील नायजेरीयात दोन आत्मघातकी महिला दहशतवाद्यांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते. यात ४५ नागरीकांचा मृत्यू झाला होता. कानोमध्ये बहुसंख्य मुस्लिम लोकवस्ती असून, नायजेरीयातील हे मोठे शहर आहे.
0
‘इंग्रजी बंदी’ला राज यांचा विरोध

नाशिक – महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करण्याच्या ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या भूमिकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘मराठी शाळा टिकवण्यासाठी इंग्रजी शाळा बंद करणं हा पर्याय होऊ शकत नाही. त्यापेक्षा मराठी शाळांतच उत्तम इंग्रजी शिकवण्याची सोय असावी,’ असं मत राज यांनी व्यक्त केलंय.
पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शुक्रवारी नेमाडे यांनी महाराष्ट्रात मराठी भाषेतूनच मुलांचं शिक्षण व्हायला हवं. येथील इंग्रजी शाळा पूर्ण बंद करायला हव्यात, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना नाशिक येथील पत्रकार परिषदेत राज यांनी काहीशी संयमी भूमिका मांडली. ‘उत्कृष्ट मराठी शाळा आणि त्यात उत्कृष्ट इंग्रजी शिक्षण ही महाराष्ट्राची खरी गरज आहे. मराठी शाळांमध्ये इंग्रजीचं चांगलं शिक्षण दिल्यास इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद करण्याची गरजच लागणार नाही. मराठी माणसं स्वत:च मुलांना त्या शाळांमध्ये घालणार नाहीत,’ असं राज म्हणाले. याशिवाय महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षक मिळणंही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
0
सहाराचा प्लॉट १,११५ कोटींना

मुंबई – सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाचा मुंबईजवळील नायगावमधला २६५ एकरचा प्लॉट तब्बल १ हजार ११५ कोटींना विकला गेलाय. नालासोपारातील रिअल इस्टेट कंपनी साई रिदम आणि हिरे व्यापारी भरत शाह यांनी मिळून हा प्लॉट खरेदी केला आहे. सहारा समूहाने या व्यवहाराबाबत माहिती देण्यास नकार दिला. मात्र, खरेदीदार असलेल्या साई रिदम कंपनीच्या प्रवक्त्याने हा व्यवहार झाला असल्याचं अधिकृतरित्या सांगितलं.
नालासोपारातील साई रिदम ही कंपनी गेल्या १५ वर्षापासून रिअल इस्टेटमध्ये आहे. तर भरत शाह हे हिरे व्यापारी आणि चित्रपट निर्माते आहेत. ‘साई रिदम कंपनी, भरत शाह आणि सहारा समूहाचे संचालक असे मिळून सहाराच्या मुंबईच्या कार्यालयात ५ नोव्हेंबरला हा व्यवहार झाला’, अशी माहिती साई रिदमचे प्रवक्ते प्रशांत करूलकर यांनी दिली. भरत शाह यांनीही याला दुजोरा दिला पण अधिक माहिती देण्यास इन्कार केला.
गुंतवणूकदारांचे २४ हजार कोटी न परतवल्याप्रकरणी सुब्रतो रॉय हे ४ मार्चपासून तिहार तुरुंगात आहेत. १० हजार कोटी रूपयांच्या जामीनावर सोडण्याची अट सुप्रीम कोर्टाने त्यांना घातली आहे. त्यापैकी ५ हजार कोटी रोख आणि ५ हजार कोटींची बँक गॅरंटी रॉय यांनी द्यावी, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रॉय यांच्या जामीनासाठी सहारा समूहाची धावपळ सुरू आहे. सहारा समूहाने आपल्या अतिशय महत्त्वाच्या मालमत्ता, ठेवी आणि बॉण्ड विकून आतापर्यंत ३ हजार ११७ कोटी रूपये सुप्रीम कोर्टात जमा केलेत. आता नायगावच्या जमीन विक्रीतून आलेले १,११५ कोटी रूपये धरून सहाराचे ४ हजार २३२ कोटी रूपये होत आहेत. उर्वरित रक्कम ही गुडगावमधील ९०० कोटींच्या प्लॉटच्या विक्रीचा चेक कागदपत्रासह कोर्टात कंपनी सादर करेल, असं सहाराच्या सुत्रांनी सांगितलं. त्यामुळे रॉय यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
0
डिनर पार्टीमधून आपचे ९१ लाख रुपये जमा

मुंबई – निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाने ९१ लाख रुपये एका रात्रीत जमवले आहेत. निवडणूका लढवण्यासाठी आम आदमी पक्षाने मागील निवडणुकांचे तंत्र वापरत यंदाही डिनर पार्टी आयोजित करत जनतेकडून पैसे जमवण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या डिनरपार्टीतून आपने ९१ लाख रुपये जमवले असल्याचे आपच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी असे सांगितले आहे. या पार्टिमध्ये आमच्या पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणात आले असून डिनर पार्टीच्या पास मधून आम्ही ३६ लाख रुपये जमवले असून ३६ लाख रुपये हे चेक द्वारे वर्गणी म्हणून देण्यात आले आहेत. तसेच २१ लाख रुपये आमच्या कार्यकर्त्यांकडून जमवण्यात आले असल्याचे प्रिती शर्मा मेनन यांनी सांगितले आहे. गुरुवारी झालेल्या डिनरपार्टीमध्ये २०० जणांसाठी जागा होत्या. प्रत्येक ताटाची किंमत २० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली होती. आपच्या वर्गणीदारांमध्ये युवकांची संख्या मोठ्याप्रमाणात असून हिरे व्यापारी, सिने दिग्दर्शकांचाही सामावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपचे सर्वाधिक वर्गणीदार महाराष्ट्रात असून त्याखालोखाल दिल्ली व उत्तर प्रदेशातील जनता आपची मोठ्याप्रमाणात वर्गणीदार आहे. महाराष्ट्रातील आपच्या कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिन्यात पाच कोटी रुपये जमवण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
लोकसभा निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत यापुढील वर्गणी जमवण्याची मोहिम बेंगळुरु येथे होणार आहे. या निवडणुकांसाठी जनतेने आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले असल्याचेही प्रिती मेनन शर्मांनी सांगितले. वर्गणी जमवण्यासाठी भाजपा ज्याप्रमाणे ब्रँड मोदींचा वापर करते त्याप्रमाणे आम्ही ऑनलाइन वर्गणी जमवण्याची नवीन युक्ती शोधली आहे.
0
मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट

सुरत – गुजराती चित्रपटात अभिनयकरणा-या आणि मॉडलींग करणा-या एका तरुणीने गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे. वडोद-यात राहणा-या या मॉडेलने आपल्या सोशल मीडिया साइटवर लिहले आहे की, गरीबीपुढे मी हात टेकले असून मी माझ्या शरीराची बोली लावत आहे. माझ्या घरी माझी आई गेली अनेकवर्षे अर्धांगवायुने बिछान्याला खिळून आहे. तर, वडिलांना अपघातात दोन्ही पाय गमवायला लागले असून कुठे कामाकरता विचारले असता लोक शारिरीक संबंधाबद्दल मागणी करतात, माझ्या पुढे पर्याय नसल्याने मी हा मार्ग निवडत आहे. असे या मॉडेलने सोशल मीडियावर लिहले आहे. तसेच संपर्का करता तीने आपला मोबाईल नंहरही दिला आहे. या मॉडेलाच्या जाहीर देह विक्रीच्या बातमीने गुजारतमधील राज्य महिला आयोगाला खडबडून जाग आली असून आयोगाच्या अध्यक्ष लिलाबेन अंकोलिया यांनी असे सांगितले की, राज्यातील रुग्णालये ही अद्यावत असून पिडीत महिला आपली समस्या आमच्याकडे मांडू शकते. तसेच आम्ही सर्व प्रकारची मदत करायला तयार आहोत असेही त्या म्हणाल्या.
0
१० वर्षांच्या बालिकेवर घरमालकाकडून बलात्कार

मुंबई – मुंबईतील महिला अद्यापही असुरक्षित असून भांडुपमध्ये एका दहा वर्षांच्या बालिकेवर घरमालक व त्याच्या मुलानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार घडत आहे.
पीडित बालिका पालकांसह भांडुप येथे भाड्याच्या घरात राहते. गेल्या वर्षभरापासून घरमालक व त्यांचा मुलगा तिच्यावर अत्याचार करत होते. सदर घटनेबाबत तक्रार केल्यास जीवे मारू अशी धमकीही त्यांनी तिला दिली होती. मात्र अखेर आज हा प्रकार उघडकीस आला आणि दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भांडुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित बालिकेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
0
बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी कोट्यावधींचा खर्च

चंदीगड – हत्याकांडातील आरोपी असलेले स्वयंघोषित संत बाबा रामपाल यांच्या अटकेसाठी हरियाणा आणि पंजाब सरकारच्या तिजोरीतील तब्बल २६ कोटी रुपये खर्ची पडल्याची माहिती उघड झाली आहे. हरियाणा पोलिसांना हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात हा उल्लेख करण्यात आला आहे.
स्वयंघोषित संत बाबा रामपाल यांना २००६ मधील हत्याप्रकरणात हरियाणा पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल दोन आठवड्यांचे अथक प्रयत्न व हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना रामपाल यांना अटक करण्यात यश आले होते. शुक्रवारी रामपाल यांना कडेकोट बंदोबस्तात हायकोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी अटकेसाठी आलेल्या खर्चाचा सखोल तपशील कोर्टासमोर सादर केला. यामध्ये रामपाल यांचा ठावठिकाणा शोधणे व त्यांच्या अटकेसाठी हरियाणाने १५ कोटी ४३ लाख, पंजाबने ४ कोटी ३४ लाख, चंदीगड प्रशासनाने ३ कोटी २९ लाख आणि केंद्र सरकारने ३ कोटी ५५ लाख रुपये खर्च केले. या स्वयंघोषित संताच्या अटकेसाठी ऐवढा खर्च झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, कोर्टाने रामपाल यांच्या संपत्तीचा तपशील, या अटकसत्रात जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय अहवालाचा तपशीलही सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणाची पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी होणार आहे.
0
रेती तस्कराने पकडली तलाठ्याची कॉलर

उमरखेड – तालुक्यातील बोरी-चातारी शिवारातील नदी पात्रातून रेतीचे अवैध उत्खन्न करणाºया तस्करास ट्रॅक्टरसह अटक अटक केली. यावेळी पथकातील तलाठ्यासोबत धक्का बुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली.
देविदास सुर्यवंशी रा. खडकी ता. हिमायतनगर असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. तालुक्यातील बोरी-चातारी परिसरातील नदीपात्रातून रेतीची अवैधपने वाहतुक करून चोरून नेतात. त्यामुळे नदीचे पात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून पर्यावरणाचा ºहास होत आहे. गुरुवारी रात्री नदीपात्रातून रेती चोरून नेत असल्याची माहीती महसुल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून तलाठी प्रकाश कानडे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी गेले होते. यावेळी देविदास सुर्यवंशी ट्रॅक्टरमधून रेती चोरून नेताना आढळला. यावेळी सदर तस्कराला ताब्यात घेताच तलाठ्यासोबत हुज्जत घालुन कॉलर पकडली व धक्का बुक्की केली. तसेच अश्लिल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून बाभुळगाव पोलिसांनी सुर्यवंशीयाच्याविरूद्घ गुन्हा दाखल केला.









